Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाचे पुनरुज्जीवन करण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न’; भारताच्या सुरक्षा यंत्रेणसमोर मोठे आव्हान

गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मिरमध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर भागांमध्ये दहशतवादी घटना वाढल्या असल्याचे दिसून आले आहे. दहशतवाद्यांचे सोशल मीडियाचा वापर करून कायवायांमध्ये वाढ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 10, 2024 | 05:15 PM
'काश्मीरमध्ये दहशतवादाचे पुनरुज्जीवन करण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न'; भारताच्या सुरक्षा यंत्रेणसमोर मोठे आव्हान

'काश्मीरमध्ये दहशतवादाचे पुनरुज्जीवन करण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न'; भारताच्या सुरक्षा यंत्रेणसमोर मोठे आव्हान

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मिरमध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर भागांमध्ये दहशतवादी घटना वाढल्या असल्याचे दिसून आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी सोशल मीडियाचा वापर वाढवून दहशतवादी कायवायांमध्ये वाढ करण्याचे प्रयत्न सुरू केले असल्याचे समोर आले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या गटांनी फेसबुक, एक्स, टेलिग्राम आणि डार्कवेबवर विविध पोस्टद्वारे जम्मू-काश्मिरच्या तरूणांना कट्टर विचारसरणीकडे वळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद आणि फुटीरतावादाला प्रोत्साहन

तज्ञांच्या मते, याचा वापर प्रामुख्याने जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद आणि फुटीरतावादाला प्रोत्साहन देण्यासाठी केला जात असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. याआधी ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023 मध्ये अशा 2000 हून अधिक पोस्ट्स नोंदल्या गेल्या होत्या. यामध्ये दहशतवादी हल्ल्यांच्या धमक्या आणि भारताविरोधी प्रचार होता. यामध्ये सार्वजनिक ठिकाणे, शाळा आणि पायाभूक सुविधांवर हल्ल्यांच्या धमक्यांचा समावेश होता. यामुळे भारतीय सुरक्षा यंत्रणेसमोर नवीन आव्हाने निर्माण झाली आहेत.

हे देखील वाचा- भारतीय नौदलाची महासागरावर सतर्क नजर; देशाच्या सुरक्षेसाठी प्रभावी यंत्रणा सज्ज

दहशतवादविरोधी शून्य सहनशीलता धोरण

अलीकडे दहशतवादी भरती कमी झाल्यामुळे स्थानिक पातळीवरील दहशतवादावर नियंत्रण आणण्यास भारताला काही प्रमाणात यश आले आहे. 2023 मध्ये फक्त चार स्थानिक तरुण दहशतवादी कारवायांमध्ये भरती झाले, तर 2022 मध्ये 113 होते. सरकारच्या दहशतवादविरोधी शून्य सहनशीलता धोरणाच्या परिणामस्वरूप सरकारी नोकऱ्यांवर, पासपोर्ट, आणि ड्रायव्हिंग लायसन्सवर निर्बंध घालण्यात आले. यामुळे ओव्हरग्राउंड सपोर्ट नेटवर्कवर मर्यादा आणता आली आहे. याचे श्रेय जम्मू-काश्मीर प्रशासनाच्या दहशतवादाबाबतच्या शून्य सहनशीलतेच्या धोरणाला दिले जात आहे.

सोशल मीडियामुळे तरूणांना कट्टरवादी बनवण्याच्या समस्येत वाढ

परंतु, आता सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना प्रभावित करण्याच्या प्रयत्नांमुळे समस्या वाढत चालली असून हा प्रयत्न गंभीर असल्याचे सुरक्षा यंत्रणेने म्हटले आहे. निवडणुका झाल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये स्थिरता निर्माण करण्यासाठी भारतीय सुरक्षा यंत्रणा सज्ज असताना, पाकिस्तानच्या आयएसआयने जेईआय नेत्यांवर हल्ल्यांचे नियोजन करत असल्याची माहिती समोर आली आहे. परिसरात सार्वजनिक अशांतता पसरवण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलले जात आहे.

ड्रोन कारवायांमध्ये देखील वाढ

याशिवाय, पाकिस्तानी ड्रोन कारवायांतही वाढ झाली आहे. ऑक्टोबर 2023 पर्यंत 40 हून अधिक ड्रोन दृश्ये नोंदवली गेली. यांचा उपयोग शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्यांची तस्करी करण्यासाठी केला जातो, जे भारतीय सुरक्षा यंत्रणांसाठी गंभीर धोका आहे. या सर्वांवर लक्ष ठेवून, भारतीय सुरक्षा यंत्रणा सतर्क असून, पाकिस्तानच्या कटकारस्थानांना प्रत्युत्तर देण्यासाठी कडक उपाययोजना राबवत आहेत.

हे देखील वाचा- हिंदूंवरील हल्ल्यामुळे बांगलादेश सरकार अडचणीत; 800 पानांचा दस्ताऐवज आंतरराष्ट्रीय न्यायालयात

Web Title: Pakistan is trying to revive terrorism in jammu and kashmir through social media nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2024 | 05:15 PM

Topics:  

  • india
  • Jammu-Kasmir
  • pakistan
  • terror attack

संबंधित बातम्या

India Real Estate : भारतीय हाऊसिंग मार्केटवर फिडेलिटीचा विश्वास; लोधा डेव्हलपर्समध्ये विकत घेतला 2% हिस्सा
1

India Real Estate : भारतीय हाऊसिंग मार्केटवर फिडेलिटीचा विश्वास; लोधा डेव्हलपर्समध्ये विकत घेतला 2% हिस्सा

काय सांगता! भारताच्या पहिल्या Mumbai-Ahmedabad Bullet Train ची प्रतीक्षा संपणार, ‘या’ मार्गावर होणार हाय-स्पीड ट्रेनची चाचणी
2

काय सांगता! भारताच्या पहिल्या Mumbai-Ahmedabad Bullet Train ची प्रतीक्षा संपणार, ‘या’ मार्गावर होणार हाय-स्पीड ट्रेनची चाचणी

Jan Vishwas Act : ‘चूक दुरुस्त करा, कारवाई टाळा’; जन विश्वास कायद्यांतर्गत व्यापारी आणि MSME क्षेत्राला केंद्र सरकारचा मोठा दिलासा
3

Jan Vishwas Act : ‘चूक दुरुस्त करा, कारवाई टाळा’; जन विश्वास कायद्यांतर्गत व्यापारी आणि MSME क्षेत्राला केंद्र सरकारचा मोठा दिलासा

‘आधी स्वतःच्या पदरात डोकावून पाहा…’, कराची हल्ल्याच्या खोट्या आरोपांवर भारताने पाकिस्तानला चांगलाच बदडला
4

‘आधी स्वतःच्या पदरात डोकावून पाहा…’, कराची हल्ल्याच्या खोट्या आरोपांवर भारताने पाकिस्तानला चांगलाच बदडला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.