लवकरच वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता (फोटो- सोशल मिडिया)
क्रिकेट जगतातील सर्वात मोठी आणि मानाची स्पर्धा असलेल्या आयसीसी वर्ल्डकप स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पुढील वर्षी ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर जगातील सर्वच प्रमुख संघांनी आपली तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आयसीसी लवरकच याचे वेळापत्रक जाहीर करू शकते असे म्हटले जात आहे.
क्रिकेटच्या इतिहासात मोठी खळबळ! ‘हा’ संघ ICC World Cup 2027 मधून बाहेर होणार? एकेकाळी…
२०२७ चा आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप आफ्रिका खंडात खेळवला जाणार आहे. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया हे तीन देश संयुक्तपणे या स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहेत. यावेळेस 14 संघ यामध्ये सहभागी होणार आहेत. आयसीसीने या स्पर्धेसाठी २००३ च्या वर्ल्डकप प्रमाणेच ‘सुपर ६’फॉरमॅट पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा फॉरमॅट अत्यंत रोमांचक असणार आहे.
आयसीसी वर्ल्डकपला अवघा एक वर्ष उरल्यामुळे भारतीय संघासह ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांसारख्या दिग्गज संघांनी वनडे फॉर्मटवर भर देण्यास सुरुवात केली आहे. तरुण खेळाडूंना संधी देणे आणि संघाचे संतुलन निर्माण करणे यावर सर्वच व्यवस्थापनांचा भर असल्याचे दिसून येत आहे.
Team India मध्ये उडाली खळबळ! सुनील गावस्करांचा World Cup चा हा कसला संघ? ‘या’ खेळाडूला ठेवले बाहेर
वेळापत्रक आणि मैदानांची घोषणा झाल्यानंतर सर्व सहभागी १४ संघांना आपल्या तयारीला अंतिम स्वरूप देणे सोपे जाणार आहे. विरोधी संघानुसार रणनीती आखणे, ठराविक मैदानांच्या परिस्थितीनुसार अंतिम १५ खेळाडूंची निवड करणे आणि प्रवासाचे नियोजन करणे यासाठी सर्वच क्रिकेट बोर्डांना योग्य वेळ मिळणार आहे. आता स्पर्धेला अवघ्या एका वर्षाचा कालावधी शिल्लक असल्याने, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद कोणत्याही क्षणी या महाकुंभाच्या वेळापत्रकाची अधिकृत घोषणा करू शकते.






