राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी (President Draupadi Murmu) शनिवारी पाच व्यक्तिंना देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न (Bharat Ratna Award 2024) प्रदान केला. राष्ट्रपतींनी माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव, माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग, कृषी शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन आणि कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न प्रदान केले. हे चारही पुरस्कार मरणोत्तर देण्यात आले आहेत.
[read_also content=”मुख्तार अन्सारीवर पार पडले अंत्यसंस्कार, स्मशानभूमीत फक्त कुटुंबीयांनाच प्रवेश, हजारो लोक बाहेर उपस्थित! https://www.navarashtra.com/latest-news/up-gangster-mukhtar-ansari-funeral-at-kali-bagh-graveyard-in-ghazipur-nrps-519067.html”]
दिवंगत माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांचा पुरस्कार त्यांचे पुत्र पीव्ही प्रभाकर राव यांनी स्वीकारला. चौधरी चरणसिंग यांचे नातू जयंत सिंह यांनी दादांचा पुरस्कार स्वीकारला. यासोबतच एमएस स्वामिनाथन यांची मुलगी नित्या रावही पुरस्कार स्वीकारण्यासाठी कार्यक्रमाला पोहोचली होती.
राष्ट्रपती भवनातीलच दरबार हॉलमध्ये शनिवारी भारतरत्न पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. उपाध्यक्ष जगदीप धनखर, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक बडे नेते आणि व्यक्तिमत्त्व या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
भारतरत्न कर्पुरी ठाकूर यांचे पुत्र राम नाथ ठाकूर यांनी त्यांच्या वडिलांचा सन्मान स्वीकारताना सांगितले की, त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या वडिलांना केंद्र सरकारने पुरस्कृत केले ही अतिशय आनंदाची बाब आहे. संपूर्ण देशाच्या वतीने मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो, असे ते म्हणाले.
LIVE: President Droupadi Murmu presents Bharat Ratna Awards at Rashtrapati Bhavan https://t.co/KDAJF6vvOK — President of India (@rashtrapatibhvn) March 30, 2024