
दिल्लीतील स्फोटात १० जणांचा मृत्यू तर ३० पेक्षा जास्त जखमी
दिल्लीतील स्फोट हा दहशतवादी हल्लाच असल्याचा संशय
या घटनेतील आरोपींंना सोडणार नसल्याचे मोदींचे भाष्य
PM Narendra Modi: सोमवारी राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशन परिसरात भीषण स्फोट झाला. या हल्ल्यात १० जणांचा मृत्यू झाला तर ३० पेक्षा जास्त जखमी झाले आहेत. दरम्यान भुतान दौऱ्यावरून परत येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रूग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली आहे. तसेच या घटनेचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला आहे.
दिल्लीतील लाल किल्ला परिसरात भीषण स्फोट झाला होता. तिथे आढळून आलेले पुरावे किंवा आतापर्यंत अटक करण्यात आलेली आरोपींचे कनेक्शन पाहता हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले जात आहे. या घटनेतील दोषी लोकांना सोडले जाणार नसल्याचे मोदी यांनी सांगितले आहे.
या घटनेचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला आहे. या घटनेचे महाराष्ट्र कनेक्शन देखील समोर आले आहे. या स्फोटानंतर संपूर्ण देशभरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्फोटात जखमी झालेल्या नागरिकांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. तसेच आरोपीना सोडले जाणार नाही याबाबत विश्वास देखील दिला.
ज्या गाडीतून हा स्फोट करण्यात आला त्या गाडीचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे. ही गाडी हरियाणामधील असल्याचे समोर आले आहे. संपूर्ण देशात हाय अलर्ट देण्यात आला आहे. तसेच सागरी मार्गवर गस्त वाढवली गेली आहे. महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवली गेली आहे.
Delhi Blast नंतर कोकण किनारपट्टीवर हालचाली वाढल्या; सुरक्षा दलांनी थेट 525…
कोकण किनारपट्टीवर हालचाली वाढल्या
दिल्लीत झालेल्या स्फोटाच्या गंभीर घटनेनंतर देशभरातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. याचे थेट पडसाद आता महाराष्ट्राच्या संवेदनशील अशा कोकण किनारपट्टीवर देखील उमटले असून, संपूर्ण सागरी पट्टयात ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी शहर पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेच्या पार्श्वभूमीवर कोकणातील तब्बल ५२५ लैंडिंग पॉईंट ‘संवेदनशील’ म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. या सर्व ठिकाणी सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस दलाकडून सागरी किनारी भागात गस्त वाढवण्यात आली आहे. समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छिमारी नौकांवर आणि त्यांच्या हालचालींवर पोलीस बारकाईने लक्ष ठेवून आहेत.