नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील पहिल्या अंडरवॉटर मेट्रो ट्रेनचं (PM Modi Inaugurate Underwater Metro) उद्घाटन केलं. कोलकात्यातील अंडरवॉटर मेट्रो ट्रेन हुगळी नदीच्या खाली बांधण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कोलकाता मेट्रो रेल्वे (कोलकाता अंडरवॉटर मेट्रो) सेवांचा आढावा घेतला होता आणि आज पंतप्रधान मोदींनी मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत प्रवासही केला.
[read_also content=”झारंखड अत्याचार प्रकरणी धक्कादायक माहिती, स्पॅनिश महिलेवर नराधमांनी अडीच तास केला अत्याचार; धमकावलं, सामानही लुटलं! https://www.navarashtra.com/india/spanish-women-gangrape-in-jharkhand-dumka-fir-report-reveals-details-related-to-incident-nrps-513164.html”]
पंतप्रधान मोंदीनी कोलकाता येथून वर्चुअली आग्रा मेट्रोचं उद्घाटनही केले आहे. आग्रा येथील मेट्रो ताजमहाल मेट्रो स्टेशनपासून सुरू करण्यात आली आहे.
#WATCH | West Bengal: Prime Minister Narendra Modi interacts with school students as they travel in India’s first underwater metro train, in Kolkata. pic.twitter.com/lQye0OnuqP — ANI (@ANI) March 6, 2024
हावडा मैदान-एस्प्लेनेड सेक्शन दरम्यान हा अंडरवॉटर मेट्रो बोगदा धावेल. हा मेट्रो बोगदा हुगळी नदीच्या पातळीपासून 32 मीटर खाली बांधण्यात आला आहे. कोलकाता मेट्रो हावडा मैदान-एस्प्लेनेड बोगदा हा भारतातील कोणत्याही नदीखाली बांधला जाणारा पहिला वाहतूक बोगदा आहे. ही भूमिगत मेट्रो 45 सेकंदात हुगळी नदीखालील 520 मीटर अंतर कापेल, असा विश्वास आहे.
काही पाण्याखालील मेट्रो मार्ग पूर्व-पश्चिम कॉरिडॉरचा (ग्रीन लाइन) भाग आहेत, ज्यामध्ये हावडा मैदान ते एस्प्लेनेड हा ४.८ किमीचा मार्ग तयार आहे. यात 4 भूमिगत स्थानके आहेत – हावडा मैदान, हावडा स्टेशन, महाकरण आणि एस्प्लेनेड. हावडा स्टेशन जमिनीपासून 30 मीटर अंतरावर आहे. खाली केले. हे जगातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन आहे. सध्या, पाण्याखालील मेट्रो मार्ग फक्त लंडन आणि पॅरिसमध्ये बांधले गेले आहेत.






