Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज ठाकरेंना विरोध केला आता आदित्य ठाकरेंनाही विरोध करणार का?; ब्रृजभूषण सिंह म्हणाले…

राज ठाकरे यांचे पुतणे आणि  शिवसेनेचे नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे अयोध्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याचं ब्रृजभूषण सिंह यांनी स्वागत केलं आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 13, 2022 | 08:53 PM
राज ठाकरेंना विरोध केला आता आदित्य ठाकरेंनाही विरोध करणार का?; ब्रृजभूषण सिंह म्हणाले…
Follow Us
Follow Us:

अयोध्या : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्याला भाजपचे खासदार ब्रृजभूषण सिंह यांनी कडाडून विरोध केला होता. त्यामुळे राज ठाकरेंना आपला दौरा रद्द करावा लागला आहे. पण आता राज ठाकरे यांचे पुतणे आणि  शिवसेनेचे नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे अयोध्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याचं ब्रृजभूषण सिंह यांनी स्वागत केलं आहे.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे 15 जून रोजी अयोध्येला जाणार आहेत.. अयोध्येत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्याला कडाडून विरोध करणारे भाजपचे खासदार ब्रृजभूषण यांनी मात्र आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याचे स्वागत केलंय.

खासदार ब्रृजभूषण नेमकं काय म्हणाले? 

‘आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्याला येत आहे, मला याआधीही विचारलं होतं की, राज ठाकरे यांना विरोध केला होता तर आदित्य ठाकरेंना विरोध करणार का, तर माझं उत्तर असं आहे, माझा विरोध हा एका व्यक्तीला आहे. उत्तर भारतीय लोकांसोबत राज ठाकरे आणि त्यांच्या लोकांनी चांगला व्यवहार केला नाही. त्यांना चांगली वागणूक दिली नाही. त्यामुळे आमचा त्यांना विरोध आहे, महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीला आमचा विरोध नाही. आदित्य ठाकरे येत आहे, त्यांचं स्वागत आहे, असं ब्रृजभूषण सिंह म्हणाले.

एवढंच नाहीतर, हनुमान गढीचे प्रबंधक असलेल्या व्यक्तीला आदित्य ठाकरे यांचं स्वागत करण्यासाठी सांगितलं आहे. आदित्य ठाकरे जेव्हा येतील तेव्हा त्यांचं जंगी स्वागत केलं जाईल, असंही बृजभुषण यांनी स्पष्ट केलं.

पुढे म्हणाले, आदित्य ठाकरे ज्या दिवशी अयोध्यात येत आहे, त्यादिवशी मी देशाच्या बाहेर आहे. त्यांना भेटायला आवडेल. पण मी आधीच दौरा निश्चित केला आहे. त्यामुळे भेटू शकणार नाही. आमचा विरोध फक्त हा राज ठाकरे यांना आहे, असंही सिंह यांनी ठणकावून सांगितलं. तसंच, आदित्य ठाकरे हे राज ठाकरे यांचे पुतणे जरी असले तरी ठाकरे कुटुंबाने आणि शिवसेनेनं कधीही उत्तर भारतीयांसोबत चुकीचा व्यवहार केला नाही.

[read_also content=”आघाडीत बिघाडी नाही, विधानपरिषदेच्या सहा जागा जिंकणारच; मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला विश्वास https://www.navarashtra.com/maharashtra/the-front-is-not-bad-it-will-win-six-seats-in-the-legislative-council-minister-balasaheb-thorat-expressed-confidence-nrdm-292307.html”]

पण, मनसे आणि राज ठाकरे यांनी सर्व देशासमोर उत्तर भारतीयांना अपमानित केले आहे. अयोध्या ही सर्वांची आहे, हिंदूंची आहे, मराठा समाजाची आहे. सर्वांनी यावं, आदित्य ठाकरेंनी यावं, उद्धव ठाकरे यांनीही किंवा कुणीही यावं त्यांचं स्वागत आहे, असंही ब्रृजभूषण सिंह यांनी ठणकावून सांगितलं.

Web Title: Opposed raj thackeray will he oppose aditya thackeray now brijbhushan singh said nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2022 | 08:53 PM

Topics:  

  • aaditya thackeray
  • ayodhya
  • MNSRaj Thackeray
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Raigad News: अलिबाग-रोहा मार्ग पुन्हा फोडून काँक्रीटीकरण सुरू! वर्षभरातच रस्ता झाला खराब, नागरिक त्रस्त
1

Raigad News: अलिबाग-रोहा मार्ग पुन्हा फोडून काँक्रीटीकरण सुरू! वर्षभरातच रस्ता झाला खराब, नागरिक त्रस्त

Chandrapur News: कापूस उत्पादकांवर दुष्काळाचे संकट; उत्पादनात 35-50% घट होण्याची शक्यता, पंचनामे आणि सर्वेक्षणाला सुरुवात
2

Chandrapur News: कापूस उत्पादकांवर दुष्काळाचे संकट; उत्पादनात 35-50% घट होण्याची शक्यता, पंचनामे आणि सर्वेक्षणाला सुरुवात

Vasai-Virar News: वसई-विरार नाट्यगृहाला ‘मजेटीया’ नाव देण्यास विरोध; ‘या’ नावाची मागणी, आंदोलनाचा इशारा
3

Vasai-Virar News: वसई-विरार नाट्यगृहाला ‘मजेटीया’ नाव देण्यास विरोध; ‘या’ नावाची मागणी, आंदोलनाचा इशारा

वसई-विरार महापालिकेविरोधात मनसेचे ‘भीक मांगो’ आंदोलन;स्मशानभूमी कंत्राटातील कथित गैरव्यवहाराचा आरोप
4

वसई-विरार महापालिकेविरोधात मनसेचे ‘भीक मांगो’ आंदोलन;स्मशानभूमी कंत्राटातील कथित गैरव्यवहाराचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.