उमदी अप्पर तहसीलदार कार्यालयास २२ गावांचा समावेश; संख कार्यालयाकडे २९ गावे; आमदार गोपीचंद पडळकर (फोटो सौजन्य-X)
आ. पडळकर यांनी विधान परिषद सदस्य असताना या भागातील नागरिकांची दीर्घकाळची मागणी म्हणून उमदी येथे स्वतंत्र अप्पर तहसीलदार कार्यालय सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. मार्च २०२४ मध्ये महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा झाली. संख–उमदी भागातील जुने विवाद आणि प्रशासकीय अडचणी लक्षात घेऊन हा निर्णय अंतिम टप्प्यात आला. (Gopichand Padalkar)
उमदी, विठ्ठलवाडी, उटगी, लमाण तांडा उटगी, निगडी बुद्रुक, सुसलाद, सोनलगी, बोर्गी खुर्द, अक्कळवाडी, मानिकनाळ, बोर्गी बुद्रुक, बालगाव, हळ्ळी, करजगी, बेळोंडगी, जाडर, बोबलाद, सोन्याळ, लकडेवाडी, गिरगाव, लवंगा, गुलगुंजनाळ, जालीयाळ बुद्रुक.
संख, गोंधळेवाडी, खंडनाळ, दरीबडची, लमाण तांडा दरीबडची, आसंगी तुर्क, कागनरी, मोटेवाडी आसंगी, धुळकरवाडी, अंकलगी, कुलाळवाडी, सिद्धनाथ, जालीयाळ खुर्द, पांढरेवाडी, तीकोंडी, पांडोझरी, पारधेवस्ती, करेवाडी (तीकोंडी), कोंतेव बोबलाद, करेवाडी (को. बो.), मोटेवाडी (को. बो.), कोणबगी, मोरबगी, भिवर्गी, माडग्याळ, व्हसपेठ, गुड्डापूर, आसंगी जत, तिल्ल्याळ.
आ. पडळकर यांनी सांगितले की संख परिसरात विविध शासकीय सुविधा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असून त्यामध्ये संख येथे सरकारी हॉस्पिटल प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. रेशीम प्रशिक्षण व उद्योग केंद्र वस्त्र उद्योग मंत्र्यांकडे मागणी सादर करण्यात आली आहे. “माझा स्वभाव कुणावर अन्याय करण्याचा नाही. सर्व घटकांना न्याय मिळावा या तत्त्वावरच ही प्रक्रिया राबवली आहे.” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
जत मतदारसंघातील नागरिकांनी दिलेला विश्वास मोठी जबाबदारी असल्याचे सांगून आ. पडळकर म्हणाले की ते न्याय, सुविधा व प्रशासन सुलभता या तत्त्वांवर काम करत राहतील.






