Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

New Railway Projects: २०३० पर्यंत रेल्वेचे जाळे ९०१ किमीने विस्तारणार; २३,४३७ कोटींच्या ३ रेल्वे प्रकल्पांना केंद्राची मंजुरी

रेल्वेचे हे प्रकल्प मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमधील १९ जिल्ह्यांमध्ये विस्तारलेले असतील.

  • By anuradha sagar
Updated On: May 07, 2026 | 02:19 PM
Indian Railways, PM Narendra Modi, Railway Projects, PM Gati Shakti, Infrastructure Development

Indian Railways, PM Narendra Modi, Railway Projects, PM Gati Shakti, Infrastructure Development

Follow Us
Follow Us:
  • प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च सुमारे २३,४३७ कोटी रुपये आहे
  • मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या ६ राज्यांमधील १९ जिल्ह्यांना याचा लाभ मिळेल
  • जवळपास ४,००० गावे आणि ८३ लाख नागरिकांना सुधारित रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळणार आहे
 

Indian Railway Projects :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडींवरील मंत्रिमंडळ समितीने सुमारे २३,४३७ कोटी रुपयांच्या रेल्वे मंत्रालयाच्या तीन प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या उपक्रमामुळे केवळ देशाची पायाभूत सुविधाच बळकट होणार नाही, तर आर्थिक विकासाचा वेगही वाढणार आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमधील १९ जिल्ह्यांना या रेल्वे प्रकल्पाचा लाभ होणार आहे. या प्रकल्पामुळे संपर्क यंत्रणा अधिक सक्षम होऊन देशभरातील प्रमुख पर्यटन स्थळांपर्यंत पोहोचणेही अधिक सुलभ होईल, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘एक्स’ या सोशल मीडियावर दिली आहे.

आता याला काय म्हणावं? उद्घाटनापूर्वीच पुलाचा पिलरच कोसळला; पुलाच्या कामावर प्रश्नचिन्ह

केंद्र सरकारने मंजुरी दिलेल्या या तीन प्रमुख ‘मल्टी-ट्रॅकिंग’ प्रकल्पांचा एकूण अंदाजित खर्च सुमारे २३,४३७ कोटी रुपये असून ते वर्ष २०३०-३१ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या योजनांतर्गत, भारतीय रेल्वेच्या जाळ्याचा विस्तार सुमारे ९०१ किलोमीटरने होणार आहे.

४,००० हून अधिक गावांना लाभ

रेल्वेचे हे प्रकल्प मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमधील १९ जिल्ह्यांमध्ये विस्तारलेले असतील. परिणामी, ४,००० हून अधिक गावांमधील सुमारे सुमारे ८३ लाख नागरिकांना या सुधारित संपर्क व्यवस्थेचा लाभमिळेल. या योजना ‘पीएम गतिशक्ती राष्ट्रीय महायोजने’ अंतर्गत तयार करण्यात आल्या आहेत; या योजनेचा उद्देश बहु-माध्यमी संपर्क व्यवस्था आणि लॉजिस्टिक्स पायाभूत सुविधा बळकट करणे हा आहे. या उपक्रमामुळे लोकांची, वस्तूंची आणि सेवांची वाहतूक अधिक अखंड आणि सुलभ होईल.

Bengal Violence : भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची गोळ्या झाडून हत्या; चारपैकी तीन गोळ्या थेट डोक्यात

गाड्यांचा विलंब टळेल

या तीन महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये नागदा-मथुरा (तिसरी आणि चौथी मार्गिका), गुंतकल-वाडी (तिसरी आणि चौथी मार्गिका) आणि बुरहवाल सीतापूर (तिसरी आणि चौथी मार्गिका) यांचा समावेश आहे. या अतिरिक्त मार्गिकांमुळे रेल्वेची वाहतूक अधिक सुरळीत होईल, गाड्यांना होणारा विलंब कमी होईल आणि रेल्वे सेवा अधिक विश्वासार्ह बनतील, असा दावा रेल्वेने केला आहे.

 

Web Title: Pm modi announces 23437 cr railway infrastructure push for mp rajasthan up and south india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 02:19 PM

Topics:  

  • central railway
  • Indian Railway
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

हर्षवर्धन सपकाळांचा भाजप-आरएसएसवर हल्लाबोल; ‘तिरंग्याचे प्रेम आता जागे झाले, देर आये दुरुस्त आये’
1

हर्षवर्धन सपकाळांचा भाजप-आरएसएसवर हल्लाबोल; ‘तिरंग्याचे प्रेम आता जागे झाले, देर आये दुरुस्त आये’

Railway Porter Loot : कुलींची दादागिरी… प्रवाशाकडून उकळले तब्बल 4700 रुपये, तक्रार होताच रेल्वेने घेतला कठोर निर्णय
2

Railway Porter Loot : कुलींची दादागिरी… प्रवाशाकडून उकळले तब्बल 4700 रुपये, तक्रार होताच रेल्वेने घेतला कठोर निर्णय

शरद पवार गटाच्या खासदारांची प्रधानमंत्री मोदींसोबत २० मिनिटे चर्चा; अमोल कोल्हेंनी भेटीचा सगळा तपशीलच सांगितला…
3

शरद पवार गटाच्या खासदारांची प्रधानमंत्री मोदींसोबत २० मिनिटे चर्चा; अमोल कोल्हेंनी भेटीचा सगळा तपशीलच सांगितला…

Mumbai Local: मुंबई लोकलला पुन्हा ब्रेक! मुलुंडमध्ये ओव्हरहेड वायरवर साहित्य पडून आग; १५ ते २० मिनिटांचा विलंब
4

Mumbai Local: मुंबई लोकलला पुन्हा ब्रेक! मुलुंडमध्ये ओव्हरहेड वायरवर साहित्य पडून आग; १५ ते २० मिनिटांचा विलंब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.