
Old video of PM Narendra Modi viral after rupee depreciates by 90 against dollar
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया दररोज घसरत आहे, प्रति डॉलर 90.14 चा विक्रमी नीचांक आहे. हा रुपयाचा सर्वकालीन नीचांक आहे. ही घसरण अशा वेळी झाली आहे जेव्हा भारताचा जीडीपी वेगाने वाढत आहे. रिझर्व्ह बँकेची एमपीसी बैठक देखील सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत, रिझर्व्ह बँक रुपयाबाबत मोठी पावले उचलू शकते. हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.सततच्या रुपयाच्या घसरणीमुळे भारतीय चलन इतके कमकुवत कशामुळे झाले असा सामान्य नागरिक प्रश्न विचारत आहे. दरम्यान, कॉंग्रेस सरकार असताना रुपयाची किंमत यापेक्षा बरी होती. मात्र नरेंद्र मोदी यांनी आपल्या जाहीर भाषणामध्ये सरकारवर हल्लाबोल केला होता. आमदार रोहित पवार यांनी मोदींचा जुना व्हिडिओ शेअर करत टीकास्त्र डागले.
हे देखील वाचा : रुपया कोसळला, डॉलरने मोडले सर्व विक्रम! आंतरराष्ट्रीय बाजारातील या वाईट स्थितीची नेमकी कारणं काय?
रोहित पवार यांनी व्हायरल केलेल्या नरेंद्र मोदी यांच्या व्हिडिओमध्ये रुपया घसरल्याने आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. यामध्ये नरेंद्र मोदी म्हणत आहेत की, “रुपया असा नाही घसरत मित्रांनो…मी शासनामध्ये बसलो आहे. मला माहिती..अशाप्रकारे एवढ्या तेजीने रुपया घसरु शकत नाही. नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका आणि पाकिस्तानची करन्सी घसरत नाही. मात्र भारताच्या रुपयाचा हा दिवसेंदिवस दर्जा खाली जात आहे. याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. मी तुम्हाला याबाबत प्रश्न विचारत आहे,” असे नरेंद्र मोदी यांचे भर सभेतील भाषण समोर आले आहे. यावरुन आमदार रोहित पवारांनी देखील निशाणा साधला.
आज डॉलरच्या तुलनेत रुपयाने नव्वदी ओलांडली असून शतकी खेळी करण्याकडं वाटचाल सुरुय.. अशा परिस्थितीत मा. नरेंद्र मोदी साहेबांचं २०१४ पूर्वीचं हे भाषण आजही तंतोतंत लागू पडतंय. त्यावेळी ते तत्कालीन केंद्र सरकारला विचारत होते ‘‘जवाब देना पडेगा आपको, देश आपसे जवाब मांग रहा हैं!’’ आजही… pic.twitter.com/jaMYy5rvz0 — Rohit Pawar (@RRPSpeaks) December 4, 2025
हे देखील वाचा : नवले पुलावरील अपघातांचा मुद्दा लोकसभेत; सुप्रिया सुळेंच्या प्रश्नावर गडकरींनी दिलं आश्वासन
नरेंद्र मोदींचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रोहित पवारांनी जोरदार निशाणा साधला. रोहित पवारांनी लिहिले आहे की, “आज डॉलरच्या तुलनेत रुपयाने नव्वदी ओलांडली असून शतकी खेळी करण्याकडं वाटचाल सुरुय.. अशा परिस्थितीत मा. नरेंद्र मोदी साहेबांचं २०१४ पूर्वीचं हे भाषण आजही तंतोतंत लागू पडतंय. त्यावेळी ते तत्कालीन केंद्र सरकारला विचारत होते ‘‘जवाब देना पडेगा आपको, देश आपसे जवाब मांग रहा हैं!’’ आजही देश केंद्र सरकारला हेच विचारतोय..!” असा टोला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी लगावला आहे.