Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नीतीश कुमार घेणार राज्यसभेची शपथ; बिहारच्या राजकारणातील हुक्कमी एक्का गाजवणार दिल्ली

नीतीश कुमार हे आज राज्यसभेची शपथ घेणार आहेत. त्याचबरोबर येत्या 14 एप्रिल रोजी ते बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. यामुळे बिहारच्या राजकारणामध्ये मोठा बदल होणार आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 10, 2026 | 12:50 PM
Nitish Kumar oath as Rajya Sabha MP marking a shift in Bihar politics marathi news

Nitish Kumar oath as Rajya Sabha MP marking a shift in Bihar politics marathi news

Follow Us
Close
Follow Us:
  • नीतीश कुमार घेणार राज्यसभेची शपथ
  • बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा लवकरच राजीनामा
  • नीतीश कुमार यांचा बिहारमधून दिल्ली राजकारणाकडे प्रवास
  • कोण होणार बिहारचे पुढचे मुख्यमंत्री?
Nitish Kumar Rajya sabha : नवी दिल्ली : नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य हे खासदारकीची शपथ घेत आहेत. दोन दिवसांपूर्वी शरद पवारांसह 19 खासदारांनी राज्यसभेची शपथ घेतली. त्याचबरोबर बिहारचे (Bihar Politics) मुख्यमंत्री राहिलेले नीतीश कुमार हे आज (दि.10 एप्रिल) शपथ घेणार आहे. आत्तापर्यंत नऊ वेळा बिहारचे विक्रमी मुख्यमंत्री राहिलेले नीतीश कुमार (Nitish Kumar) हे दिल्ली गाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

 

तब्बल दोन दशके बिहारच्या राजकारणाची सुत्रे हाती घेतलेले नीतीश कुमार यांनी आपला मोर्चा दिल्लीकडे वळवला आहे. राज्याच्या राजकारणातून बाहेर पडत त्यांनी दिल्लीच्या राजकारणामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. यामुळे बिहारसह सर्त्रत्र त्यांच्या राजकीय प्रवासाची चर्चा आहे. लवकरच ते मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असून राज्यसभेचे सदस्य म्हणून नवीन राजकीय प्रवासाला सुरुवात करणार आहेत.

नीतीश कुमार हे आज राज्यसभेची शपथ घेणार आहेत. त्याचबरोबर येत्या 14 एप्रिल रोजी ते बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. यामुळे बिहारच्या राजकीय वर्तुळामध्ये हालचालींना वेग आला आहे. त्यांच्यानंतर बिहारची धुरा कोण सांभाळणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. यानंतर 16 एप्रिल रोजी बिहारमध्ये नवे सरकार, नवे मुख्यमंत्री आणि नवे मंत्रिमंडळ स्थापन होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हे देखील वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जीव धोक्यात…! CIA कडे २२ दिवसांची मुदत मागितल्याचा दावा

बिहारचे पुढील मुख्यमंत्री कोण होणार?

बिहारमध्ये अनेक दशके मुख्यमंत्री राहिलेले नीतीश कुमार यांनी बिहारचा कारभार भाजपच्या हाती सुपूर्द केल्याचे स्पष्य झाले आहे. त्यामुळे पुढील मुख्यमंत्री भाजपचेच असतील हे आता जवळपास निश्चित झाल्यामुळे, अनेक नावांची चर्चा सुरू आहे. यामध्ये सम्राट चौधरी, नित्यानंद राय, डॉ. दिलीप जयस्वाल, रेणू देवी आणि जनक राम यांचा समावेश आहे. याचबरोबर पक्ष
एका नवीन चेहऱ्यावरही विश्वास ठेवू शकतो, ज्यामुळे राजकीय समीकरणे बदलू शकतात.

२० वर्षांनंतर बदलणारे चित्र

२००५ पासून सत्तेच्या केंद्रस्थानी असलेल्या नीतीश कुमार यांच्या जाण्याने बिहारच्या राजकारणात एका युगाचा अंत होत आहे, असे मानले जात आहे. त्यांच्या कार्यकाळात राज्याने अनेक बदल आणि आव्हाने बिहारसमोर येणार आहेत.. आता, त्यांच्या केंद्रातील प्रवेशामुळे राज्यात नवीन नेतृत्वशैलीसह एक नवीन सरकार कार्यरत होईल.

हे देखील वाचा : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू वर्धा दौऱ्यावर, MGAHV दीक्षांत समारंभास उपस्थित राहणार, तयारीला जोर

एनडीएची रणनीती आणि पुढील वाटचाल

एनडीएसाठी हा बदल धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. नीतीश कुमार यांचा अनुभव केंद्रात उपयुक्त ठरेल, तर बिहारमधील भाजपच्या नेतृत्वाखालील नवीन सरकार संघटना मजबूत करण्याच्या दिशेने काम करेल. सध्या सर्वात मोठा प्रश्न हा आहे की भाजप मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करते आणि नवीन सरकार कोणती प्राथमिकता ठरवते. येणारे दिवस बिहारच्या राजकारणासाठी निर्णायक ठरू शकतात.

Web Title: Nitish kumar oath as rajya sabha mp marking a shift in bihar politics marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 12:50 PM

Topics:  

  • Bihar Poliltics
  • Nitish Kumar
  • rajya sabha

संबंधित बातम्या

विरोधी पक्षांना मोठा धक्का! मुख्य निवडणूक आयुक्त Gyanesh Kumar यांच्याविरुद्धचा महाभियोग प्रस्ताव फेटाळला
1

विरोधी पक्षांना मोठा धक्का! मुख्य निवडणूक आयुक्त Gyanesh Kumar यांच्याविरुद्धचा महाभियोग प्रस्ताव फेटाळला

Sharad Pawar Wheelchair oath : शरद पवारांची जिद्द अन् चिकाटीचे सर्वत्र कौतुक; व्हीलचेअरवरुन घेतली राज्यसभेची शपथ
2

Sharad Pawar Wheelchair oath : शरद पवारांची जिद्द अन् चिकाटीचे सर्वत्र कौतुक; व्हीलचेअरवरुन घेतली राज्यसभेची शपथ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.