Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Parliament session : संसदीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून सुरु; जागतिक युद्धावरुन मोदी सरकारला पकडणार कोंडीत?

आतपासून संसदीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरु होत आहे. यामध्ये मध्यपूर्व भागातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे देशावरील तेल संकटावरुन सरकारला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 09, 2026 | 11:30 AM
parliamentary budget session second phase begins today delhi news update

parliamentary budget session second phase begins today delhi news update

Follow Us
Close
Follow Us:
  • संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरु
  • युद्धाच्या पार्श्वभूमीवर सरकारवर टीका
  • लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावर अविश्वास ठरावाची चर्चा
Parliament session : नवी दिल्ली : संसदीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरु होत आहे. पहिल्या टप्प्यामध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दाखवलेल्या माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या ‘फ़ॉर स्टार्स ऑफ़ डेस्टिनी’ यांचे पुस्तक दाखवल्याने वाद निर्माण झाला. आता इराण – इस्रायल युद्धाचा (Iran-Israel war) भडका उडाला असताना भारताचे संसदीय अधिवेशन सुरु आहे. यामुळे दुसऱ्या टप्प्यातील अधिवेशनामध्ये या युद्धाची ठिणगी पडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. देशातील तेल साठे, गॅस साठे यावरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे. (Delhi News)

संसदेच्या दुसऱ्या टप्प्यात सभागृहात गोंधळ होण्याची शक्यता आहे. या टप्प्यात, अध्यक्ष ओम बिर्ला यांना हटवण्याची मागणी करणाऱ्या विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर लोकसभेत चर्चा होईल. मध्य पूर्वेतील सुरू असलेला संघर्षही प्रमुख मुद्दा ठरण्याची शक्यता आहे. इराणवरील सरकारच्या भूमिकेवरून, रशियाकडून भारताच्या तेल खरेदीवर अमेरिकेने दिलेली “सवलत” आणि इतर मुद्द्यांवरून विरोधी पक्ष आधीच सरकारवर हल्ला करत आहे. याच मुद्द्यावरुन विरोधक मोदी सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा : ‘राष्ट्रपती उभे आहेत आणि तुम्ही…’, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जुना फोटो दाखवून पंतप्रधान मोदींना दिले चोख प्रत्युत्तर

रविवारी संध्याकाळी प्रसिद्ध झालेल्या लोकसभेच्या ९ मार्चच्या सुधारित अजेंड्यानुसार, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर “पश्चिम आशियातील परिस्थिती” या विषयावर निवेदन देतील. एसआयआरमुळे पश्चिम बंगालमधील अंदाजे ६० लाख नावे काढून टाकल्याचा मुद्दा संसदीय कामकाजावरही परिणाम करू शकतो. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शुल्काविरुद्ध दिलेल्या निर्णयानंतर भारत-अमेरिका अंतरिम व्यापार कराराबाबत विरोधी पक्ष सरकारला प्रश्न विचारू शकतात.

त्याचबरोबर अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा २०२६-२७ या वर्षासाठी विविध मंत्रालयांच्या अनुदान मागण्या आणि वित्त विधेयक, २०२६ मंजूर करण्यावर लक्ष केंद्रित करेल. या विधेयकात १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्पात सादर केलेल्या सर्व कर प्रस्तावांचा समावेश आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रत्येकी पाच मंत्रालयांच्या कामकाजावर आणि अनुदानासाठी त्यांच्या संबंधित मागण्यांवरही चर्चा होईल.

हे देखील वाचा : BJP राजकारणासाठी राष्ट्रपतींचा वापर, वर्षातून कितीवेळा येणार..? CM ममता बॅनर्जींचा अपमान प्रकरणावरुन चढला पारा

सरकारला कोंडीत पकडण्याचा डाव

रणनीती आखण्यासाठी विरोधकांची बैठक

राज्यसभेत सोमवारी सकाळी १० वाजता विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या दालनात विरोधी पक्षांची रणनीती बैठक होणार आहे. तथापि, सरकारच्या संख्याबळामुळे हा प्रस्ताव फेटाळला जाण्याची शक्यता आहे. ११८ खासदारांनी दिलेल्या सूचनेवर काँग्रेसने चर्चेची मागणी केली आहे, तर तृणमूल काँग्रेसनेही या प्रस्तावाला पाठिंबा दर्शविला आहे. सोमवारी सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेपर्यंत लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास नसण्याची शक्यता आहे, कारण १९ फेब्रुवारी रोजी निधन झालेले शिलाँगचे खासदार रिकी सिंगकॉन यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सभागृह तहकूब केले जाऊ शकते.

Web Title: Parliamentary budget session second phase begins today delhi news update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • Iran-Israel War
  • Modi government
  • Parliament session

संबंधित बातम्या

इराणला कमी लेखण्याची चूक भोवली! इराणसमोर अमेरिकेची प्रतिमा धुळीस, टीकेची झोड
1

इराणला कमी लेखण्याची चूक भोवली! इराणसमोर अमेरिकेची प्रतिमा धुळीस, टीकेची झोड

Maharashtra Politics : देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र फेल…! खासदार राऊतांची जहरी टीका
2

Maharashtra Politics : देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र फेल…! खासदार राऊतांची जहरी टीका

मोठी बातमी ! भारतात येणाऱ्या 14 जहाजांना इराणच्या सैन्याने होर्मजमध्ये अडवलं; दोन जहाजांवर थेट गोळीबारच…
3

मोठी बातमी ! भारतात येणाऱ्या 14 जहाजांना इराणच्या सैन्याने होर्मजमध्ये अडवलं; दोन जहाजांवर थेट गोळीबारच…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.