Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News : ‘स्वीकृत’ची अस्वीकृती शहराध्यक्षांच्या मुळावर! नाशिकमधील अंतर्गत राजकारणाची जोरदार चर्चा

नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या राजीनाम्याने पक्षांतर्गत राजकारण पुन्हा चर्चेत आले आहे. स्वीकृत सदस्यांच्या निवडीपासून महापालिका निवडणुकीतील नाराजीपर्यंत अनेक राजकीय घडामोडींवर या राजीनाम्यामुळे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 22, 2026 | 04:35 PM
nashik-bjp-sunil-kedar-resignation-nominated-corporators-politics

nashik-bjp-sunil-kedar-resignation-nominated-corporators-politics

Follow Us
Follow Us:
  • नाशिक महापालिकेतील ‘स्वीकृत’ नगरसेवकांवरून वाद
  • भाजपमधील अंतर्गत नाराजी आली समोर 
  • शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या राजीनाम्याची चर्चा 
Nashik Political News : श्याम बागूल: नाशिक : दहा महिन्याच्या प्रतिक्षेनंतर स्वीकृतचे घोंगडे गंगेत न्हाले. तीन प्रमुख पक्षाच्या दहा सदस्यांची मनपाच्या सभागृहात भर पडली व त्यातून जनतेचे प्रश्न मांडले जातील, विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा करण्यास हरकत नसल्याने सर्वच नवनियुक्तांचे त्यानिमित्ताने स्वागत व अभिनंदन अर्थातच त्यांना सहजासहजी स्वीकृत केलेले नाही हे मान्य करावे लागेल. त्यासाठी त्यांचे पक्षातील योगदान, नेत्याविषयीची निष्ठेलाही महत्व आहेच. याचा अर्थ ज्यांना डावलले गेले वा दिले गेले नाही त्यांचे पक्षात काही स्थानच नाही असेही नाही. मात्र पदरात पाडून घेण्यासाठी जे काही करावे लागते, त्यात ते कमी पडले हे मान्य करण्याशिवाय दुसरा पर्यायही नाही.

भाजपाचे घसघशीत सहा सदस्यांमुळे पक्ष आणखी बळकट झाला असे मानण्यासही हरकत नाही. महापालिका निवडणूकीत स्वबळावर शंभर प्लसचा नारा मतदारांनी यशस्वी होऊ दिला नाही व निवडणूकीनंतर पक्षात आणखी काही आयात होतील व शंभर प्लस आकडा गाठला जाईल ही अटकळही फोल ठरली. याचाच अर्थ स्वीकृतचे निमित्त असो वा मनपा निवडणूकीचे भाजपांतर्गत जे काही नाराजीचे फटाके फूटत आहेत, त्यांचा धमाका दिवाळीनंतरही सुरूच असल्याचे शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या राजीनाम्यामुळे उघड झाले. निवडणूकीपुर्वी भाजपाकडे आयातांची असलेली संख्या व पक्षाला आलेली भरती पाहूनही शंभर प्लस गाठता आले नाही यामागच्या कारणमिमांसेत अनेक घटना कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले.

परंतु एकहाती सत्ता मिळविली हे त्यातल्या सोयीस्कर असल्यामुळे कोणावर कारवाई झालीच नाही, उलट ज्यांनी ज्यांनी मनपा निवडणूकीत अपशकुनाचा प्रयत्न केला, त्यांना पक्षात पावन करून घेण्यात आले हीच काय ती उपलब्धतता. केंद्रात व राज्यात सत्ताधारी असलेल्या व शहरात ट्रिपल इंजिनचे सरकार चालविणाऱ्या पक्षाच्या शहराध्यक्षाला इतक्या लाजीरवानेपणाने पक्षाचा राजीनामा द्यावा लागावा ही बाब पाहिजे तितकी सहज वा सोपीही नाही. त्यांच्या राजीनाम्याने अनेक प्रश्न उपस्थित होतील, पक्षाच्या कारभाराची, कामकाजाचीही जाहीरपणे चर्चा होईल व पक्षाच्या प्रतिमेला तडा जाईल याचा विचार पक्षाने बहुधा केला असणार, सुनील केदार हे भाजपात अलिकडचे आयात नाहीत.

Political News : अखेर दोन्ही राष्ट्रवादीचे झाले एकमत! सुप्रिया सुळेंच्या ‘या’ मुद्द्याला सुनील तटकरेंनी दिला पाठिंबा

तीन दशकांपासून ते तत्कालीन सत्ताधाऱ्यांशी दोन हात करत आले. सहकार, राजकीय व शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत प्रश्नांवरून त्यांनी आपल्या कुवतीनुसार आवाज उठवित, भाजपाची वाटचाल सुरू ठेवली. त्यामुळे जेव्हा पक्षाला सुखाचे दिवस आले, तेव्हा त्यांनी अधिकची अपेक्षा केली असेल तर बिघडते कुठे असे त्यांचे समर्थक म्हणू शकतील. परंतु अगोदर देश, नंतर धर्म व सरतेशेवटी स्वतः अशी रचना असलेल्या पक्षाचा उलट दिशेने प्रवास सुरू झाल्याचे केदार यांना मान्य नसावे, किंबहुना ते देखील त्यात सहभागी झाले असावेत म्हणूनच एकेकाळी सतरंजी उचलणाऱ्यांच्या नशिबी अजूनही त्यापेक्षा वेगळे काम आलेले नाही हे जसे कबुल करावे लागेल.

तसेच ज्यांनी कायमच खुर्चा उबवल्या त्यांच्या वाट्याला खुर्च्याच आल्या हे देखील मान्य करावे लागेल. हे खरे असेल तर केदार यांनी पक्षाविषयी बांधलेली अटकळ खरी कशी ठरणार? पक्षाचे अध्यक्ष असले तरी, ते देखील कोणाचे तरी हुकूमाचे ताबेदार. त्यामुळे केदार म्हणजेच सर्वेसर्वा नव्हे. त्यामुळे स्वीकृतचे नाव निश्चितीत त्यांना एकट्यालाच जबाबदार धरणे द्रोह मानला जावा, स्वीकृतच्या नियुक्तीत केदार यांचा हात नसावा असे म्हणणेही धाडसाचे होईल. तसे नसते तर थेट प्रदेशाध्यक्षांची खप्पामर्जी तरी का व्हावी? किंवा निव्वळ तेवढेच कारण केदार यांच्या पदत्यागाशी संबंधित कसे मानता येईल? शहराध्यक्ष हा संघटनात्मक रचनेतील महत्वाचा दुवा.

डिमिलिटेशनसाठी खासदारांना 150 कोटींची ऑफर? संजय राऊतांच्या दाव्यावर छगन भुजबळ यांचा पलटवार

पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते एकाच तागडीत असावेत ही अपेक्षा अवास्तव नाही. केदार या भूमिकेला जागले नाहीत हा त्यांच्यावर मुख्य आक्षेप. ठराविक लोकप्रतिनिधींकडे त्यांचा झुकलेला खांदा बरेच काही सांगून जातो. त्यातूनच केदार यांच्या बदलाचे वारे सुरू झाले व वादळ स्वीकृतच्या रूपाने केदार यांच्या पदावर आदळले. आता पुढे काय असा प्रश्न निर्माण होईलही. त्याचे उत्तर पक्ष नेतृत्वच देईल. एकमात्र खरे केदार कठीण परिस्थितीतून जात असतांना त्यांच्या पाठीशी कोणी उभे राहिले नाही. पालकमंत्री व नाशिकचे सर्वेसर्वा असलेले गिरीष महाजन यांची भूमिका देखील तितकीच महत्वाची आहे. केदार यांच्यावर कारवाई होत असतांना महाजन यांनी चुप्पी साधणे देखील आश्चर्यकारकच.

💡

Frequently Asked Questions

  • Que: सुनील केदार यांच्या राजीनाम्याची चर्चा का सुरू झाली?

    Ans: नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर सुनील केदार यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली असून, यामागे पक्षांतर्गत नाराजी असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

  • Que: नाशिक महापालिकेत भाजपचे किती स्वीकृत सदस्य झाले?

    Ans: स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीत भाजपचे सहा सदस्य झाल्याचा उल्लेख लेखात करण्यात आला आहे.

  • Que: सुनील केदार यांच्या राजीनाम्यामुळे भाजपमध्ये कोणते प्रश्न निर्माण झाले?

    Ans: केदार यांच्या राजीनाम्यामुळे स्वीकृत नगरसेवकांची निवड, पक्षातील अंतर्गत नाराजी, नेतृत्वाची भूमिका आणि नाशिक भाजपमधील संघटनात्मक कामकाजावर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Web Title: Nashik bjp sunil kedar resignation nominated corporators politics nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 04:34 PM

Topics:  

  • BJP Politics
  • Nashik Latest News
  • political news

संबंधित बातम्या

डिमिलिटेशनसाठी खासदारांना 150 कोटींची ऑफर? संजय राऊतांच्या दाव्यावर छगन भुजबळ यांचा पलटवार
1

डिमिलिटेशनसाठी खासदारांना 150 कोटींची ऑफर? संजय राऊतांच्या दाव्यावर छगन भुजबळ यांचा पलटवार

Political News : अखेर दोन्ही राष्ट्रवादीचे झाले एकमत! सुप्रिया सुळेंच्या ‘या’ मुद्द्याला सुनील तटकरेंनी दिला पाठिंबा
2

Political News : अखेर दोन्ही राष्ट्रवादीचे झाले एकमत! सुप्रिया सुळेंच्या ‘या’ मुद्द्याला सुनील तटकरेंनी दिला पाठिंबा

Nashik News : अध्यक्षपदावरून संत निवृत्तीनाथ संस्थानात वाद; धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाकडे वारकऱ्यांचे लक्ष
3

Nashik News : अध्यक्षपदावरून संत निवृत्तीनाथ संस्थानात वाद; धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाकडे वारकऱ्यांचे लक्ष

Nashik Politics : नाशिक महापालिकेत स्वीकृत सदस्य निवडीचा वाद; नवीन शहराध्यक्षांच्या नियुक्तीची चर्चा
4

Nashik Politics : नाशिक महापालिकेत स्वीकृत सदस्य निवडीचा वाद; नवीन शहराध्यक्षांच्या नियुक्तीची चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.