Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Parliament Special Session: तीन दिवस, २८ तास आणि भारतीय लोकशाहीची नवी रचना; संसदेचे विशेष अधिवेशन सत्ता समीकरणांची दिशा बदलणार?

भारताच्या विकास प्रवासाला आकार देण्यासाठी महिलांच्या जास्तीत जास्त सहभागाची वचनबद्धता दृढ करण्याच्या उद्देशाने नारी शक्ती वंदन संमेलनाचे आयोजन करण्यात आले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 15, 2026 | 09:18 PM
संसदेचे विशेष अधिवेशन सत्ता समीकरणांची दिशा बदलणार? (Photo CXredit - X)

संसदेचे विशेष अधिवेशन सत्ता समीकरणांची दिशा बदलणार? (Photo CXredit - X)

Follow Us
Follow Us:

  • तीन दिवस, २८ तास आणि भारतीय लोकशाहीची नवी रचना
  • संसदेचे विशेष अधिवेशन सत्ता समीकरणांची दिशा बदलणार?
  • विरोधाची धार आणि सरकारचा दावा
केंद्र सरकारने १६ ते १८ एप्रिल दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले असून, याद्वारे ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ २०२९ च्या लोकसभा निवडणुकीपासूनच लागू करण्याचे मोठे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. मात्र, या ऐतिहासिक पावलासोबतच मतदारसंघांची पुनर्रचना आणि उत्तर-दक्षिण राज्यांमधील राजकीय संतुलनाचा पेच निर्माण झाला असून देशातील राजकीय वातावरण तापले आहे.

तीन दिवसांचे अधिवेशन

सरकारने २०२३ मध्ये मंजूर झालेल्या महिला आरक्षण कायद्याची अंमलबजावणी वेगवान करण्याचा निर्णय घेतला आहे. मूळ नियमांनुसार, हे आरक्षण २०२७ च्या जनगणनेनंतर आणि त्यानंतर होणाऱ्या पुनर्रचनेनंतर (२०३४ च्या सुमारास) लागू होणार होते. मात्र, आता सरकार तीन नवीन विधेयके संविधान दुरुस्ती, परिसीमन विधेयक आणि केंद्रशासित प्रदेश दुरुस्ती विधेयक मांडून २०२९ पासूनच ३३% आरक्षण लागू करण्याच्या तयारीत आहे.

संसदेचे स्वरूप बदलणार

या नवीन विधेयकातील सर्वात महत्त्वाचा प्रस्ताव म्हणजे लोकसभेच्या जागांमध्ये होणारी वाढ. सध्याच्या ५४३ जागा वाढवून त्या सुमारे ८५० पर्यंत नेण्याचे नियोजन आहे. यामध्ये अंदाजे २७३ जागा महिलांसाठी आरक्षित असतील. २०२७ ऐवजी २०११ च्या जनगणनेच्या आधारावर पुनर्रचना करण्याची तयारी सुरू असल्याचे समजते. जेणेकरून तांत्रिक अडचणी दूर करून २०२९ पासून आरक्षण अमलात आणता येईल. यामध्ये एससी-एसटी प्रवर्गातील महिलांसाठी अंतर्गत आरक्षणाचीही तरतूद असेल.

Bihar New Cm Oath : RSS चा बॅकग्राऊंड नाही, BJP मधून सुरुवातही नाही; तरी ८ वर्षांत सम्राट चौधरी कसे ठरले प्रभावी नेता?

सत्ताधारी विरुद्ध विपक्ष

संविधान दुरुस्तीसाठी संसदेत विशेष बहुमताची (२/३ बहुमत) आवश्यकता आहे. एनडीएकडे सध्या २९२-२९३ खासदार आहेत. दुरुस्ती मंजूर करण्यासाठी सुमारे ३६२ मतांची गरज पडेल, म्हणजेच सरकारला अतिरिक्त ७० मतांची जुळवाजुळव करावी लागेल. राज्यसभेतही एनडीए बहुमताच्या आकड्यापासून दूर असल्याने प्रादेशिक पक्षांचा पाठिंबा मिळवणे सरकारसाठी मोठे आव्हान असेल.

राजकीय शक्ती संतुलनाचा वाद

या विधेयकामुळे केवळ महिला आरक्षणच नाही, तर राज्यांच्या राजकीय प्रभावाचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. २०११ च्या जनगणनेनुसार जागा वाढवल्यास उत्तर भारताचे वर्चस्व वाढेल आणि दक्षिण भारताचे राजकीय वजन कमी होईल, अशी भीती तमिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांनी व्यक्त केली आहे. “आम्ही लोकसंख्या नियंत्रण यशस्वीरीत्या केले, मग त्याची शिक्षा आम्हाला राजकीय प्रतिनिधित्व कमी करून का दिली जात आहे?” असा सवाल दक्षिणेकडील राज्यांनी उपस्थित केला आहे.

विरोधाची धार आणि सरकारचा दावा

काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी ‘आरक्षणाला पाठिंबा पण राजकीय फेररचनेला विरोध’ अशी भूमिका घेतली आहे. पुनर्रचनेच्या बहाण्याने देशाचा राजकीय नकाशा बदलण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. दुसरीकडे, “हा निम्म्या लोकसंख्येला त्यांचा अधिकार देण्याचा ऐतिहासिक क्षण असून कोणत्याही राज्यावर अन्याय होणार नाही,” असा दावा केंद्र सरकार करत आहे. पुढील तीन दिवसांत लोकसभेत आणि राज्यसभेत होणारी २५-२८ तासांची चर्चा देशाच्या लोकशाहीचे भवितव्य ठरवणारी असेल.

PM Narendra Modi: “16, 17, 18 एप्रिल… भारत एक मोठा निर्णय घेणार”, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

Web Title: Parliament special session 2026 democracy design and power balance update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 09:18 PM

Topics:  

  • Central Governement
  • india
  • Parliament session

संबंधित बातम्या

सिया, सोनमनंतर आता समिता! प्रियकरासाठी पतीची धावत्या ट्रेनमध्ये हत्या; ‘या’ तीन चुकांमुळे उघडकीस आला कट
1

सिया, सोनमनंतर आता समिता! प्रियकरासाठी पतीची धावत्या ट्रेनमध्ये हत्या; ‘या’ तीन चुकांमुळे उघडकीस आला कट

Amit Shah : ‘वंदे मातरम्’चा अवमान महागात पडणार? अमित शाह राज्यसभेत आणणार महत्त्वाचे विधेयक
2

Amit Shah : ‘वंदे मातरम्’चा अवमान महागात पडणार? अमित शाह राज्यसभेत आणणार महत्त्वाचे विधेयक

पंतप्रधान मोदींकडून हायड्रोजन ट्रेनचे उद्घाटन! अवघ्या 5 रुपयांत जींद ते सोनीपत प्रवास, प्लॅटफॉर्म तिकिटापेक्षाही स्वस्त भाडे
3

पंतप्रधान मोदींकडून हायड्रोजन ट्रेनचे उद्घाटन! अवघ्या 5 रुपयांत जींद ते सोनीपत प्रवास, प्लॅटफॉर्म तिकिटापेक्षाही स्वस्त भाडे

Supreme Court : तिसरे अपत्य झाल्यास निवडणूक लढवता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
4

Supreme Court : तिसरे अपत्य झाल्यास निवडणूक लढवता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.