केदारनाथ मंदिरात (kedarnath temple) आता मोबाईलने फोटो काढण्यास बंदी घालण्यात आली (Photography Ban In kedarnath temple)आहे. बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीच्या वतीने धाममध्ये ठिकठिकाणी यासंदर्भात फलकही लावण्यात आले आहेत. बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष अजेंद्र अजय यांनी सांगितले की, केदारनाथ मंदिरात जर कोणी भाविक फोटो काढला तर त्याच्यावरही कायदेशीर कारवाई केली जाईल.
[read_also content=”मित्रांनी मोमोज खाण्याचं चॅलेंज दिलं, एकावेळी फस्त केले १५० मोमोज, तरुणाचा मृत्यू! https://www.navarashtra.com/crime/a-man-died-aftereating-150-momos-in-bihar-nrps-432424.html”]
गेल्या काही दिवसापासून केदारनाथ मंदिर परिसरातील अनेक फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काही तरुण तरुणी फोटो काढणे, रिल्स बनवणे असे प्रकार करत असल्यामुळे त्यावर बंदी आणावी अशी मागणी करण्यात येत होती. नुकताच केदारनाथ धामच्या गर्भात एका महिलेने नोटांचा वर्षाव केल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओवर आक्षेप घेण्यात आला. त्यामुळे आता मंदिरात आतमध्ये मोबाईनने फोटो व्हिडिओ काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. यासंदर्भआत बीकेटीसीचे अध्यक्ष म्हणाले की, धाममध्ये अद्याप क्लॉक रूमची व्यवस्था नाही. लवकरात लवकर भाविकांना मोबाईल ठेवून दर्शन घ्यायला जाता येईल,अशी व्यवस्था करण्यात येईल.
तसेच, त्यांनी सांगितले की, भाविकांना मोबाईल घेऊन दर्शन घेता येईल. पण मंदिराच्या आत फोटो आणि व्हिडिओ घेऊ शकत नाही. यावर बंदी आहे. कोणत्याही भाविकाने आदेशाचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.