Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Railway Porter Loot : कुलींची दादागिरी… प्रवाशाकडून उकळले तब्बल 4700 रुपये, तक्रार होताच रेल्वेने घेतला कठोर निर्णय

Railway Porter Loot : पश्चिम बंगालमधील हावडा रेल्वे स्थानकावर एका कुलीने प्रवाशाकडून सामान वाहून नेण्यासाठी तब्बल ४,७०० रुपयांची अवाजवी वसुली केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या दादागिरीची तक्रार प्रवाशाने रेल्वे प्रशासनाकडे केल्यानंतर रेल्वेने तात्काळ दखल घेत कुलीवर अशी कडक कारवाई केली.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 11, 2026 | 01:30 PM
(फोटो सौजन्य - Chatgpt)

(फोटो सौजन्य - Chatgpt)

Follow Us
Follow Us:
  • कुलींची दादागिरी…
  • प्रवाशाकडून उकळले तब्बल 4700 रुपये,
  • तक्रार होताच रेल्वेने घेतला कठोर निर्णय
Railway Porter Loot : देशातील मोठ्या आणि गजबजलेल्या रेल्वे स्थानकांवरील परवानाधारक पोर्टर्स असतात. तुमचं सामान घेऊन जाण्यासाठी त्यांची मदत होते. पण बऱ्याच वेळेला त्याच्या अरेरावीचे अनुभव तुम्हालाही आले असतील. तुमचं सामान त्यांच्या नजरेत जास्त मोठं झालं की मग ते आपली मनमानी करत वेगळं अतिरिक्त पैसे चार्ज करायला सांगायला सुरुवात करतात. हा अनुभव तर नेहमीचाच आता तर अशीच एक घटना घडली. त्यात 500, 1000 नाही तर तब्बल 4700 रुपये आकारले. ( Railway Porter Loot  ) नेमका काय घडला हा प्रकार? समजून घेऊयात.

Gold Hallmarking : सोन्याची खरेदी करताय? सरकारने घेतला मोठा निर्णय, फसवणूक टाळण्यासाठी ‘या’ गोष्टी नक्की तपासा

पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील हावडा स्थानकावर हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. तिथे पोर्टर्सच्या एका टोळीने एका प्रवाशाकडून ७ ट्रॉली बॅग आणि ४ हँड लगेजसाठी थोडे थोडके नाही तर तब्बल ४,७०० रुपये उकळले. ही रक्कम रेल्वेने निश्चित केलेल्या पोर्टर शुल्कापेक्षा कित्येक पटींनी जास्त आहे. नेमकं काय घडलं सविस्तर जाणून घेऊयात.

नेमकं काय घडलं स्टेशनला?

अरुणभा मुखर्जी एका मोठ्या बांधकाम कंपनीत इंजीनियर आहेत. ते पश्चिम बंगालमधील कूचबिहारहून मुंबईला प्रवास करत होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी, चार महिन्यांची मुलगी, वृद्ध आई आणि त्यांचा मदतनीस होते. ते शुक्रवारी पहाटे ५ वाजता कूचबिहारहून ट्रेनने हावडा येथे पोहोचले. त्यानंतर थोड्याच वेळात त्यांना मुंबईला जाण्यासाठी दुसरी ट्रेन पकडायची होती. जेव्हा त्यांची कूचबिहारहून आलेली ट्रेन हावडा स्टेशनवर पोहोचली, तेव्हा मुसळधार पाऊस सुरु होता. त्यांनी आपले सामान उतरवलं आणि काय करावं अशा प्रश्नांत पडले. त्याच वेळी, कुलींचा एक गट त्यांच्याजवळ आला आणि त्यांनी मदतीचा हात पुढे केला. कामाचे दर विचारल्यावर, त्यांनी काहीही सांगण्यास नकार दिला आणि फक्त एवढेच म्हणाले की ते हे काम कमी पैशात करतील.

मग दाखवला खरा रंग

कुलीने सर्व सामान एका मोठ्या ट्रॉलीवर ठेवलं आणि तो दुसऱ्या प्लॅटफॉर्मच्या दिशेने चालू लागला. त्याचवेळी, कुली म्हणाला की ६,००० रुपये होतील. मुखर्जींनी विचारले, “किती?” हमालाने उत्तर दिले, “एवढेच.” जेव्हा त्यांनी विरोध केला, तेव्हा हमालाने धमकी दिली, “तुम्ही एवढे पैसे दिले नाहीत, तर मी सर्व सामान रुळांवर फेकून देईन.” या सगळ्या प्रकारात त्याने आपल्या साथीदारांना बोलावलं.मुखर्जींसोबत त्यांची लहान मुलगी आणि वृद्ध आई होत्या. त्यांची ट्रेन लवकरच हावड्याहून निघणार होती. मुसळधार पाऊस पडत होता, त्यामुळे त्यांच्याकडे फारसे पर्याय नव्हते. त्यांनी हमालाशी घासाघीस केली तर हमालाने तब्बल ५,००० रुपये मागितले. अखेरीस, ते ४७,०० रुपयांवर सहमत झाले. त्यांच्याकडे जास्त रोख रक्कम नव्हती, म्हणून त्यांनी १,७०० रुपये रोख आणि ३,००० रुपये यूपीआयद्वारे दिले. त्यानंतर ते दुसऱ्या ट्रेनमध्ये चढले.

मुंबईत कुलीने किती पैसे आकारले?

ते शनिवारी त्याच ट्रेनने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (CSMT) येथे पोहोचले. जेव्हा त्यांनी तेवढेच सामान स्टेशनच्या बाहेर नेण्यासाठी कुलीला बोलावलं. तेव्हा त्यांच्याकडून ८०० रुपये आकारण्यात आले. तेव्हाच अरुणभ मुखर्जी यांच्या लक्षात आले की हावडामध्ये कुलीने त्यांच्याकडून बरेच जास्त पैसे आकरले.

सोशल मीडियावर पोस्ट केले

त्यानंतर मुखर्जी यांनी काही फोटोंसह या घटनेचा सविस्तर तपशील फेसबुकवर पोस्ट केला. त्यांनी पूर्व रेल्वे प्रशासनाला या प्रकरणाची चौकशी करून दोषी कुलींवर कारवाई करण्याचे आवाहन केले. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातूनही गुन्हेगारांची ओळख पटवतील.

रेल्वे पोर्टरचे शुल्क किती आहे?

रेल्वे प्रवाशांची फसवणूक टाळण्यासाठी, रेल्वे बोर्डाने पोर्टर्ससाठी शुल्क निश्चित केले आहे. गेल्या वर्षी याचा आढावा घेण्यात आला होता. सुधारित शुल्कानुसार, प्रमुख रेल्वे स्थानकांवर ४० किलोपर्यंतच्या सामानासाठी तुम्हाला ८५ रुपये द्यावे लागतील. मध्यम आकाराच्या स्थानकांवर हे शुल्क ८० रुपये आणि लहान स्थानकांवर ७५ रुपये आहे. जर तुम्ही दोन चाकी किंवा चार चाकी ट्रॉली वापरली, तर तुम्हाला १३५ रुपये द्यावे लागतील. या ट्रॉलीमध्ये १६० किलोपर्यंतचे सामान वाहून नेता येते.

Cooperative Banks Role : आर्थिक मंदी असो वा जागतिक संकट, सहकारी बँकांवर विश्वास का? तन्वीर इनामदार यांनी स्पष्ट केली कारणे

Web Title: Railway porter loot overcharge passenger 4700 rupees railways takes strict action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 01:30 PM

Topics:  

  • Business News
  • central railway
  • CSMT
  • fraud
  • Kolkata
  • Marathi News

संबंधित बातम्या

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
1

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
2

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!
4

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.