• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Goa Was Freed From 451 Years Of Slavery In Just 36 Hours Know How The Portuguese Were Expelled

Goa Liberation Day: 36 तासांचे ‘ऑपरेशन विजय’ ज्यामुळे भारताचा नकाशा पूर्णत्वास आला; पोर्तुगीज पळाले अन् तिरंगा फडकला

1961 मध्ये, गोवा मुक्ती चळवळीचा भाग म्हणून, भारतीय सैन्याने ऑपरेशन विजय सुरू केले, ज्याने केवळ 36 तासांत 451 वर्षांच्या पोर्तुगीज राजवटीतून गोवा मुक्त केला. ही चळवळ सशस्त्र आणि अहिंसक संघर्षाचे एक अद्वितीय उदाहरण होते.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Dec 19, 2025 | 08:30 AM
Goa was freed from 451 years of slavery in just 36 hours Know how the Portuguese were expelled

४५१ वर्षांच्या गुलामगिरीतून गोवा अवघ्या ३६ तासांत मुक्त झाला; पोर्तुगीजांना कसे हाकलून लावले गेले ते जाणून घ्या ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • ऐतिहासिक विजय: भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन विजय’मुळे ४५१ वर्षांची पोर्तुगीज राजवट अवघ्या ३६ तासांत संपुष्टात आली.
  • स्वातंत्र्यानंतरची लढाई: १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला तरी गोव्याला मुक्त करण्यासाठी भारताला १९६१ पर्यंत वाट पाहावी लागली.
  • पोर्तुगीजांची शरणागती: १९ डिसेंबर १९६१ रोजी पोर्तुगीज गव्हर्नर जनरल वासालो ई सिल्वा यांनी भारतीय सैन्यासमोर शरणागती पत्करली आणि गोवा मुक्त झाला.

Goa Liberation Day 2025 : भारताच्या नकाशावर गोवा (Goa) हे छोटेसे राज्य असले तरी त्याचा मुक्तीचा (Goa Liberation Day) इतिहास अत्यंत संघर्षमय आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी जेव्हा संपूर्ण भारत स्वातंत्र्याचा जल्लोष करत होता, तेव्हा गोवा मात्र पोर्तुगीजांच्या पोलादी साखळदंडात जखडलेला होता. पोर्तुगीजांनी गोव्यावर तब्बल ४५१ वर्षे राज्य केले, जे ब्रिटिशांच्या १५० वर्षांच्या राजवटीपेक्षाही अधिक प्रदीर्घ होते. मात्र, १८ आणि १९ डिसेंबर १९६१ च्या त्या ३६ तासांनी इतिहास बदलला.

पोर्तुगीजांचा ४५१ वर्षांचा क्रूर इतिहास

१५१० मध्ये अल्फोन्सो डी अल्बुकर्क याने गोव्यावर ताबा मिळवला आणि तिथून पोर्तुगीज राजवटीला सुरुवात झाली. पोर्तुगीजांनी केवळ व्यापारच केला नाही, तर स्थानिक गोवेकरांवर धर्मांतराची सक्ती केली, मंदिरे उद्ध्वस्त केली आणि स्थानिक संस्कृती दडपण्याचा प्रयत्न केला. या अन्यायाविरुद्ध वेळोवेळी बंड झाले. राणे कुटुंबाने तर पोर्तुगीजांविरुद्ध तब्बल १४ वेळा शस्त्रे उचलली. दिपाजी राणे, कुस्तोबा राणे आणि दादा राणे यांसारख्या वीरांनी गनिमी काव्याने पोर्तुगीजांना सळो की पळो करून सोडले होते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Vijay Mallya : कर्ज बुडवलं पण स्वॅग तसाच! मल्ल्याच्या वाढदिवसाला लंडनमध्ये जमला ‘या’ सर्वच फरार उद्योगपतींचा मेळावा

लोहियांची गर्जना आणि सत्याग्रहाची धग

विसाव्या शतकात ही चळवळ अधिक संघटित झाली. १८ जून १९४६ रोजी डॉ. राम मनोहर लोहिया यांनी मडगावमध्ये दिलेल्या एका भाषणाने गोव्यात क्रांतीची मशाल पेटवली. म्हणूनच त्यांना ‘गोवा मुक्तीचे जनक’ मानले जाते. पुरुषोत्तम काकोडकर, लक्ष्मीकांत भेंबरे आणि अनेक क्रांतिकारकांनी पोर्तुगीजांच्या तुरुंगात अतोनात छळ सोसला, काहींना तर थेट पोर्तुगालमधील तुरुंगात पाठवण्यात आले. १९५५ मध्ये झालेल्या सत्याग्रहात पोर्तुगीजांनी केलेल्या गोळीबारात अनेक भारतीय शहीद झाले, ज्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली.

Goa, Daman & Diu Liberation Day marks the watershed moment when these territories were freed from Portuguese rule. It celebrates the courage of freedom fighters and the collective resolve of Indians who ensured the integration of these regions into the Indian Union. pic.twitter.com/fXiGZ8fkGw — Congress (@INCIndia) December 19, 2025

credit : social media and Twitter

‘ऑपरेशन विजय’ आणि ३६ तासांचा थरार

अखेर जेव्हा राजनैतिक चर्चेचे सर्व मार्ग खुंटले, तेव्हा तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी लष्करी कारवाईचा निर्णय घेतला. १८ डिसेंबर १९६१ रोजी भारतीय भूदल, नौदल आणि हवाई दलाने एकत्रितपणे गोव्यावर चढाई केली. याला नाव दिले गेले ‘ऑपरेशन विजय’. भारतीय सैन्याच्या प्रचंड ताकदीसमोर पोर्तुगीज सैन्य टिकू शकले नाही. अवघ्या ३६ तासांत, १९ डिसेंबर रोजी पोर्तुगीज गव्हर्नर वासालो ई सिल्वा यांनी बिनशर्त शरणागती पत्करली. ४५१ वर्षांचा अन्याय एका झटक्यात संपला आणि गोव्याच्या मातीत तिरंगा अभिमानाने फडकला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : HIMARS : चीनच्या नाकावर टिच्चून! अमेरिकेने तैवानला बनवले ‘पॉवरहाऊस’; अखेर रणनीतिक महाकराराला अधिकृत मान्यता

स्वातंत्र्यानंतरचा गोवा

मुक्तीनंतर गोवा, दमण आणि दीव हा केंद्रशासित प्रदेश बनला. पुढे १९८७ मध्ये गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला. गोव्याच्या या स्वातंत्र्यलढ्याने जगाला दाखवून दिले की भारत आपल्या सार्वभौमत्वासाठी कोणत्याही परकीय शक्तीला आपल्या भूमीवर थारा देणार नाही. आजचा गोवा जरी पर्यटनासाठी प्रसिद्ध असला, तरी त्याच्या प्रत्येक वास्तूमागे आणि समुद्राच्या लाटेमागे त्या अज्ञात क्रांतिकारकांचे रक्त आणि शौर्य दडलेले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: गोवा मुक्ती दिन (Goa Liberation Day) कधी साजरा केला जातो?

    Ans: १९ डिसेंबर १९६१ रोजी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त झाला, म्हणून दरवर्षी १९ डिसेंबर रोजी गोवा मुक्ती दिन साजरा होतो.

  • Que: गोवा मुक्त करण्यासाठी भारतीय सैन्याने कोणते ऑपरेशन राबवले?

    Ans: भारतीय सैन्याने गोव्याला मुक्त करण्यासाठी 'ऑपरेशन विजय' ही लष्करी कारवाई राबवली.

  • Que: गोव्यावर पोर्तुगीजांनी किती वर्षे राज्य केले?

    Ans: पोर्तुगीजांनी गोव्यावर तब्बल ४५१ वर्षे (१५१० ते १९६१) राज्य केले.

Web Title: Goa was freed from 451 years of slavery in just 36 hours know how the portuguese were expelled

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2025 | 08:30 AM

Topics:  

  • Goa
  • Goa News
  • navarashtra special
  • navarashtra special story

संबंधित बातम्या

International Migrants Day : 28 कोटी ‘अज्ञात नायकांचा’ जागतिक प्रगतीत मोठा वाटा; जाणून घ्या अर्थव्यवस्थेतील त्यांचे मोलाचे योगदान
1

International Migrants Day : 28 कोटी ‘अज्ञात नायकांचा’ जागतिक प्रगतीत मोठा वाटा; जाणून घ्या अर्थव्यवस्थेतील त्यांचे मोलाचे योगदान

Navarashtra Special: हिवाळ्यात पाण्याकडे दुर्लक्ष करताय? वेळीच सावध व्हा; नाहीतर..
2

Navarashtra Special: हिवाळ्यात पाण्याकडे दुर्लक्ष करताय? वेळीच सावध व्हा; नाहीतर..

Vijay Diwas 2025: ऐतिहासिक 16 डिसेंबर! याच दिवशी भारतीय सैन्याच्या पराक्रमापुढे पाकिस्तानी सैन्याने टेकले होते गुडघे
3

Vijay Diwas 2025: ऐतिहासिक 16 डिसेंबर! याच दिवशी भारतीय सैन्याच्या पराक्रमापुढे पाकिस्तानी सैन्याने टेकले होते गुडघे

Navarashtra Special: पुणे शहराबाहेर भरले ‘पक्ष्यांचे’ही संमेलन! उत्तर गोलार्धात बर्फ वृष्टी झाल्याने…
4

Navarashtra Special: पुणे शहराबाहेर भरले ‘पक्ष्यांचे’ही संमेलन! उत्तर गोलार्धात बर्फ वृष्टी झाल्याने…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Goa Liberation Day: 36 तासांचे ‘ऑपरेशन विजय’ ज्यामुळे भारताचा नकाशा पूर्णत्वास आला; पोर्तुगीज पळाले अन् तिरंगा फडकला

Goa Liberation Day: 36 तासांचे ‘ऑपरेशन विजय’ ज्यामुळे भारताचा नकाशा पूर्णत्वास आला; पोर्तुगीज पळाले अन् तिरंगा फडकला

Dec 19, 2025 | 08:30 AM
Numerology: सूर्य आणि शुक्राच्या युतीमुळे या मूलांकांच्या लोकांना मिळेल नशिबाची साथ

Numerology: सूर्य आणि शुक्राच्या युतीमुळे या मूलांकांच्या लोकांना मिळेल नशिबाची साथ

Dec 19, 2025 | 08:28 AM
Todays Gold-Silver Price: सोन्या – चांदीच्या दरात मोठा बदल? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या आजचे भाव

Todays Gold-Silver Price: सोन्या – चांदीच्या दरात मोठा बदल? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या आजचे भाव

Dec 19, 2025 | 08:24 AM
आंतरजातीय विवाहाच्या रागातून मुलाच्या कुटुंबास मारहाण; धमकीही दिली अन्…

आंतरजातीय विवाहाच्या रागातून मुलाच्या कुटुंबास मारहाण; धमकीही दिली अन्…

Dec 19, 2025 | 08:24 AM
IND vs SA Pitch Report : नरेंद्र मोदी स्टेडियमवर कोण वर्चस्व गाजवेल? कोणाचे नशीब चमकणार जाणून घ्या खेळपट्टीचा अहवाल

IND vs SA Pitch Report : नरेंद्र मोदी स्टेडियमवर कोण वर्चस्व गाजवेल? कोणाचे नशीब चमकणार जाणून घ्या खेळपट्टीचा अहवाल

Dec 19, 2025 | 08:22 AM
Christmas 2025 : ख्रिसमसला मुंबईतील या फेमस चर्चमध्ये मिळेल अविस्मरणीय अनुभव

Christmas 2025 : ख्रिसमसला मुंबईतील या फेमस चर्चमध्ये मिळेल अविस्मरणीय अनुभव

Dec 19, 2025 | 08:20 AM
हिवाळ्यात शरीराची ताकद वाढवण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात करा मेथी पनीर पराठ्याचे सेवन, नोट करून घ्या रेसिपी

हिवाळ्यात शरीराची ताकद वाढवण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात करा मेथी पनीर पराठ्याचे सेवन, नोट करून घ्या रेसिपी

Dec 19, 2025 | 08:00 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Satara :  पाचगणी हादरले, अमली पदार्थ विरोधी मोठी कारवाई, दहा ताब्यात; 42 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Satara : पाचगणी हादरले, अमली पदार्थ विरोधी मोठी कारवाई, दहा ताब्यात; 42 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Dec 18, 2025 | 08:35 PM
Beed News : मतमोजणी दिवशी अनुचित प्रकार टाळण्यासाठी बीड पोलीस अक्शन मोडवर

Beed News : मतमोजणी दिवशी अनुचित प्रकार टाळण्यासाठी बीड पोलीस अक्शन मोडवर

Dec 18, 2025 | 08:28 PM
Raju Shetti : थकीत एफआरपी  प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आक्रमक

Raju Shetti : थकीत एफआरपी प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आक्रमक

Dec 18, 2025 | 08:22 PM
Solapur : ‘उमेदवारी मिळाली नाही तर जीवाचे बरे-वाईट करीन’ इशाऱ्याने खळबळ, बिपीन धुम्मा आक्रमक

Solapur : ‘उमेदवारी मिळाली नाही तर जीवाचे बरे-वाईट करीन’ इशाऱ्याने खळबळ, बिपीन धुम्मा आक्रमक

Dec 18, 2025 | 07:27 PM
Prakash Shinde – ड्रग्स प्रकरणावरून आमच्या कुटुंबाला टार्गेट करण्याचा प्रयत्न

Prakash Shinde – ड्रग्स प्रकरणावरून आमच्या कुटुंबाला टार्गेट करण्याचा प्रयत्न

Dec 18, 2025 | 07:22 PM
BMC Election : मुंबई महापालिका निवडणुकीत जनतेचा कोणता मुद्दा गाजणार?

BMC Election : मुंबई महापालिका निवडणुकीत जनतेचा कोणता मुद्दा गाजणार?

Dec 18, 2025 | 07:12 PM
Truecaller ला टक्कर? आता अनोळखी कॉलवरही दिसणार थेट नाव; टेलिकॉम कंपन्यांचा मोठा निर्णय

Truecaller ला टक्कर? आता अनोळखी कॉलवरही दिसणार थेट नाव; टेलिकॉम कंपन्यांचा मोठा निर्णय

Dec 18, 2025 | 05:50 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.