Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

15 दिवस नवऱ्यासोबत अन् 15 दिवस…; 10 वेळा पळून गेलेल्या विवाहितेची अजब ऑफर

उत्तर प्रदेशमधील रामपूर जिल्ह्यातून एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे, ज्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 26, 2025 | 06:16 PM
15 दिवस नवऱ्यासोबत अन् 15 दिवस...; 10 वेळा पळून गेलेल्या विवाहितेची अजब ऑफर

15 दिवस नवऱ्यासोबत अन् 15 दिवस...; 10 वेळा पळून गेलेल्या विवाहितेची अजब ऑफर

Follow Us
Close
Follow Us:

उत्तर प्रदेशमधील रामपूर जिल्ह्यातून एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे, ज्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. एका विवाहित महिलेने गावाच्या पंचायतीत असा प्रस्ताव ठेवला, तो ऐकून तिचा पती, पंचायतीचे सदस्य आणि गावकरी थक्क झाले. या महिलेने स्पष्टपणे सांगितले की, तिला महिन्यातील 15 दिवस तिच्या पतीसोबत आणि 15 दिवस तिच्या प्रियकरासोबत राहायचे आहे. ही महिला आतापर्यंत 10 वेळा तिच्या प्रियकरासोबत पळून गेली आहे, आणि तिचा हा वादग्रस्त प्रस्ताव आता परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.

हे संपूर्ण प्रकरण अझीमनगर पोलीस स्टेशन परिसरातील आणि रामपूरच्या तांडा पोलीस स्टेशन परिसरातील दोन गावांशी संबंधित आहे. मिळालेल्या माहितीनुसार अझीमनगर पोलीस स्टेशन परिसरातील एका तरूणीच लग्न दीड वर्षांपूर्वी शेजारच्या गावात राहणाऱ्या एका तरुणाशी झालं होतं. लग्नाच्या काही दिवसांनंतर, विवाहित महिलेचं तांडा पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या एका तरुणावर प्रेम प्रकरण सुरु झालं. एक वर्षापूर्वी ती महिला तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. पंचायतीनंतर पतीने पत्नीला घरी परत नेले. मात्र यानंतर ती महिला एकाच वर्षात तब्बल 9 वेळा पळून गेली होती. मात्र शेवटच्या वेळी ती घरी परत आलीच नाही.

अखेर आठवड्यापूर्वी तिच्या पतीने अझीमनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यादरम्यान, पतीने गुन्हा दाखल न करता पत्नीला तिच्या प्रियकराकडून परत आणण्याची मागणी केली होती. पोलिसांनी पत्नीला परत आणलं आणि पतीच्या स्वाधीन केले. पण अवघी एक रात्र पतीच्या घरी घालवल्यावर ती महिला चक्क 10 व्यांदा तिथून फरार झाली. पत्नी पुन्हा घरातून बेपत्ता झाल्याचे कळताच पतीला धक्का बसला. यानंतर, पती आपल्या पत्नीच्या प्रियकराच्या घरी गेला तेव्हा त्याला त्याची पत्नी तिथे आढळली. पतीने आपल्या पत्नीला खूप समजावण्याचा प्रयत्न केला आणि तिला घरी परतण्यास सांगितले.

दरम्यान त्यानंतर पंचायत बोलावण्यात आली. आणि तिथेच पत्नीने सर्वांसमोर अजब प्रस्ताव ठेवला. मी 15 दिवस पतीसोबत आणि 15 दिवस प्रियकरासोबत राहू इच्छिते असं तिने सर्वांना सांगितलं. मात्र तिचं हे बोलणं, तो प्रस्ताव ऐकताच पंचायतीत उपस्थित असलेले लोक हैराण झाले. पत्नीचा प्रस्ताव ऐकताच पती तर थेट हात जोडूनच उभा राहिला. तो म्हणाला, मला माफ कर, आता तू तुझ्या प्रियकरासोबतच रहा. यानंतर, पतीने त्याच्या पत्नीला तिच्या प्रियकराच्या घरी सोडलं आणि तो थेट त्याच्या आपल्या घरी परतला. ही घटना संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनली आहे.

Web Title: Married woman who ran away with boyfriend makes strange demand in village panchayat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2025 | 06:16 PM

Topics:  

  • crime news
  • Police News
  • uttar pradesh crime

संबंधित बातम्या

खराडीत तरुणावर कोयत्याने हल्ला; तोंडावर अन् डोक्यात कोयत्याने सपासप वार
1

खराडीत तरुणावर कोयत्याने हल्ला; तोंडावर अन् डोक्यात कोयत्याने सपासप वार

Crime News Updates : खळबळजनक! ग्रामपंचायत कार्यालय फोडून अज्ञाताने जाळले दस्तावेज
2

Crime News Updates : खळबळजनक! ग्रामपंचायत कार्यालय फोडून अज्ञाताने जाळले दस्तावेज

परभणीत दोन गटात राडा; लाठ्याकाठ्यांनी केली गेली मारहाण, कारण आलं समोर…
3

परभणीत दोन गटात राडा; लाठ्याकाठ्यांनी केली गेली मारहाण, कारण आलं समोर…

शालेय विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार; गर्भवती होताच पालकांना धक्काच बसला अन् नंतर थेट…
4

शालेय विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार; गर्भवती होताच पालकांना धक्काच बसला अन् नंतर थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.