Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता खासगी कंपन्या ट्रेन चालवणार; 40 टक्केच असणार भारतीय रेल्वेचा हिस्सा

सध्या ज्या प्रकारचे रेल्वे मार्ग बांधले जात आहेत, त्याच प्रकारचे रेल्वे मार्ग खासगी कंपन्या बांधतील, अशी माहिती देण्यात आली आहे. भारतीय रेल्वेने एकूण ६४७किलोमीटर लांबीचे सहा रेल्वे मार्ग निश्चित केले आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 01, 2026 | 02:40 PM
Pune Railway, IRCTC, Diwali Ticket Booking, Indian Railways, Pune News, Festival Rush, Special Trains

Pune Railway, IRCTC, Diwali Ticket Booking, Indian Railways, Pune News, Festival Rush, Special Trains

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : आता खासगी कंपन्या भारतात रेल्वे ट्रॅक बांधून त्यावर ट्रेन चालवणार आहेत. यासाठी ६ ठिकाणचे मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. भारतीय रेल्वेचाही यात हिस्सा असणार आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या सार्वजनिक-खाजगी भागीदारी मूल्यांकन समितीने अशा प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. हायब्रीड अॅन्युइटी मॉडेलचा वापर करून देशात ६ रेल्वे कॉरिडॉर विकसित करण्याचा हा प्रस्ताव आहे.

सध्या ज्या प्रकारचे रेल्वे मार्ग बांधले जात आहेत, त्याच प्रकारचे रेल्वे मार्ग खासगी कंपन्या बांधतील, अशी माहिती देण्यात आली आहे. भारतीय रेल्वेने एकूण ६४७ किलोमीटर लांबीचे सहा रेल्वे मार्ग निश्चित केले आहेत. हे मार्ग हायब्रीड अॅन्युइटी मॉडेल (एचएएम) अंतर्गत बांधले जातील. प्रकल्पाच्या खर्चात खासगी कंपन्या ६० टक्के, तर रेल्वे ४० टक्के योगदान देणार आहे.

हायब्रीड अॅन्युइटी मॉडेलवर विकसित

सुरुवातीला हे ६ मार्ग डिझाइन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट आणि ट्रान्सफर या सूत्रानुसार विकसित करण्याचे नियोजन होते; परंतु आता ते हायब्रीड अॅन्युइटी मॉडेलवर विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कारण रेल्वे मंत्रालयाला असा अभिप्राय मिळाला होता की, रेल्वे मार्गासाठी कोणतीही खासगी कंपनी १०० टक्के गुंतवणूक करण्यास तयार होणार नाही. पीपीपीएसीने ६ रेल्वे मार्गांना मंजुरी दिली आहे. यापैकी ४ ओडिशामध्ये, एक तेलंगणामध्ये आणि एक झारखंडमध्ये आहे, असे सांगितले जात आहे.

मंत्रिमंडळाकडे मंजुरीसाठी पाठवणार

दरम्यान, हा प्रस्ताव काही दिवसांतच केंद्रीय मंत्रिमंडळाकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल. एकदा मंजुरी मिळाल्यानंतर निविदा मागवल्या जातील. विशेष म्हणजे सार्वजनिक-खासगी भागीदारी सूत्रानुसार नवीन रेल्वे मार्ग प्रकल्प विकसित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या ६ नवीन रेल्वे मार्गांच्या प्रकल्पाचा अंदाजित खर्च १५,९७६ कोटी रुपये आहे. संपूर्ण सवलत कालावधी विचारात घेतल्यास या प्रकल्पांचा एकूण भांडवली खर्च ४०८६६ कोटी रुपये होईल. या मार्गावरून प्रामुख्याने कोळसा, लोहखनिज, बॉक्साईट, लोह वितळवण्यासाठीचा कोळसा किंवा कोक, रासायनिक खते, सिमेंट आणि काही धान्यांची वाहतूक केली जाईल, असे समजते.

Apple च्या सिंहासनावर नवा चेहरा ! Tim Cook यांच्यानंतर John Ternus हाती घेणार कंपनीची सूत्रे, कसा आहे आतापर्यंतचा प्रवास? जाणून घ्या

Web Title: Private companies will now operate trains

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 01:44 PM

Topics:  

  • Indian Railway

संबंधित बातम्या

Mumbai News: काश्मिरी सफरचंद आता अवघ्या ३० तासांत मुंबईत! वाहतूक खर्चात ६०% कपात, रस्ते मार्गाऐवजी रेल्वे स्वस्त
1

Mumbai News: काश्मिरी सफरचंद आता अवघ्या ३० तासांत मुंबईत! वाहतूक खर्चात ६०% कपात, रस्ते मार्गाऐवजी रेल्वे स्वस्त

Travel News : ट्रॅफिकमध्ये अडकलाय आणि ट्रेन सुटणार आहे? टेन्शन घेऊ नका, रेल्वे देते बोर्डिंग स्टेशन बदलण्याची संधी
2

Travel News : ट्रॅफिकमध्ये अडकलाय आणि ट्रेन सुटणार आहे? टेन्शन घेऊ नका, रेल्वे देते बोर्डिंग स्टेशन बदलण्याची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.