नवी दिल्ली – दिल्लीमध्ये धक्कादायक चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. पंजाब यूनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरु जीसी चटर्जी यांना पद्मभूषम पुरस्काराने गौरवण्यात आले होते. मात्र त्यांचे पद्मभूषम पदक चोरीला गेले. मात्र दिल्ली पोलिसांनी लगेचच शोधकार्य सुरु करत चोरट्यांना अटक केली आहे. यामध्ये सोनाऱ्याने दाखवलेल्या हुशारीमुळे चोरांना अटक करण्यास मदत झाली आहे.
दिल्ली पोलिसांनी पद्मभूषण चोऱ्यांना अटक केलेल्यांची नावे, श्रवण कुमार (वय 33 वर्षे), हरि सिंह (वय 45 वर्षे), रिंकी देवी (वय 40 वर्षे), वेद प्रकाश (वय 39 वर्षे) आणि प्रशांत बिस्वास (वय 49 वर्षे) अशी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व आरोपी मदनपूर खादरचे रहिवासी आहेत. या आरोपींमधील रिंकी देवी, वेद प्रकाश आणि हरि सिंह हे मंगळवारी सोन्याच्या दुकानामध्ये पुरस्कार विकण्यासाठी आले होते. प्रशांत बिस्वास याच्या ज्वेलरी शॉप मध्ये आरोपी लोक पद्मभूषण पुरस्काराचे पदक घेऊन आले होते. मात्र सोनाऱ्याने पद्मभुषण स्वीकारले नाही. आणि याची माहिती पोलिसांना कळवली.
दिल्ली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत आरोपींनी ज्वेलरी शॉपमधून पळ काढला होता. यानंतर एसीपी अधिकाऱ्याच्या नेतृत्त्वामध्ये टीम स्थापन करण्यात आली. परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात आले. यातून आरोपींना शोधण्यास मदत झाली. तीन आरोपींची ओळख झाली होती. यात हरि सिंह, रिंकी देवी आणि प्रकाश बिस्वास यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरु करण्यात आली. यात कळालं की श्रवण कुमार याने पुरस्कार चोरला होता. त्यालाही अटक करण्यात आलीये. श्रवण हा जीसी चटर्जी यांचे नातू समरेश चटर्जी यांच्याकडे मेडिकल मदतनीस म्हणून काम करतो. समरेश चटर्जी यांची तब्येत टीक नसल्याने श्रवण त्यांना मदत करतो. ते एकटेच घरी राहतात. याचा फायदा घेऊन त्याने पुरस्कार चोरला. त्याने पुरस्कार विकण्यासाठी हरि सिंह, रिंकी देवी, वेद प्रकाश यांना दिला होता. पोलिसांनी पुरस्कार जप्त केला आहे.