पश्चिम बंगाल सीएम ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अपमान प्रकरणावर प्रतिक्रिया दिली (फोटो - सोशल मीडिया)
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी बागडोगरा विमानतळाजवळ झालेल्या आदिवासी समुदायाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीकडे लक्ष वेधले. त्यांनी ममता बॅनर्जी यांचा उल्लेख करत भरसभेत अनुपस्थितीवर नाराजी व्यक्त केली होती. यावर प्रतिक्रिया देत ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “वर्षातून एकदा या, मी तुमचे स्वागत करेन. पण जर तुम्ही वर्षातून ५० वेळा आलात तर माझ्याकडे वेळ आहे का? मी लोकांसोबत उभी राहून SIR साठी निषेध करते. मी तुमच्या बैठकीला कशी उपस्थित राहू शकते? माझे प्राधान्य काय आहे? तुमच्यासाठी, भाजपा तुमची प्राथमिकता आहे, माझ्यासाठी, जनता माझी प्राथमिकता आहे.” असा टोला ममता बॅनर्जी यांनी भाजप आणि राष्ट्रपतींना लगावला आहे.
हे देखील वाचा : CM ममता बॅंनर्जींना राष्ट्रपतींचा अपमान भोवणार? पश्चिम बंगालमध्ये घटनेची गृह विभागाकडून दखल
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी बंगालमधील आदिवासींच्या विकासाच्या गतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावर निशाणा साधला आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या इशाऱ्यावर राजकारण खेळत असल्याचा आरोप केला. राज्य सरकारची बदनामी करण्यासाठी भाजप राष्ट्रपती कार्यालयाचा गैरवापर करत असल्याचा आरोप बॅनर्जी यांनी केला. कोलकाता येथील एका निषेध स्थळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, भाजप इतके खालच्या पातळीवर गेले आहे की ते राज्याची बदनामी करण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूचा वापर करत आहे,” असा आरोप देखील ममता बॅनर्जी यांनी लगावला आहे.
हे देखील वाचा : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मोठी अपडेट; एक आरोपी येणार जेलबाहेर, कारण काय?
पुढे त्या म्हणाल्या की, “राष्ट्रपतींच्या कार्यक्रमात राज्य प्रतिनिधींच्या अनुपस्थितीबद्दल मिळालेली माहिती चुकीची आहे. निवडणुकीपूर्वी अशा कार्यक्रमांना उपस्थित राहणे नेहमीच शक्य नसते. जर तुम्ही वर्षातून एकदा आलात तर मी तुमचे स्वागत करू शकते, परंतु जर तुम्ही निवडणुकीदरम्यान आलात तर तुमच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणे मला शक्य होणार नाही कारण मी लोकांच्या हक्कांसाठी काम करत आहे.” असे ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत.






