PM Narendra Modi reaction on his mother video in Assam visit speech political news
आसाम : बिहारमध्ये लवकरच विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगणार आहे. त्यापूर्वी जोरदार राजकीय वातावरण तापले आहे. भाजप आणि कॉंग्रेसमधून जोरदार राजकीय वादंग निर्माण झाला आहे. भाषणामधून,रॅलीमधून तर टीका केलीच जात आहे. त्याचबरोबर सोशल मीडिया वापर करुन देखील दोन्ही पक्ष एकमेकांवर टीकास्त्र डागत आहेत. यामध्ये बिहार कॉंग्रेस या सोशल मीडिया अकाऊंटवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वर्गवासी आईबाबत व्हिडिओ शेअर करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका भाषणामध्ये यावर प्रतिक्रिया देत सूचक विधान केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या आसाम दौऱ्यादरम्यान विरोधकांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी स्वतःला भगवान शिवाचे भक्त म्हटले आहे. पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवरही हल्लाबोल केला आणि म्हटले की त्यांचे नियंत्रण फक्त लोकांच्या हातात आहे. पंतप्रधानांनी दरंग मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, एक नर्सिंग कॉलेज आणि एक जीएनएम स्कूलची पायाभरणी केली. या प्रकल्पांमध्ये एकूण ५७० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. यासोबतच, गुवाहाटी रिंग रोड प्रकल्प देखील सुरू करण्यात आला, ज्यामुळे राज्याचे वाहतूक नेटवर्क सुधारेल. यावेळी पंतप्रधान मोदींनी दिलेल्या भाषणामध्ये विरोधकांवर टीकास्त्र डागले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
भगवान शिवाचे नाव घेत विरोधकांवर निशाणा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात विरोधकांवर निशाणा साधला आणि ते म्हणाले, “मी भगवान शिवाचा भक्त आहे. कोणी मला कितीही शिव्या दिल्या तरी मी सर्व विष गिळून टाकतो.” ते म्हणाले की ते टीकेला घाबरत नाहीत आणि त्यांचे रिपोर्ट कार्ड जनतेसमोर आहे, जनताच त्यांचे खरे स्वामी आहेत, असे मत पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले.
भूपेन हजारिका यांचा अपमान केल्याचा आरोप
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर आसामचे महान गायक आणि भारतरत्न भूपेन हजारिका यांचा अपमान केल्याचा आरोपही केला. ते म्हणाले की काँग्रेसने नेहमीच ईशान्येकडील ओळख आणि संस्कृतीचा अनादर केला आहे. काँग्रेस पक्षावर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, माझा अहवाल फक्त देशातील १४० कोटी लोकांचा आहे आणि ते माझे स्वामी देखील आहेत, अशी टीका मोदींनी केली.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
ऑपरेशन सिंदूर नंतर आसामचा पहिला दौरा
ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच आसाममध्ये आल्याचे म्हणाले. केंद्र सरकारच्या सुरक्षा व्यवस्था आणि कृतींकडे लक्ष वेधताना त्यांनी हे सांगितले. ते म्हणाले की हे सरकार आसाम आणि ईशान्येकडील विकासाला प्राधान्य देते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारमधील दरभंगा येथे विरोधी पक्षाच्या ‘इंडिया’च्या मतदार हक्क यात्रेच्या व्यासपीठावरून पंतप्रधान आणि त्यांच्या आईला शिवीगाळ करण्यात आल्याच्या अलिकडच्या घटनेचा उल्लेख केला. या प्रकरणात भाजपने कायदेशीर कारवाई केली आणि पाटण्यातील कोतवाली पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. दरभंगा पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या सिंहवाडा पोलिस स्टेशन परिसरातील रहिवासी मोहम्मद रिझवी उर्फ राजा याला अटक केली आहे. याचबरोबर कॉंग्रेसकडून मोदींच्या आईचा AI ने बनवलेली व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. यावरुन भाजप नेत्यांनी जोरदार टीका देखील केली.