Operation Alakh:
Operation Alakh: ऑपरेशन अखल अंतर्गत, जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये आणखी एक दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यास सैन्याला यश आले आहे. मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मोहिमेत आतापर्यंत एकूण २ दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे. माहितीनुसार, हा ५ लष्कर दहशतवाद्यांचा गट असून त्यातील ३ दहशतवादी अजूनही जीवंत असून त्यांचा शोध सुरू आहे.
कुलगामच्या अखल भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार सुरू आहे. वेढा घातलेल्या जंगलात आणखी २-३ दहशतवादी अडकल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुलवामा येथील रहिवासी हरिस नजीर डार (टीआरएफ) हा अखल, कुलगाममध्ये सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत ठार झाल्याचे सांगितले जात आहे. ऑपरेशन दरम्यान एके-४७ रायफल, एके मॅगझिन आणि ग्रेनेडसह शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. ट्विटर एक्स वर पोस्ट करून माहिती देताना, भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी आतापर्यंत एका दहशतवाद्याला ठार केले आहे. एसओजी, जम्मू-काश्मीर पोलिस, सेना आणि सीआरपीएफ एकत्रितपणे ही कारवाई करत आहेत.
#Bringbackmadhuri:जात-पात-धर्म सोडून माधुरीसाठी कोल्हापुरकर एकवटले; नांदणीतून मोर्चाला सुरूवात
१ ऑगस्टच्या रात्री सुरू झालेल्या शोध मोहिमेनंतर, सुरक्षा दलांनी शनिवारी २ दहशतवाद्यांना ठार केले. पुलवामा येथील हरिस नजीर डार अशी एका दहशतवाद्याची ओळख पटली. पहलगाम हल्ल्यानंतर २६ एप्रिल रोजी गुप्तचर संस्थांनी ज्या १४ स्थानिक दहशतवाद्यांची नावे जाहीर केली होती, त्यांच्या यादीत सी-श्रेणीतील दहशतवादी हरिसचा समावेश होता. त्याच्याकडून एके-४७ रायफल, मॅगझिन-ग्रेनेड आणि दारूगोळा जप्त करण्यात आला.
शनिवारी चकमकीत एक लष्करी जवान जखमी झाला. रविवारी आणखी एक सैनिक जखमी झाला. दोघांवरही श्रीनगरमधील ९२ बेस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. स्पेशल ऑपरेशन ग्रुप, जम्मू-काश्मीर पोलिस, लष्कर आणि सीआरपीएफ ‘ऑपरेशन अखल’ राबवत आहेत. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी हायटेक पाळत ठेवणारी यंत्रणा वापरली जात आहे.
कुलगाममध्ये शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार केला. शनिवारी, एका अधिकाऱ्याने सांगितले होते की, परिसरात दहशतवादी कारवायांची गुप्त माहिती मिळाल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी शोध मोहीम सुरू करण्यात आली. यादरम्यान, दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला, त्यानंतर चकमक सुरू झाली. जंगलात लपलेल्या एकूण दहशतवाद्यांची माहिती अद्याप कळू शकलेली नाही. कारवाई करण्यासाठी अधिक सुरक्षा दलांना त्या भागात पाठवण्यात आले आहे.
रवींद्र जडेजाने केली विश्वविक्रमाची बरोबरी, सुनील गावस्कर यांना मागे टाकुन बनला नंबर 1 भारतीय
जम्मू आणि काश्मीरमध्ये या आठवड्यात ही तिसरी चकमक आहे. यापूर्वी, २८ जुलै रोजी, ऑपरेशन महादेव अंतर्गत, सुरक्षा दलांनी लिडवासच्या जंगलात पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या ३ दहशतवाद्यांना ठार मारले होते. ३१ जुलै रोजी, पूंछमधील नियंत्रण रेषेजवळ घुसखोरी करताना आणखी दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले होते.
१४ स्थानिक दहशतवाद्यांपैकी ७ जण ठार झाले होते, आता ७ जणांचा शोध सुरू आहे सुरक्षा दलांनी ज्या १४ दहशतवाद्यांची यादी जाहीर केली होती त्यापैकी ७ जण आतापर्यंत ठार झाले आहेत. हरिस नजीर वगळता, उर्वरित ६ दहशतवादी मे महिन्यात शोपियान आणि पुलवामा येथे झालेल्या चकमकीत मारले गेले.
१३ मे रोजी शोपियानमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची नावे शाहिद कुट्टे, अदनान शफी, अहसान उल हक शेख अशी होती. १५ मे रोजी पुलवामा येथे झालेल्या चकमकीत आमिर नझीर वाणी, यावर अहमद भट आणि आसिफ अहमद शेख हे मारले गेले.
Nashik Crime : नाशिक हादरलं! दोन अल्पवयीनांनी आपल्याच मित्राची केली हत्या; बेंचवर बसण्यावरून झालं
२८ जुलै रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाइंडसह ३ दहशतवादी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ऑपरेशन महादेवच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच २९ जुलै रोजी पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना ठार मारल्याची माहिती दिली. २८ जुलै रोजी मारले गेले. त्यांची नावे सुलेमान, अफगाण आणि जिब्रान आहेत. पहलगाम हल्ल्यात हे तीन दहशतवादी सहभागी होते. शाह म्हणाले, ‘पाकिस्तानी मतदार ओळखपत्र-चॉकलेटवरून पहलगाममधील दहशतवाद्यांना ओळखले. हल्ल्याच्या दिवशीच नियोजन केले, ३ महिने ट्रॅक केले आणि नंतर त्यांना घेरले आणि मारले. आमच्याकडे याचे पुरावेही आहेत.’ ते म्हणाले की दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या दोन आरोपींनाही अटक करण्यात आली आहे.