sabir hussian (फोटो सौजन्य- social media)
जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिलला दहशतवाद्यांचा हल्ला झाला. दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. दहशतवादी हे भारतीय सैन्याच्या वेशात आले होते आणि धर्माची विचारणा करत अंधाधुंद फायरिंग केली. पहलगामला काश्मीरचा स्वर्ग देखील म्हंटले जाते. इथे अनेक पर्यटक फिरायला आले होते. या घटनेबद्दल संपूर्ण देशात संताप, रोष आहे. या हल्ल्यानंतर निराश झालेला पश्चिम बंगालमधील एका मुस्लिम शिक्षक साबीर हुसैनने इस्लाम धर्म सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
Khawaja Asif : पाकिस्तानमध्येच का आश्रय घेतात दहशतवादी? कारण ऐकून अमेरिका, ब्रिटनची उडेल झोप
काश्मीरच्या पहलगाममध्ये अनेक पर्यटक आयुष्यभर चांगल्या आठवणी सोबत घेऊन जाण्यासाठी आले होते. पण दुर्देवाने आयुष्यभर राहणारी जखम घेऊन इथून घेऊन गेले. पहलगाममध्ये जेव्हा हल्ला झाला तेव्हा दहशतवाद्यांनी पर्यटकांची हत्या करण्याआधी ते कुठल्या धर्माचे आहेत ते तपासलं होत. जे मुस्लिम होते त्यांना कलमा वाचायला सांगितलं आणि सोडून दिल. परंतु जे हिंदू होते त्यांच्यावर अंधाधुंद गोळ्याझाडात मारलं. दहशतवादी हल्ल्यानंतर दुखी झालेल्या बदुरियाच्या साबिर हुसैनने इस्लाम धर्म सोडण्यासाठी कोर्टाची पायरी चढली आहे.
साबीर हुसैन दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात बागुरीया येथील आदर्श विद्यापीठात विज्ञान विषयाचा शिक्षक आहे. साबीर हुसैन म्हणाला की, ‘देशात सध्या धर्माच्या नावावर हिंसक घटना घडतायत. त्यामुळे मी दु:खी आहे’.
नेमकं काय म्हणाला?
“हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा चुकीचा उपयोग केला जातो. मी कुठल्या धर्माचा अनादर करत नाही. हा माझा व्यक्तीगत निर्णय आहे. हिंसाचार पसरवण्यासाठी धर्माचा शस्त्रासारखा कसा वापर केला जातो, ते मी पाहिलय. काश्मीरमध्ये असं अनेकदा झालय. हे आता मी सहन करु शकत नाही” असं एका वृत्तवाहिनीशी बोलताना साबिर हुसैन म्हणाला.
“कुठल्या धर्मामुळे नाही, तर मला लोकांनी फक्त एक माणूस म्हणून ओळखावं अशी इच्छा आहे. पहलगाम सारख्या हिंसक घटनांमध्ये धर्माचा चुकीचा वापर केला जातो. एखाद्याला त्याच्या धर्मामुळे मारणं कसं योग्य ठरु शकतं? ही गोष्ट माझ्या मनाला खूप लागली आहे” असं साबिर हुसैन म्हणाला.
सध्याच्या परिस्थीवर बोलताना साबिर म्हणाला की, “मला अशा जगात रहायचं नाही, जिथे सर्वकाही धर्माच्या आसपास चालू असतं” साबिर हुसैन यांनी हा निर्णय फक्त स्वत:पुरता घेतला आहे. पत्नी आणि मुलांना जो कुठला मार्ग निवडायचा असेल, त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे असं साबिरने सांगितलं.
Pahalgam Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारत आक्रमक; सैन्यदलेही सज्ज, आता काहीतरी मोठं घडणार?