Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News Live Updates : खळबळजनक! ग्रामपंचायत कार्यालय फोडून अज्ञाताने जाळले दस्तावेज

Crime News Live Updates Marathi : आज दिनांक 26 - 08- 2025 रोजी देश-विदेशासह राज्यातील गुन्हेगारी संदर्भातल्या ताज्या घडामोडींचे अपडेट वाचा फक्त एका क्लिकवर...

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 26, 2025 | 01:20 PM
LIVE
Crime News Live Updates

Crime News Live Updates

Follow Us
Close
Follow Us:
  • 26 Aug 2025 01:20 PM (IST)

    26 Aug 2025 01:20 PM (IST)

    इन्स्टाग्रामवर बदनामी, मानसिक छळ व जबरदस्तीच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या

    नाशिक मधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीला जबरदस्तीने प्रेमसंबंध ठेवण्यास सांगून सातत्याने तिचा छळ करण्यात येत होता. तसेच इंस्टाग्रामवर फोटो ठेवून बदनामी तिची बदनामी करण्यात आली. या बदामी आणि सातत्याच्या त्रासाला कंटाळून एका मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

  • 26 Aug 2025 12:45 PM (IST)

    26 Aug 2025 12:45 PM (IST)

    गणेशोत्‍सवासाठी पुणे पोलिसांचा तगडा बंदोबस्‍त

    यंदाच्या गणेशोत्सवासाठी पुणे पोलिसांनी कायदा सुव्यवस्था आणि सुरळीत वाहतुकीसाठी सात हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे. यंदा पुणे पोलिसांनी यासोबतच तंत्रज्ञानाचा देखील मोठा वापर केला आहे. त्यामध्ये ५० मेटल डिटेक्टर गेटस्‌, १५० हँड हेल्ड डिटेक्टर बसविणे, मेट्रो स्थानक परिसरात गर्दी नियंत्रणासाठी स्वतंत्र यंत्रणा, दंगा नियंत्रण प्रात्यक्षिके, अशा ठोस उपाययोजना करण्यात आल्या आहेत. गणेशोत्सवाला (दि. २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर) बुधवारपासून सुरूवात होत आहे. या काळात पुण्यात मोठा उत्साह असतो. यंदा ३९५९ सार्वजनिक मंडळे गणेशोत्सव साजरा करत आहेत, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील, राजेश बनसोडे, पंकज देशमुख, उपायुक्त निखिल पिंगळे, हिंमत जाधव आणि डॉ. संदीप भाजीभकरे उपस्थित होते.

  • 26 Aug 2025 12:25 PM (IST)

    26 Aug 2025 12:25 PM (IST)

    खराडीत तरुणावर कोयत्याने हल्ला

    खराडी परिसरात अंडाभुर्जीच्या गाडीवर किरकोळ वादातुन दोघांनी एका तरुणावर कोयत्याने हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. डोक्यात व तोंडावर वार केल्याने तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. रोहन माने (वय २२, रा. मुंढवा झेड कॉर्नर) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा मित्र रोहित तानाजी चौगुले (वय २६, रा. सणसवाडी चौक सणसवाडी) याने तक्रार दिली आहे. त्यानुसार खराडी पोलिसांनी दोघावर खूनाच्या प्रयत्नचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रविवारी (दि. 24) रात्री पावने बारा ते एक वाजताच्या सुमारास रिलायन्स मार्ट समोर रिलायन्स चौक खराडी येथे घडली आहे.

  • 26 Aug 2025 12:05 PM (IST)

    26 Aug 2025 12:05 PM (IST)

    सुरक्षारक्षकच निघाला चोर, पुणे पोलिसांकडून पर्दाफाश

    पुण्यातून एक चोरीची घटना उघडकीस आली आहे. सिंहगड रस्त्यावरील सोसायटीतील फ्लॅट फोडून साडे आठ लाखांचा ऐवज चोरी झाला होता. याप्रकरणात सुरक्षा रक्षकच चोरटा निघाला असून, याप्रकरणाचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. सुरक्षा रक्षकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. राकेशकुमार मूलचंद सोनी (वय २९, रा. राम अमिलिया, जि. अनुपपूर, मध्य प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक नंदकुमार गायकवाड, गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक अनिता हिवरकर, उपनिरीक्षक किरण पवार, पोलिस कर्मचारी प्रकाश मरगजे व त्यांच्या पथकाने केली आहे.

  • 26 Aug 2025 11:58 AM (IST)

    26 Aug 2025 11:58 AM (IST)

    पुण्यात गुन्हेगारांचा थरकाप उडवणारा धुमाकूळ

    वैभवशाली गणेशोत्सावाने पुण्यनगरीचे वातावरणात भक्तीमय झालेलं आहे. “जय गणेशा”च्या गजराने पुण्यनगरी उजळली जात असताना मात्र, दुसरीकडे शहर “कोयत्याच्या टोकावर थरथरत” आहे. गेल्या काही महिन्यांत घडत असलेल्या कोयत्याचे हल्ले, तोडफोडीचे सत्र अन् रक्तांच्या धारांच्या खेळाने पुणेकरांत दहशतीचे काळे सावट पसरलेले आहे. दोन गटातील वाद आणि त्यामुळे होणारे हल्ले, रस्त्यातील टोळीबाजी आणि किरकोळ वादातून वाहणारे रक्त या सगळ्याने “सुरक्षित पुणे”च्या प्रतिमेला जबर धक्का बसला जात आहे. काही केल्याने घटना पोलिसांना थांबवता येत नसल्याने आता सर्व सामान्य पुणेकर “लाडक्या बप्पा”लाच पुण्यनगरीतला गुन्हेगारीचा खेळ थांबव, अशी आर्त हाक मारू लागले आहे. गेल्या ७ महिन्यात ३३६ कोयत्याने हल्ले व गोळीबाराच्या १० घटना घडल्या आहेत.

  • 26 Aug 2025 11:38 AM (IST)

    26 Aug 2025 11:38 AM (IST)

    पुण्यातील संतापजनक प्रकार उघडकीस

    विवाहित महिलेला घरी एकटेच पाहून तिच्या घराबाहेर जात तिच्याशी लगट करत विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एकाला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. मुबारक मोळम्मद शेख (२५, रा. घोरपडेवस्त, लोणी काळभोर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका २८ वर्षीय तरूणीने तक्रार दिली आहे. (दि. २२ ऑगस्ट) दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.

  • 26 Aug 2025 11:25 AM (IST)

    26 Aug 2025 11:25 AM (IST)

    फुलांच्या बाजारपेठा सजला, झेंडूच्या मागणीत वाढ

    उद्या घरोघरी गणरायाचे आगमन होणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फुलांच्या बाजारपेठा सजल्या आहेत. बाजारामध्ये झेंडूच्या फुलांना विशेष मागणी आहे. गणरायाच्या आगमनासाठी फुलांच्या मागणीत वाढ झाली आहे.

  • 26 Aug 2025 11:17 AM (IST)

    26 Aug 2025 11:17 AM (IST)

    मावळातील गुंड किरण मोहिते टोळीवर मोक्का कारवाई

    वडगाव मावळ तसेच सातारा, रायगड जिल्ह्यातील कुख्यात गुंड किरण मोहिते याच्यासह साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी हे आदेश दिले आहेत. किरण एकनाथ मोहिते (वय २९, रा. व्हिजन वुडस, जांभुळ ता. मावळ), एकनाथ अर्जुन मोहिते (वय ५३ रा. जांभुळ ता. मावळ) रविंद्र लक्ष्मण मोहिते (वय ३३ रा. कुडेवाडा, वडगाव मावळ), मयुर ऊर्फ चण्या बजरंग मोढवे (वय २६, रा. ढोरेवाडा, वडगाव मावळ ) करण रमेश पवार (वय २५, रा. टाकवे बुदुक, ता. मावळ ) सुशांत अनिल साबळे (वय २४, रा. केशवनगर, वडगाव मावळ) अशी मकोका कारवाई केलेल्यांची नावे आहेत. टोळीप्रमुख किरण मोहिते पसार असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे अधिक तपास करत आहेत. पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

यवतमाळच्या पांढरकवडा तालुक्यातील सायखेडा मधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात चक्क ग्रामपंचायत कार्यालय फोडून महत्त्वाचे दस्तऐवज जाळल्याचा प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे दुसऱ्यादिवशी ग्रामसभा असताना हा प्रकार घडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडालीय. दरम्यान, भ्रष्टाचार उघडकीस येऊ नये, यासाठी हा प्रकार असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून हे कृत्य करणाऱ्याचा शोध घेतला जात आहे.

Web Title: Maharashtra crime news in marathi live updates yavatmal news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2025 | 11:16 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Murder Case
  • Pune Police Action
  • Theft Case

संबंधित बातम्या

खराडीत तरुणावर कोयत्याने हल्ला; तोंडावर अन् डोक्यात कोयत्याने सपासप वार
1

खराडीत तरुणावर कोयत्याने हल्ला; तोंडावर अन् डोक्यात कोयत्याने सपासप वार

परभणीत दोन गटात राडा; लाठ्याकाठ्यांनी केली गेली मारहाण, कारण आलं समोर…
2

परभणीत दोन गटात राडा; लाठ्याकाठ्यांनी केली गेली मारहाण, कारण आलं समोर…

शालेय विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार; गर्भवती होताच पालकांना धक्काच बसला अन् नंतर थेट…
3

शालेय विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार; गर्भवती होताच पालकांना धक्काच बसला अन् नंतर थेट…

मावळातील गुंड किरण मोहिते टोळीवर मोक्का कारवाई; टोळीबाबत धक्कादायक माहिती समोर
4

मावळातील गुंड किरण मोहिते टोळीवर मोक्का कारवाई; टोळीबाबत धक्कादायक माहिती समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.