
nobel to modi
रशिया आणि युक्रेनमधील (Russia Ukraine War) युद्धामध्ये भारत महत्त्वाची भूमिका निभावत आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांचं नोबेल पुरस्कार समितीने कौतुक केलं आहे. नोबेल (Nobel Award) समितीचे उपनेते असल तोजे (Asle Toje) म्हणाले की, “भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मोदी यांनी कुठल्याही प्रकारची धमकी न देता युद्धाच्या परिणामांबद्दल संदेश दिला. मैत्रीच्या मार्गाने त्यांनी त्यांचं स्थान दाखवून दिलं. आंतरराष्ट्रीय राजकारणात अशा गोष्टींची खूप आवश्यकता आहे.”
India’s intervention to remind Russia of the consequences of using Nuclear weapons was very helpful. India didn’t speak in a loud voice, didn’t threaten anybody, they just made their position known in a friendly manner. We need more of that in International politics: Asle Toje,… https://t.co/mXndgFKdhY pic.twitter.com/fa6asPVmud — ANI (@ANI) March 16, 2023
परराष्ट्र धोरणाचे अभ्यासक आणि नोबेल शांतता पुरस्कार समितीचे सदस्य असल तोजे सध्या भारत दौऱ्यावर आहेत. दरम्यान, प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, भारत एक महासत्ता होऊ शकतो. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचंही त्यांनी कौतुक केलं. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना नोबेल शांतता पुरस्कार मिळणार का ? अशी चर्चा सुरु झाली आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल नोबेल समितीचे नेते असल तोजे म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नोबेल शांतता पुरस्काराचे प्रबळ दावेदार आहेत. पीएम मोदी हे अत्यंत विश्वासू नेते आहेत. मोदी शांतता प्रस्थापित करू शकतात. ते जगातल्या अशा नेत्यांपैकी एक आहेत जे शांततेसाठी योगदान देत आहेत. मोदींनी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना सांगितलं की, हे युद्धांचं युग नाही.”
[read_also content=”भारतीय सैन्याच्या चित्ता हेलिकॉप्टरचा अरुणाचल प्रदेशात अपघात, वैमानिकांचा शोध सुरु https://www.navarashtra.com/india/cheetah-helicopter-crash-in-arunachal-pradesh-nrsr-376474/”]
नोबेल समितीचे नेते तोजे म्हणाले की, “भारताला एक विकसित राष्ट्र बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठं योगदान देत आहेत. भारताला शांततेचा वारसा लाभला आहे, त्यामुळे भारत महासत्ता होणार हे नक्की.” तसेच तोजे म्हणाले की, “युद्ध थांबवण्यासाठी पंतप्रधान मोदी सर्वात विश्वासार्ह नेते आहेत आणि ते जगभरात शांतता प्रस्थापित करू शकतात.”
नोबेल शांतता पुरस्कारासाठी मोदींच्या नावाची चर्चा होण्याची ही काही पहिलीच वेळी नाही. याआधीही अनेकदा अशा चर्चा झाल्या आहेत.