
पुतिन यांचे दिल्लीत आगमन! पंतप्रधान मोदींनी गळाभेट घेऊन केले भव्य स्वागत (Photo Credit- X)
#WATCH | Russian President Vladimir Putin lands in Delhi; Prime Minister Narendra Modi receives him at the airport President Putin is on a two-day State visit to India. He will hold the 23rd India-Russia Annual Summit with PM Narendra Modi in Delhi on December 5 (Source: DD) pic.twitter.com/wFcL9of7Eg — ANI (@ANI) December 4, 2025
पंतप्रधान मोदींनी केली गळाभेट
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या स्वागतासाठी पालम विमानतळावर रेड कार्पेट अंथरण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः पुतिन यांच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित होते. व्लादिमीर पुतिन विमानातून बाहेर येताच पंतप्रधान मोदींनी गळाभेट घेऊन त्यांचे भव्य स्वागत केले. रात्री पंतप्रधान मोदी पुतिन यांच्यासाठी डिनर (रात्रीचे भोजन) आयोजित करणार आहेत.
‘या’ महत्त्वाच्या करारांवर होणार चर्चा
४ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर पुतिन भारत दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांच्यात उद्या (शुक्रवार) द्विपक्षीय चर्चा होईल आणि संयुक्त निवेदन जारी केले जाईल. या बैठकीत अनेक मोठ्या संरक्षण करारांवर (Defense Deals) चर्चा होण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या ऍडव्हान्स व्हर्जन (Advanced Version) वर महत्त्वपूर्ण करार होऊ शकतो. हे नवीन व्हर्जन पूर्वीपेक्षा अधिक घातक असेल.
लढाऊ विमाने आणि संरक्षण प्रणाली
SU-57 लढाऊ विमान, तसेच S-400 आणि S-500 एअर डिफेन्स सिस्टीमवरही करार होण्याची शक्यता आहे. दोन्ही नेत्यांमध्ये रशियाकडून तेल खरेदी करण्याच्या मुद्द्यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.