Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 25 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral Video : हरिभक्तांच्या गर्दीत मोदीभक्त! विठ्ठलाच्या नगरीत पंतप्रधानांची पूजा; चक्क चंद्रभागेत घातले स्नान

आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात विठ्ठलभक्तीऐवजी राजकीय नेत्याच्या पूजेचा वादग्रस्त प्रकार समोर आला. कीर्तनकार संग्रामबापू भंडारे पाटील व त्यांच्या साथीदारांनी पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेला चंद्रभागेत दुग्धाभिषेक घातला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 25, 2026 | 07:21 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • हरीपूजा बाजूला सारून आपल्या आवडत्या नेत्याचीच पूजा करण्यास सुरुवात केली आहे.
  • कीर्तनकार आणि त्यांचे सवंगडी मोदींच्या प्रतिमेला चंद्रभागेत दुग्धाभिषेक घालताना दिसत आहेत.
  • नेटकऱ्यांनी चांगलाच समाचारही घेतला आहे.
आज आषाढी एकादशी! विठ्ठलाचा दिवस, संतांचा दिवस! वारकऱ्यांचा दिवस, भक्ती–श्रद्धेचा दिवस! पण आजची भक्ती आणि श्रद्धा असते, ती फक्त विठ्ठल–रखुमाईच्या नावी. परंतु, देशामध्ये पक्षप्रेम इतका वाढला आहे की लोकांना देव ओळखण्यातही अडचण येत आहे. अगदी पूजा कुणाची करावी? कुणाला कितपत स्थान द्यावं? याचं उत्तरही लोकांना शोधता येईना झाले आहे. विठ्ठलाच्या या दिवशी काहींनी तर हरीपूजा बाजूला सारून आपल्या आवडत्या नेत्याचीच पूजा करण्यास सुरुवात केली आहे.

Dharmendra Pradhan Resignation: एक राजीनामा… आणि बॉलिवूडमध्ये खळबळ! प्रतिक्रियाांचा स्फोट! कोण काय म्हणालं?

आषाढी एकादशी निमित्त अनेक वारकारीमंडळी देवाच्या भेटीसाठी पंढरपूर नगरीत येतात. चंद्रभागेच्या तीरावर अंघोळ करतात. आपल्या पुज्यनीय वडीलधाऱ्यांना स्नान घालणे पुण्याचे काम मानले जाते. अशामध्ये वारकरी म्हणून पंढरपुरात आलेल्या काही मंडळींनी हद्दच पार केली आहे. याला पंतप्रधान मोदींवरचे प्रेम म्हणावे की मोदीभक्ती? असा सवाल तुम्हालाही नक्कीच येईल. संग्रामबापू भंडारे पाटील या कीर्तनकारांनी त्यांच्या @sangrambapu_bhandare_pateel या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये कीर्तनकार आणि त्यांचे सवंगडी मोदींच्या प्रतिमेला चंद्रभागेत दुग्धाभिषेक घालताना दिसत आहेत.

काय आहे पोस्ट?

पोस्टमध्ये कीर्तनकार संग्रामबापू भंडारे पाटील आणि त्यांचे साथीदार पंतप्रधान मोदी यांच्या प्रतिमेला दुधाने अंघोळ घालताना दिसत आहेत. चंद्रभागेच्या पात्रात मोदी यांना चंद्रभागेच्या पवित्र पाण्याने अंघोळ घातली जात आहे. लोकांना कीर्तनातून चार चांगल्या गोष्टी सांगणाऱ्या कीर्तनकाराचे हे कृत्य पाहून सोशल मीडियावर नेटकरी चांगलेच तापले आहेत. नेटकऱ्यांनी चांगलाच समाचारही घेतला आहे.

संग्रामबापू भंडारे पाटील यांनी या व्हिडीओखाली “modi is the boss” असे नमूद करत पंतप्रधान मोदींना टॅगही केले आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात जिथे विठ्ठलची पूजा केली जाते, संतामहंतांची पूजा केली जाते, त्याच ठिकाणी एका पक्षीय नेत्याला देव म्हणून पुजले जाते, असा प्रकार फार निंदनीय असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. अनेक वारकऱ्यांनी तसेच हरिभक्तांनी सोशल मीडियावर या गोष्टीचा निषेध केला आहे.

Dharmendra Pradhan Resignation : चिन्मय मांडलेकरांनी Gen Z ला केला सलाम! प्रधानांच्या राजीनाम्यानंतर केली विशेष पोस्ट

काय म्हणत आहेत नेटकरी?

एका नेटकाऱ्याने संग्राम पाटील यांच्या या पोस्टखाली कमेंट करत प्रश्न विचारला आहे की, “भावा… स्वतःच्या आईवडिलांना तरी कधी अंघोळ घातली आहेस का?” तर दुसऱ्या नेटकाऱ्याने कमेंट केलीये “कुणीही त्यांना वाईट बोलू नये. हे त्यांनी केलेले पाप धुवायचा प्रयत्न करत आहेत.” तर काही मोदीप्रेमींनी या पोस्टखाली “जब तक सूरज चांद रहेगा, नरेंद्र मोदीजी का नाम रहेगा!” अशी कमेंट केली आहे.

Web Title: Pandharpur kirtankar bathes pm modi photo in chandrabhaga ashadhi ekadashi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 07:21 PM

Topics:  

  • BJP
  • modi news
  • narendra modi

संबंधित बातम्या

काँग्रेसने गुंडाळलेल्या योजनांना मुख्यमंत्र्यांची गती, ‘७५ वर्षे शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवले’; रवींद्र चव्हाणांचा घणाघात
1

काँग्रेसने गुंडाळलेल्या योजनांना मुख्यमंत्र्यांची गती, ‘७५ वर्षे शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवले’; रवींद्र चव्हाणांचा घणाघात

सोनम वांगचुक यांनी सोडले उपोषण! केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांची रुग्णालयात भेट; आंदोलनातील मुद्द्यांवर चर्चेची शक्यता
2

सोनम वांगचुक यांनी सोडले उपोषण! केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांची रुग्णालयात भेट; आंदोलनातील मुद्द्यांवर चर्चेची शक्यता

PM Modi On NEET Paper Leak: प्रधानमंत्रींचे NEET पेपरफुटीवर पहिले जाहिर वक्तव्य! ‘गुन्हेगार ताब्यात! आज कॅबिनेटमध्ये होणार चर्चा
3

PM Modi On NEET Paper Leak: प्रधानमंत्रींचे NEET पेपरफुटीवर पहिले जाहिर वक्तव्य! ‘गुन्हेगार ताब्यात! आज कॅबिनेटमध्ये होणार चर्चा

केडीएमसी महासभेतील गदारोळानंतर मनसे-भाजप आमनेसामने; ‘सत्तेसाठी भाजपा लाचार, अभिमान असेल तर…’ मनसेकडून भाजपावर हल्लाबोल
4

केडीएमसी महासभेतील गदारोळानंतर मनसे-भाजप आमनेसामने; ‘सत्तेसाठी भाजपा लाचार, अभिमान असेल तर…’ मनसेकडून भाजपावर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.