Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतात ‘प्रायव्हेट जेट’चा व्यवसाय किती मोठा? उड्डाणाचे नियम काय? जाणून घ्या चार्टर्ड प्लेनची संपूर्ण A टू Z सिस्टीम

अजित पवार हे मुंबईहून बारामतीसाठी 'लियरजेट-४५' (Learjet-45) या खासगी विमानाने रवाना झाले होते. बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर लँडिंग करत असताना तांत्रिक बिघाड झाल्याने हा अपघात घडला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 28, 2026 | 07:03 PM
भारतात 'प्रायव्हेट जेट'चा व्यवसाय किती मोठा? (photo Credit- X)

भारतात 'प्रायव्हेट जेट'चा व्यवसाय किती मोठा? (photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • भारतात ‘प्रायव्हेट जेट’चा व्यवसाय किती मोठा?
  • उड्डाणाचे नियम काय?
  • जाणून घ्या चार्टर्ड प्लेनची संपूर्ण A टू Z सिस्टीम
Ajit Pawar Plane Crash News: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बारामतीमधील विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. या भीषण घटनेमुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली असतानाच, भारतातील खासगी चार्टर्ड विमानांची सुरक्षा, त्यांचे नियम आणि वाढता व्यवसाय पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत नेत्यांचे ‘हवाई दौरे’ वाढले असतानाच घडलेल्या या घटनेने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

नेमकी घटना काय घडली?

अजित पवार हे मुंबईहून बारामतीसाठी ‘लियरजेट-४५’ (Learjet-45) या खासगी विमानाने रवाना झाले होते. बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर लँडिंग करत असताना तांत्रिक बिघाड झाल्याने हा अपघात घडला. प्राथमिक अहवालानुसार, लँडिंगच्या वेळी वैमानिकाला धावपट्टी स्पष्ट दिसली नाही, ज्यामुळे विमानावरचे नियंत्रण सुटले आणि ते कोसळले. या घटनेनंतर विमानाने पेट घेतला, ज्यामध्ये मोठी हानी झाली.

भारतात खासगी विमानांचे व्यवसाय किती मोठे?

गेल्या काही वर्षांत भारतात कॉर्पोरेट आणि राजकीय कारणांसाठी खासगी विमानांचा वापर वेगाने वाढला आहे. ‘इंडल्झ ग्लोबल’ आणि ‘एसबीएस एव्हिएशन’च्या आकडेवारीनुसार, भारतात सध्या १६८ खासगी जेट आहेत. २०१६ मध्ये ही संख्या ११४ होती, म्हणजेच दरवर्षी सरासरी ७ नवीन विमाने भारतात येत आहेत. खासगी आणि भाड्याने मिळणारी (चार्टर्ड) विमाने मिळून ही संख्या ४०० च्या पार गेली आहे. २०२४ मध्ये भारताचा चार्टर्ड प्लेन व्यवसाय २५ अब्ज रुपयांवर (२७४ दशलक्ष डॉलर्स) पोहोचला असून, २०२९ पर्यंत तो दुप्पट होण्याची चिन्हे आहेत. एका खासगी विमानाचे भाडे सरासरी ३ लाख रुपये प्रति तास इतके असते.

Ajit Pawar Death News: अश्रूंचा बांध फुटला! सुनेत्रा पवार हात जोडून सुन्न अवस्थेत; फडणवीस आणि शिंदेंनी घेतली भेट

जमिनीपासून हवेपर्यंत: कशी चालते खासगी विमानांची सिस्टीम?

खासगी विमान उडवणे ही केवळ श्रीमंती नसून ती एक जटिल तांत्रिक प्रक्रिया आहे. यासाठी खालील नियमांचे पालन करावे लागते:

DGCA ची कडक नजर: भारतात कोणतेही खासगी विमान उडवण्यासाठी नागरी विमान वाहतूक संचालनालय (DGCA) कडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्यांच्या परवान्याशिवाय एकही विमान हवेत झेपावू शकत नाही.

टॅक्स आणि सवलती: खासगी विमानांना कोणत्याही प्रकारची सरकारी कर सवलत मिळत नाही. दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट केल्यानुसार, ही विमाने सार्वजनिक सेवेसाठी नसल्याने त्यांना सर्व व्यावसायिक टॅक्स भरावे लागतात.

देखभाल आणि पार्किंग: विमानांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी CAR-M आणि CAR-145 या नियमांतर्गत त्यांची नियमित तपासणी केली जाते. विमानतळावर पार्किंगसाठी मालकांना मोठी रक्कम मोजावी लागते.

ATC आणि रूटमॅप: उड्डाणापूर्वी वैमानिकाला एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) ला आपला पूर्ण प्रवास मार्ग (Route Map) द्यावा लागतो. हवेतील गर्दी आणि हवामान पाहून एटीसी परवानगी देते.

अनुभवी वैमानिक: खासगी जेटसाठी विशेष परवाना असलेले अनुभवी वैमानिकच नियुक्त केले जातात. त्यांच्या आरोग्याची आणि कौशल्याची नियमित तपासणी डीजीसीएद्वारे केली जाते.

Sharad Pawar on Ajit Pawar Death: राज्याचं झालेलं नुकसान भरून निघणार नाही; शरद पवार यांना अश्रू अनावर 

Web Title: Private jet business in india chartered plane rules and system

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2026 | 07:03 PM

Topics:  

  • ajit pawar
  • baramati
  • plane crash news

संबंधित बातम्या

Ajit Pawar Death News: अश्रूंचा बांध फुटला! सुनेत्रा पवार हात जोडून सुन्न अवस्थेत; फडणवीस आणि शिंदेंनी घेतली भेट
1

Ajit Pawar Death News: अश्रूंचा बांध फुटला! सुनेत्रा पवार हात जोडून सुन्न अवस्थेत; फडणवीस आणि शिंदेंनी घेतली भेट

Ajit Pawar Plane Crash: “तो आवाज कानात घुमतो आहे”, अपघातापूर्वी अजित पवारांनी शेवटचा फोन कुणाला केला होता?
2

Ajit Pawar Plane Crash: “तो आवाज कानात घुमतो आहे”, अपघातापूर्वी अजित पवारांनी शेवटचा फोन कुणाला केला होता?

Ajit Pawar Passed Away : बातमी कळताच मनात धस्स झाले! अजित पवारांच्या निधनावर आमदार सुनील शेळकेंची भावूक प्रतिक्रिया
3

Ajit Pawar Passed Away : बातमी कळताच मनात धस्स झाले! अजित पवारांच्या निधनावर आमदार सुनील शेळकेंची भावूक प्रतिक्रिया

Helicopter Crash And Plane Crash: विमान अपघात की हेलिकॉप्टर अपघात, कोणते जास्त धोकादायक? विमान कसं कोसळतं…
4

Helicopter Crash And Plane Crash: विमान अपघात की हेलिकॉप्टर अपघात, कोणते जास्त धोकादायक? विमान कसं कोसळतं…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.