Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Assembly Election : अहो आश्चर्यम! पंतप्रधान मोदींनी चक्क केला उमेदवाराला खाली वाकून नमस्कार, कारण काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये जोरदार सभांचा धडाका लावला आहे. मात्र  घोंडा येथील सभेमध्ये पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या कृतीची जोरदार चर्चा रंगत आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 30, 2025 | 01:04 PM
PM Narendra Modi touches feet of Ravindra Singh Negi video viral Ghonda delhi elections

PM Narendra Modi touches feet of Ravindra Singh Negi video viral Ghonda delhi elections

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. 70 विधानसभा मतदारसंघासाठी एकाच टप्प्यामध्ये मतदान पार पडणार आहे. येत्या 5 फेब्रुवारी रोजी मतदान तर 8 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल हाती येणार आहे. दिल्लीच्या प्रचारासाठी भाजपने मोठा प्लॅन आखला आहे. स्टार प्रचारकांसह शेजारील राज्यातील नेते देखील जोरदार प्रचार करत आहेत. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रिंगणात उतरले आहे. मात्र प्रचारावेळी पंतप्रधान मोदी हे चक्क एका तरुण उमेदवाराची खाली वाकून पाया पडले आहेत. त्यांच्या या कृतीमुळे मंचावरील सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

दिल्लीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभेला उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी आम आदमी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. मात्र त्यांच्या टीकेपेक्षा त्यांची एक कृतीची जोरदार चर्चा सुरु आहे.  घोंडा येथे पंतप्रधान मोदींची जाहीर सभा होत असताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विरेंद्र सचदेव यांनी सर्व उमेवारांना मंचावर बोलावले होते. उमेदवार येऊन नरेंद्र मोदींची भेट घेतल होते तसेच त्यांचे आशिर्वाद घेत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमी त्यांच्या पाया पडत असलेल्या व्यक्तीला अडवतात. कोणाला नरेंद्र मोदी हे पाया पडून देत नाहीत. मात्र दिल्लीच्या टपडगंज विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार असलेल्या रवींद्र सिंह नेगी यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाया पडले आहेत.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपाचे उमेदवार असलेल्या रवींद्र सिंह नेगी यांच्या एकदा नाही तर तीन वेळा पाया पडले आहेत. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा मंचावरील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. नेगी यांच्यानंतर विश्वास नगरचे उमेदवार ओम प्रकाश शर्मा यांनीही मोदी यांच्या पाया पडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना मध्येच अडविण्यात आले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन वेळा पाया पडलेले अनेक नेटकऱ्यांना आवडलेले नाही. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये १.२० ते १.२६ सेकंदाला पंतप्रधान मोदींनी केलेल्या कृती चर्चेचा विषय ठरत आहे.

VIDEO | Delhi Elections 2025: PM Modi (@narendramodi) meets BJP candidates during ‘Sankalp Rally’ at Kartar Nagar.#DelhiElectionsWithPTI #DelhiElections2025 (Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/H3sM0z63h3 — Press Trust of India (@PTI_News) January 29, 2025

कोण आहेत रवींद्र सिंह नेगी?

रवींद्र सिंह नेगी हे सध्या विनोद नगरमधून नगरसेवक आहेत. हा विभाग पटपडगंज विधानसभा मतदारसंघामध्ये येतो. रवींद्र सिंह नेगी हे त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेच्या वर्तुळामध्ये आले आहेत. त्यांनी काही व्हिडीओ शेअर केले होते, ज्यामुळे वाद उद्भवला. पश्चिम विनोद नगर येथे असलेल्या एका डेअरीच्या समोर उभे राहून नेगी यांनी डेअरी चालकाला धमकावले होते. अल्तमश तोमर नामक मालकाच्या डेअरीचे नाव फक्त तोमर ठेवण्यात आले होते. नेगींचे म्हणणे होते की, तुमचे पहिले नाव जे काही असेल, तेही दुकानावर दिसले पाहीजे. फक्त तोमर लिहून चालणार नाही. जर पूर्ण नाव दुकानावर लिहिले नाही तर दुकान बंद करू, अशीही धमकी त्यांनी दिली होती.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

याशिवाय नेगी यांनी हिंदू फेरीवाल्यांनाही आवाहन करत असताना भगवा झेंडा गाडीवर लावण्यास सांगितले होते. तसेच हिंदू सणांआधी त्यांनी खाटिकाच्या दुकानाला भेट देऊन सणांच्या काळात दुकान बंद ठेवण्यास सांगितले होते, यामुळे रवींद्र सिंह नेगी हे चर्चेत आले आहेत. रवींद्र सिंह नेगी यांच्याविरोधात आम आदमी पक्षाचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे मागील निवडणुकीमध्ये उभे होते. अगदी कमी मतांनी त्यांचा पराभव झाला होता.

Web Title: Pm narendra modi touches feet of ravindra singh negi video viral ghonda delhi elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2025 | 01:04 PM

Topics:  

  • AAP
  • BJP
  • narendra modi

संबंधित बातम्या

कॉंग्रेस नेत्याची जीभ वळवळली! RSS चा दहशतवादी संघटना असा उल्लेख; BJP ने प्रत्युत्तर देत लाजच काढली
1

कॉंग्रेस नेत्याची जीभ वळवळली! RSS चा दहशतवादी संघटना असा उल्लेख; BJP ने प्रत्युत्तर देत लाजच काढली

Rahul Gandhi: “लोकशाहीवरील हल्ला हा भारतासाठी सर्वात मोठा धोका…”, राहुल गांधी यांची कोलंबियामध्ये मोदी सरकारवर टीका
2

Rahul Gandhi: “लोकशाहीवरील हल्ला हा भारतासाठी सर्वात मोठा धोका…”, राहुल गांधी यांची कोलंबियामध्ये मोदी सरकारवर टीका

RSS@100: ‘संघात जातीच्या आधारावर कोणताही भेदभाव…’, RSSच्या विजयादशमी सोहळ्यात रामनाथ कोविंद काय म्हणाले?
3

RSS@100: ‘संघात जातीच्या आधारावर कोणताही भेदभाव…’, RSSच्या विजयादशमी सोहळ्यात रामनाथ कोविंद काय म्हणाले?

स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच भारतीय मुद्रेवर भारत मातेचं चित्र…, नरेंद्र मोदी RSS विशेष तिकीट अन् नाण्याबद्दल काय म्हणाले?
4

स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच भारतीय मुद्रेवर भारत मातेचं चित्र…, नरेंद्र मोदी RSS विशेष तिकीट अन् नाण्याबद्दल काय म्हणाले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.