राजधानी दिल्लीत सोमवारी झाला भीषण स्फोट
स्फोटानंतर किनारपट्टीवर हाय अलर्ट
किनारपट्टीवर बॉम्ब शोधक पथक तैनात
रत्नागिरी: दिल्लीत झालेल्या स्फोटाच्या गंभीर घटनेनंतर देशभरातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. याचे थेट पडसाद आता महाराष्ट्राच्या संवेदनशील अशा कोकण किनारपट्टीवर देखील उमटले असून, संपूर्ण सागरी पट्टयात ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी शहर पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेच्या पार्श्वभूमीवर कोकणातील तब्बल ५२५ लैंडिंग पॉईंट ‘संवेदनशील’ म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. या सर्व ठिकाणी सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस दलाकडून सागरी किनारी भागात गस्त वाढवण्यात आली आहे. समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छिमारी नौकांवर आणि त्यांच्या हालचालींवर पोलीस बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
बॉम्बशोधक पथकही तैनात; कसून तपासणी
केवळ जलमार्गच नव्हे, तर सागरी महामार्गावरून जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांवरही पोलिसांची करडी नजर आहे. अनेक ठिकाणी नाकाबंदी करून येणाऱ्या जाणाऱ्या संशयित वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून किनारी भागात बॉम्ब शोध पथक व ‘शिवानी’ पथकाकडून देखील सुरक्षा तपासणी केली जात आहे. ही पथके किनारी भागातील संशयास्पद हालचाली आणि वस्तूंची तपासणी करत आहेत. पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांनी सांगितले की, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मात्र सतर्क राहून कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दिल्लीत झालेल्या स्फोटाबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर
राजधानी दिल्लीत लाल किल्ल्याजवळ कारमध्ये भीषण स्फोट झाला. या स्फोटाने संपूर्ण राजधानी हादरली आहे. अवघ्या काही मिनिटांत घडलेल्या घटनांमुळे तपास यंत्रणांनाही धक्का बसला आहे. दिल्ली पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांकडून विविध शक्यता लक्षात घेता तपास केला जात आहे. या स्फोटात अमोनियम नायट्रेट, इंधन तेल आणि डिटोनेटर कार वापरल्याचे म्हटले जात आहे. त्यानुसार, प्रयत्न केले जात आहेत.
पोलिस यंत्रणांकडून याचा तपास केला जात आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने प्राथमिक तपासानुसार, घटनास्थळावरून 120 कारसह खराब झालेल्या वाहनांचे पुरावे गोळा करण्यात आल्याचे सांगितले. हे पुरावे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांनी कलमांतर्गत उत्तर दिल्लीतील कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलिसांकडून विशेष कक्षाकडे वर्ग करण्यात आला आहे. विशेष कक्ष तपासाचे नेतृत्व करेल आणि आवश्यकतेनुसार केंद्रीय संस्थांशीस समन्वय साधला जाईल, असे म्हटले जात आहे.
दरम्यान, या तपासाचे नेतृत्व करणारे अधिकारी, विशेष सीपी (विशेष सेल) अनिल शुक्ला हे तेच अधिकारी आहेत, ज्यांनी २०१९ च्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) तपास पथकाचे नेतृत्व केले होते.






