
Sonia Gandhi Babur Tomb Nishikant Dubey
काँग्रेसचा काळा अध्याय, अध्याय – २५१ असे लिहित खासदार निशिकांत दुबे यांनी एक्सवर पोस्ट केली. यामध्ये लिहिले की, “२२ नोव्हेंबर १९५७ रोजी, भारताच्या राजदूतांनी दिल्लीतील लाल किल्ला संग्रहालयातून बाबरची तलवार आणि युद्धवेषासह सुमारे ३१ वस्तू अफगाणिस्तानचे राजे झहीर शाह यांना भेट म्हणून देण्यात आल्या होत्या. त्यानंतर लगेचच, जानेवारी १९५८ मध्ये, अफगाणिस्तानच्या राजांनी भारताला भेट दिली आणि विशेषतः अयोध्येतील बाबरी मशीद पाहण्यासाठी गेले. ही आहे नेहरू आणि गांधींच्या बाबरी आणि बाबरवरील प्रेमाची कहाणी”
पुढे त्यांनी लिहिले, “या कुटुंबाने अफगाणिस्तानला भेट दिली आणि विशेषतः बाबरच्या कबरीवर फुले वाहिली. नेहरू सप्टेंबर १९५९ मध्ये, इंदिरा गांधी १९६८-६९ मध्ये, राजीव गांधी १९७६ मध्ये आणि राहुल गांधी २००५ मध्ये गेले. आजपर्यंत सोनिया गांधी, राहुल गांधी किंवा प्रियांका गांधी यांनी अयोध्येमध्ये झालेल्या राम मंदिराला भेट दिलेली नाही, परंतु संपूर्ण कुटुंब बाबरच्या कबरीवर फुले वाहण्यासाठी गेले आहे. या संबंधाला तुम्ही काय नाव द्याल?
कांग्रेस का काला अध्याय, चैप्टर – 251
251. 22 नवंबर 1957 दिल्ली के लालक़िले संग्रहालय में मौजूद बाबर के तलवार,युद्ध के कपड़े सहित लगभग 31 वस्तुओं को भारत के राजदूत ने अफ़ग़ानिस्तान के राजा ज़हीर शाह को सौंपा ।इसके ठीक बाद 1958 में अफ़ग़ानिस्तान के राजा ने जनवरी 1958 में भारत का दौरा किया तथा विशेष तौर पर वे बाबरी मस्जिद अयोध्या देखने पहुँचे ।बाबरी और बाबर से नेहरु गांधी जी के प्रेम की कहानी यह है कि इस परिवार ने अफ़ग़ानिस्तान का दौरा किया तथा विशेषकर बाबर की मज़ार पर फूल चढ़ाए ।नेहरु जी सितंबर 1959 में गए,इंदिरा गांधी जी 1968-69 में गईं,राजीव गांधी जी 1976 में गए और राहुल गांधी जी 2005 में गए।राम मंदिर देखने आजतक ना सोनिया गांधी जी, राहुल गांधी ,प्रियंका गांधी जी पहुँचे लेकिन बाबर की मज़ार पर फूल चढ़ाने सभी परिवार गया,यह रिश्ता क्या कहलाता है?
#CongressDarkHistory — Dr Nishikant Dubey (@nishikant_dubey) November 22, 2026
यापूर्वी निशिकांत दुबे यांनी सोनिया गांधी यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांनी लिहिलेले, परदेशी नागरिक असूनही सोनिया गांधी या मारुती टेक्निकल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक आणि ५० टक्के भागधारक कशा झाल्या? २१ नोव्हेंबर १९७० रोजी संजय गांधी यांनी सोनिया गांधी यांच्या कंपनीसोबत करार केल्याचा उल्लेख यात आहे. मारुती कंपनीची स्थापना १९७० मध्ये झाली असली, तरी १९६८ मध्येच भारत सरकारने तिला मोटारगाड्या तयार करण्यासंदर्भात पत्र दिले होते, तसेच १९६९ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी मंत्रिमंडळाच्या आदेशानुसार, कंपनी अस्तित्वात येण्यापूर्वीच, सर्व राज्य सरकारांनी बसची बॉडी बनवण्यासाठी मारुतीला आगाऊ रक्कम दिली होती? सरकारी कंपन्यांनी पैसे न देता थेट मारुतीला सिमेंट, स्टील आणि कोळसा कसा पुरवला?
डिमिलिटेशनसाठी खासदारांना 150 कोटींची ऑफर? संजय राऊतांच्या दाव्यावर छगन भुजबळ यांचा पलटवार
पुढे त्यांनी लिहिले, तत्कालीन सरकारी नियमांनुसार परदेशी नागरिकाला भारतीय कंपनीचा संचालक होता येत नसताना सोनिया गांधी १९७० मध्ये संचालक कशा झाल्या? तसेच हरियाणा सरकारच्या नियमानुसार परदेशी नागरिकाच्या नावावर जमीन वाटप करता येत नसताना त्यांना १९७० मध्ये जमीन कशी मिळाली, पंतप्रधान कार्यालयात खासगी कंपनीचे कार्यालय कसे सुरू झाले आणि पंतप्रधानांचे खासगी सचिव धवन हे कंपनीचे संचालक कसे झाले? पंतप्रधानांच्या थेट आदेशानुसार, कंपनी अस्तित्वात येण्यापूर्वीच, सर्व राज्य सरकारांनी बसची बॉडी बनवण्यासाठी मारुतीला आगाऊ रक्कम दिली होती? सरकारी कंपन्यांनी पैसे न देता थेट मारुतीला सिमेंट, स्टील आणि कोळसा कसा पुरवला? याचाही खुलासा पुस्तकात करावा.