Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 16 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Puri Rath Yatra 2026 : मोठी बातमी! पुरी जगन्नाथ रथयात्रेत चेंगराचेंगरी; 200 भाविक जखमी, श्वास कोंडल्याने एका भाविकाचा मृत्यू

ओडिशातील पुरी येथे जगन्नाथ रथयात्रेदरम्यान मोठ्या गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. श्वास कोंडल्याने एका भाविकाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू असून प्रशासनाने घटनेचा तपास सुरू केला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 16, 2026 | 06:49 PM
मोठी बातमी! पुरी जगन्नाथ रथयात्रेत चेंगराचेंगरी; 200 भाविक जखमी, श्वास कोंडल्याने एका भाविकाचा मृत्यू

मोठी बातमी! पुरी जगन्नाथ रथयात्रेत चेंगराचेंगरी; 200 भाविक जखमी, श्वास कोंडल्याने एका भाविकाचा मृत्यू

Follow Us
Follow Us:
  • पुरीत जगन्नाथ रथयात्रेत चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती
  • श्वास कोंडल्याने एका भाविकाचा मृत्यू
  • 200 भाविक जखमी
Puri Rath Yatra 2026 News Marathi : ओडिशातील पुरी येथे सुरू असलेल्या भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेदरम्यान गुरुवारी (16 जुलै 2026) मोठी दुर्घटना घडली. यात्रेत प्रचंड गर्दी झाल्याने चेंगराचेंगरीची घटना घडली असून, त्यामध्ये सुमारे 200 भाविक जखमी झाले आहेत. तसेच एका भाविकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रथयात्रा पाहण्यासाठी लाखो भाविक पुरीत दाखल झाले होते. ग्रँड रोडवर असलेल्या मार्केट चौक आणि मिरची कोर्ट चौकादरम्यान या यात्रेसाठी भाविक मोठ्या संख्येनं जमले होते. याच दरम्यान ही घटना घडली आहे. गर्दी अचानक वाढल्याने काही ठिकाणी भाविकांचा तोल गेला आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. याच दरम्यान चेंगराचेंगरी झाली. अनेक जण खाली पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली.

Jagannath Rath Yatra 2025: जगन्नाथ रथ यात्रा कधी होणार सुरु? जाणून …

या घटनेची माहिती मिळताच पोलीस, आपत्कालीन बचाव पथके आणि वैद्यकीय कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमींना जवळच्या विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहितीही समोर येत आहे. या घटनेनंतर प्रशासनाने घटनास्थळी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला असून गर्दीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दुर्घटनेची नेमकी कारणे आणि सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटींचा तपासही सुरू करण्यात आला आहे.

VIDEO | Puri: Several devotees faint during Jagannath Rath Yatra. (Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/nejFj72WE7 — Press Trust of India (@PTI_News) July 16, 2026

दरवर्षी भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेसाठी देश-विदेशातून लाखो भाविक पुरीत येतात. त्यामुळे गर्दीचे व्यवस्थापन आणि सुरक्षेची जबाबदारी प्रशासनासाठी मोठे आव्हान असते. यंदाच्या दुर्घटनेमुळे रथयात्रेतील गर्दी नियंत्रणाच्या व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Jagannath Rath Yatra: हातात पाकिस्तानी झेंडा आणि मुखात हरिनाम …

गर्दीमुळे अनेक लोकांना श्वास घेण्यास त्रास

पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, लाखो भाविकांच्या गर्दीमुळे श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि त्यानंतर अनेकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयाच्या सूत्रांनुसार, बहुतेक रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

भाविकांच्या देखभालीसाठी अतिरिक्त आरोग्य कर्मचारी तैनात
एका अधिकाऱ्याने सांगितले, “आजारी भाविकांच्या देखभालीसाठी अतिरिक्त आरोग्य कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.” मुसळधार पाऊस असूनही, रथयात्रा पाहण्यासाठी ओडिशा आणि इतर ठिकाणांहून ५ लाखांहून अधिक भाविक पुरीमध्ये जमले होते.

यात्रेकरूंच्या प्रचंड गर्दीत, आपत्कालीन बचाव पथकांनी अनेक लोकांना स्ट्रेचरवर उचलून सुरक्षित ठिकाणी नेले. पवित्र रथांभोवती लोकांची प्रचंड गर्दी जमली असताना, सुरक्षा कर्मचारी आणि आपत्कालीन बचाव पथकांनी बाधित लोकांना तात्काळ प्रतिसाद देत त्यांना वैद्यकीय मदत पुरवली.

Web Title: Puri rath yatra 2026 stampede during lord jagannaths rath yatra 200 injured one dead

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 06:36 PM

Topics:  

  • Odisha

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.