Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India-Pakistan Tension : लवकरच भारतासोबत युद्ध, आम्ही हाय अलर्टवर; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्याचं विधान

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पुन्हा एकदा भारताविरुद्ध आक्रमक भाषा वापरली आहे. पाकिस्तानने आपले लष्कर सज्ज ठेवले असून, भारतासोबत काही दिवसांत युद्ध होऊ शकतं, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Apr 28, 2025 | 09:49 PM
लवकरच भारतासोबत युद्ध, आम्ही हाय अलर्टवर; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्याचं विधान

लवकरच भारतासोबत युद्ध, आम्ही हाय अलर्टवर; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्याचं विधान

Follow Us
Close
Follow Us:

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी पुन्हा एकदा भारताविरुद्ध आक्रमक भाषा वापरली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून युद्ध होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पाकिस्तानने आपले लष्कर सज्ज ठेवले असून, गुप्तचर माहितीनुसार भारतासोबत काही दिवसांत युद्ध होऊ शकतं, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

Third World War : तिसरं महायुद्ध होणार? कुठे युद्ध, कुठे तणाव, दुसऱ्या महायुद्धाहूनही अधिक भयंकर स्थिती

इस्लामाबादमध्ये सोमवारी दिलेल्या एका मुलाखतीत मंत्री आसिफ म्हणाले होते की, “आम्ही आमच्या लष्कराला बळकट केले आहे, कारण सध्याची परिस्थिती युद्धाची शक्यता दर्शवते. अशा परिस्थितीत काही महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक होते, आणि ते निर्णय आम्ही आधीच घेतले आहेत.” त्यांनी असेही सांगितले की भारताकडून आक्रमक वक्तव्यं वाढत आहेत आणि पाकिस्तानच्या सैन्य प्रमुखांनी सरकारला भारताकडून संभाव्य आक्रमणाबाबत सूचित केले आहे.

भारताच्या हालचालींमुळे पाकिस्तानचा गोंधळ

हे वक्तव्य अशा वेळी आले आहे जेव्हा जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय अधिकाऱ्यांनी पाकिस्तानशी संबंधित दोन संशयित दहशतवादी संघटनांबद्दल माहिती दिली होती. मात्र, पाकिस्तानने हे आरोप पूर्णतः फेटाळले असून निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. भारताच्या तात्काळ प्रतिक्रियेमुळे पाकिस्तानवर लष्करी दबाव वाढला असून, त्याने आपल्या सीमेवर सैन्य तैनात केले आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर तणाव वाढला

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री पुढे म्हणाले की, देशाच्या अस्तित्वाच्या रक्षणासाठी कोणतीही कसर शिल्लक ठेवली जाणार नाही. त्यांनी इशारा दिला की पाकिस्तान आपल्या अण्वस्त्रांचा वापर केवळ तेव्हा करेल जेव्हा त्याच्या अस्तित्वाला थेट धोका निर्माण होईल. त्यांचे हे विधान पुन्हा एकदा दोन्ही अण्वस्त्रसज्ज देशांमधील वाढत्या तणावाकडे निर्देश आहेत.

नौदल अधिकाऱ्याच्या त्या विधवा पत्नीला काय उत्तर देऊ’; उमर अब्दुल्लांच अधिवेशनात मन हेलावून टाकणारं भाषण

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कायमच तणावपूर्ण राहिले आहेत, विशेषतः जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी घटनांनंतर हे संबंध आणखीनच ताणले गेले आहेत. पाकिस्तानकडून देण्यात येणारी ही धमकी केवळ लष्करी सज्जतेचा इशारा नाही, तर दोन्ही देशांमधील संभाव्य युद्धाची शक्यता अधिक तीव्र करत आहे.

Web Title: Pakistan defence minister khwaja asif predict on possibility to india pakistan war after pahalgam terror attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2025 | 09:45 PM

Topics:  

  • india pakistan war
  • Indo-Pak Relation
  • Pahalgam Terror Attack

संबंधित बातम्या

‘Asim Munir चा नवा ‘Bleed India’ प्लॅन? पाकमध्ये लष्करी सत्ता केंद्रीकृत; भारतावर पुन्हा कारगिलसारख्या छुप्या युद्धाची छाया
1

‘Asim Munir चा नवा ‘Bleed India’ प्लॅन? पाकमध्ये लष्करी सत्ता केंद्रीकृत; भारतावर पुन्हा कारगिलसारख्या छुप्या युद्धाची छाया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.