बेशिस्त ऊस वाहतूकदारांवर कारवाईचा बडगा; पोलीस ‘या’ गोष्टींची करणार तपासणी
कॉलर नेम प्रेझेंटेशन (CNAP) म्हणजे काय?
देशातील सर्वात मोठ्या खाजगी टेलिकॉम कंपन्या यांनी देशभरातील विविध मंडळांमध्ये कॉलर नेम प्रेझेंटेशन (CNAP) सेवा सुरू केली आहे. जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया (VI ) या कंपनीचा यात समावेश आहे. या नवीन सेवेअंतर्गत, तुमचा फोन वाजताच तुम्हाला कॉल करणाऱ्याचे खरे आणि नोंदणीकृत नाव आता मोबाईल स्क्रीनवर दिसेल. यामुळे अज्ञात नंबर ओळखणे सोपे होईल आणि सायबर फसवणुकीला आळा बसेल. या नवीन उचलेल्या पावलात वैशिष्ट्य असे आहे की, जेव्हा तुम्हाला कॉल येतो तेव्हा सिम कार्डचा अधिकृत केवायसी कागदपत्रांमध्ये नोंदवलेले कॉलरचे खरे नाव आता तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
हे Truecaller पेक्षा वेगळे काय आहे?
सध्या आपण अनोळखी नाव ओळखण्यासाठी Truecaller चा सर्वात जास्त वापर करतो. जिथे वापरकर्ता मॅन्युअली नाव बदलू शकतो. मात्र CNAP थेट टेलिकॉम कंपन्यांच्या डेटाबेसशी जोडलेले आहे, त्यामुळे केवायसी कागदपत्रांमध्ये नोंदवलेले नाव प्रदर्शित केले जाणार. टेलिकॉम कंपन्या भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या निर्देशानुसार कॉलर नेम प्रेझेंटेशन हे अंमलात आणत आहे.
कोणती कंपनी कोणत्या राज्यात सेवा देत आहे?
Ans: CNAP म्हणजे Caller Name Presentation, ज्यात कॉल करणाऱ्याचे KYCमधील अधिकृत नाव दिसते.
Ans: Truecallerवर नाव बदलता येते, CNAP मध्ये फक्त टेलिकॉम KYC नावच दिसते.
Ans: Jio, Airtel, Vi वेगवेगळ्या राज्यांत सेवा देत आहेत; Vi महाराष्ट्रात लाईव्ह आहे.






