पंतप्रधान मोदींची पाकिस्तानवर टीका (फोटो- ट्विटर)
आज पंतप्रधान मोदींचा ७५ वा वाढदिवस
मध्य प्रदेशच्या सभेतून पाकिस्तानवर टीका
ऑपरेशन सिंदूरवॉर टीका
Operation Sindoor: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७५ वा वाढिदवस आहे. जगभरातुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्यप्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. मध्यप्रदेशच्या धार मध्ये मोदींनी एका विशाल सभेला संबोधित केले. वाढदिवसानिमित्त मोदी आदिवासी भागात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी जनतेला संबोधित करताना पाकिस्तानवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान मोदी नेमके काय म्हणाले आहेत, ते जाणून घेऊयात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी धार येथील सभेत बोलताना म्हणाले, “हा नवीन भारत आहे. भारत कोणत्याही अण्वस्त्र धमकीला भीक घालत नाही. तर घरात घुसून मारतो. ” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धार येथे अनेक विकासकामांचे लोकार्पण व उदघाटन देखील केले आहे. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात महिला सशक्तीकरण आणि आरोग्य क्षेत्राबाबत देखील भाष्य केले आहे.
Delighted to be in Dhar, Madhya Pradesh! Speaking at the launch of women-centric initiatives, which will strengthen health and well-being at the grassroots level. PM MITRA Park is also being inaugurated. https://t.co/oRNGJjSLpU
— Narendra Modi (@narendramodi) September 17, 2025
पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी आमच्या माता-भगिनींचे कुंकू पुसले. आम्ही ऑपरेशन सिंदूर राबवत दहशतवाद्यांचा अड्डे उध्वस्त केले. आपल्या शूर जवानांनी पाकिस्तानला गुडघ्यावर आणले. नुकतेच एका दहशतवाद्याने रडत रडत आपले दुःख सांगितले आहे. हा नवीन भारत जो स्वतःच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राथमिकता देतो. तसेच कोणत्याही धमकीला तो घाबरत नाही.”
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मध्यप्रदेशच्या दौऱ्यावर असताना अनेक विकासकामांचे , योजनांचे लोकार्पण आणि उदघाटन केले आहे. त्यांनी पीएम पार्कचे भूमिपूजन केले. या प्रकल्पामुळे कापड उद्योगाला चालना मिळणार आहे. तसेच त्यांनी ‘सशक्त स्त्री सशक्त परिवार’ योजनेचा शुभारंभ केला. दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना जगभरातून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या जात आहेत. देशभरात आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मोदींच्या आईच्या AI व्हिडिओवर उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईच्या एआय (AI) व्हिडिओबाबतच्या खटल्याची सुनावणी करताना न्यायालयाने काँग्रेस पक्षाला फटकारले. न्यायालयाने व्हिडिओ तात्काळ काढून टाकण्याचे आदेश दिले. पाटणा उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश पी.बी. बजंतारी यांच्या न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्देश जारी केले आहेत. न्यायालयाने काँग्रेस पक्षाने तयार केलेला पंतप्रधानांच्या आईचा एआय व्हिडिओ सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. हे निर्देश सुनावणीदरम्यान जारी करण्यात आले.