Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 29 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Water crisis red alert: धोक्याची घंटा! २२ दिवसांत देशभरातील प्रमुख जलाशयांमधील पाणीसाठा १२ टक्क्यांनी घटला

Water crisis red alert: देशातील १६६ प्रमुख जलाशयांमध्ये मे महिन्याच्या सुरुवातीला एकूण ६६.८३० अब्ज घनमीटर (बीसीएम) इतका पाणीसाठा उपलब्ध होता, जो ३१ मे पर्यंत कमालीची घट होऊन ४५.४१९ बीसीएमवर खाली आला आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 02, 2026 | 03:05 PM
Water Crisis, Central Water Commission, Red Alert, Reservoir Storage

Water Crisis, Central Water Commission, Red Alert, Reservoir Storage

Follow Us
Follow Us:
  • देशातील १६६ प्रमुख जलाशयांमध्ये आता त्यांच्या एकूण क्षमतेच्या केवळ २५ टक्के पाणीसाठा शिल्लक
  • अनेक राज्यांमध्ये धरणांमधील पाणीपातळी अत्यंत नाजूक पातळीवर
  • मे महिन्याच्या सुरुवातीला एकूण ६६.८३० अब्ज घनमीटर (बीसीएम) इतका पाणीसाठा उपलब्ध
Water crisis red alert: कडाक्याची उष्णता आणि दुष्काळाच्या वाढत्या भीतीमुळे देशभरातील पाणीसंकट वेगाने अधिकच गडद होत चालले आहे. केंद्रीय जल आयोगाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीमुळे चिंता अधिकच वाढली आहे. या आकडेवारीनुसार, देशातील प्रमुख जलाशयांमधील पाणीपातळी अवघ्या २२ दिवसांत १२ टक्क्यांनी खाली आली आहे.

परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, देशातील १६६ प्रमुख जलाशयांमध्ये आता त्यांच्या एकूण क्षमतेच्या केवळ २५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. अनेक राज्यांमध्ये धरणांमधील पाणीपातळी अत्यंत नाजूक पातळीवर पोहोचली आहे, तर काही जलाशय पूर्णपणे कोरडे पडले आहेत. वाढते तापमान, ‘एल निनो’चा प्रभाव आणि घटते जलसाठे या पार्श्वभूमीवर, संपूर्ण देशाचे लक्ष आता मान्सूनवर केंद्रित झाले आहे.

कारण या संकटातून दिलासा मिळवण्यासाठी मान्सून हाच आता एकमेव आशेचा किरण ठरला आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत, देशभरातील १६६ प्रमुख जलाशयांमधील एकूण ‘जिवंत साठा’ कमी होऊन ४५.४१९ अब्ज घनमीटर इतका राहिला होता. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात, या जलाशयांमध्ये ६६.८३० अब्ज घनमीटर पाणी होते, जे त्यांच्या एकूण क्षमतेच्या ३६.४१ टक्के इतके होते.

Solapur Accident: कुर्डुवाडी-बार्शी मार्गावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; पती-पत्नीचा

याचा अर्थ असा की, कडाक्याची उष्णता आणि पाण्याच्या प्रचंड मागणीमुळे अवघ्या एका महिन्याच्या कालावधीतच या प्राथमिक जलस्रोतांमधून सुमारे २१.४११ अब्ज घनमीटर पाणी कमी झाले. हवामान विभागाने ‘एल निनों’ च्या प्रभावामुळे संभाव्य दुष्काळाचा इशारा यापूर्वीच दिला आहे. या अंदाजामुळे सध्याच्या चिंतांमध्ये आणखीच भर पडली आहे.

दिलासा देणारी एकमेव बाब म्हणजे, सध्याचा जलसाठा हा गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या आणि मागील दहा वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत थोडासा अधिक आहे. तरीही, ज्या चिंताजनक वेगाने धरणे रिकामी होत आहेत.

जलविद्युत क्षेत्रावरील परिणाम

पाण्याच्या या तीव्र टंचाईचा देशाच्या जलविद्युत क्षेत्रावर बेट परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मे महिन्याच्या सुरुवातीपर्यंतच, देशातील २० प्रमुख जलविद्युत प्रकल्पांपैकी ८ प्रकल्पांशी संबंधित जलाशयांमधील पाणीपातळी सामान्य पातळीपेक्षा खाली घसरली होती.

जलविद्युत क्षेत्रावरील परिणाम

पाण्याच्या या तीव्र टंचाईचा देशाच्या जलविद्युत क्षेत्रावर बेट परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मे महिन्याच्या सुरुवातीपर्यंतच, देशातील २० प्रमुख जलविद्युत प्रकल्पांपैकी ८ प्रकल्पांशी संबंधित जलाशयांमधील पाणीपातळी सामान्य पातळीपेक्षा खाली घसरली होती.

Vidhan Parishad Election 2026: पार्थ पवारांची मध्यस्थी यशस्वी, मनधरणीनंतर सुनील टिंगरेंची माघार

देशातील १६६ प्रमुख जलाशयांमध्ये मे महिन्याच्या सुरुवातीला एकूण ६६.८३० अब्ज घनमीटर (बीसीएम) इतका पाणीसाठा उपलब्ध होता, जो ३१ मे पर्यंत कमालीची घट होऊन ४५.४१९ बीसीएमवर खाली आला आहे. यामुळे आता या प्रमुख जलाशयांमध्ये केवळ २५% पाणीसाठा शिल्लक राहिला असून धरणांची स्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. यातील ११२ प्रमुख जलाशयांमधील पाणीपातळी प्रचंड खाली आली असून, मे महिन्याच्या सुरुवातीला सामान्य पातळीपेक्षा अधिक पाणीसाठा असलेली केवळ ६ धरणे शिल्लक राहिली आहेत.

विशेषतः दक्षिण भारतातील परिस्थिती पाहता, तेथील जलाशयांमध्ये मे महिन्याच्या सुरुवातीला २६.८३% असलेला पाणीसाठा ३१ मे पर्यंत १७.५५% वर घसरला आहे. देशातील काही जलाशय तर पूर्णपणे कोरडे पडले असून, महाराष्ट्रातील भीमा-उजनी धरण आणि बिहारमधील चंदन धरण या दोन्ही जलाशयांमध्ये आता ०% पाणीपातळी शिल्लक राहिली आहे. यामुळे गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या धरणांची संख्या ११ वरून थेट १५ पर्यंत वाढली आहे. विभागनिहाय पाणीसाठ्याचा विचार केला तर मध्य भारतात २६.६०% जलसाठा शिल्लक असून, पश्चिम भारतातील जलसाठ्यातही मोठी घसरण पाहायला मिळत आहे.

 

Web Title: National water crisis red alert 166 major reservoirs live storage data

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 03:05 PM

Topics:  

  • Water Crisis

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.