10 हजाराचे झाले, तब्बल 94 कोटी रुपये; एल्सिड इन्व्हेस्टमेंटच्या शेअरमुळे गुंतवणूकदार मालामाल!
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील उद्योगांची पळवापळवी झाल्यानंतर आता देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील शेअर बाजारावरही (Share Market) मोदी सरकारने वक्रदृष्टी रोखली आहे. केंद्र सरकारच्या नव्या समीकरणानंतर आता मुंबईतील बीएसई (Bombay Stock Exchange) आणि एनएसई (National Stock Exchange) इतिहास जमा होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. यामागे जगातील शक्तिशाली शेअर बाजाराशी स्पर्धा करण्यासाठी नवीन योजना आखली असल्याची चर्चा असून, आता बीएसएई आणि एनएसई गुजरातमधील गांधीनगर येथे हलविण्यात येणार आहे.
जागतिक आर्थिक घडामोडींसाठी एक खास शहर उदयास आले आहे. गुजरात, सरकार आणि विविध कंपन्यांच्या संयुक्त उपक्रमातून गिफ्ट सिटी म्हणजेच गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटीची उभारणी करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवांचे हे एक केंद्र आहे. येथे मुंबईतील शेअर बाजार स्थानांतरित करण्याची केंद्राची योजना असल्याचे समजते.
एक देश, एक स्टॉक एक्सचेंज
दोन्ही स्टॉकचे विलीनीकरण करून आशियाच नाही तर जगातील टॉप 3 शेअर बाजार होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. अनेक तज्ज्ञांना हे एक मोठे पाऊल असल्याचे वाटते. त्यामुळे एक देश, एक स्टॉक एक्सचेंज हे सूत्र गुंफण्यात येत आहे.