सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या पाचगणीमध्ये खळबळजनक घटना समोर आली आहे. पाचगणी पोलिसांना वाहन तपासणी दरम्यान पर्यटकांच्या गाडीतून तब्बल 42 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त आहे.पाचगणी येथे अमली पदार्थांचा वापर केला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पाचगणी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे तपासणी केली असता. एका गाडीमध्ये कॅप्सूल सह 13 ग्रॅम कोकेन जप्त केले आहे, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत 5 लाख रुपये आहे.इतर सामग्री मिळून एकूण 42 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.या प्रकरणी १० संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. हे सर्व आरोपी पर्यटनाच्या बहाण्याने पाचगणीत आले होते.पाचगणी पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत (NDPS Act) गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हे अमली पदार्थ कुठून आणले गेले आणि यामध्ये आणखी कोणाचे मोठे रॅकेट सक्रिय आहे का? याचा तपास आता सातारा पोलीस करत आहेत.