Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raghav Chadha आणि AAP मध्ये बिनसलं? पक्षनेतृत्वाला धरले धारेवर; म्हणाले, “माझी शांतता म्हणजे हार नाही..”

AAP Removes Raghav Chadha as Rajya Sabha Deputy Leader : आप पक्षाने राघव चढ्डा यांच्याकडून पद काढून घेतल्यानंतर त्यांनी सोशल मीडिया पोस्ट केली आहे. आणि पक्ष नेतृत्वाला प्रश्न विचारले आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 03, 2026 | 11:39 AM
Raghav Chadha video social media post on AAP Removes as Rajya Sabha Deputy Leader

Raghav Chadha video social media post on AAP Removes as Rajya Sabha Deputy Leader

Follow Us
Follow Us:
  • राघव चड्ढांची राज्यसभेतून पद काढल्याने नाराजी
  • राघव चड्ढांनी सोशल मीडिया पोस्टमधून साधला निशाणा
  • आम आदमी पक्षाच्या नेतृत्वावर व्यक्त केली नाराजी
Raghav Chadha Reply : नवी दिल्ली : राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांना त्यांच्याच पक्षाने मोठा धक्का दिला. आम आदमी पार्टीने (आप) त्यांना राज्यसभेतील उपनेतेपदावरून हटवले आहे. इतकेच नाही, तर राज्यसभेतील त्यांचे बोलण्याचे अधिकारही कमी करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले. आप पक्षाने (AAP) राघव चड्ढा हे जनतेसाठी आवाज उठवत असताना त्यांच्यावर केलेली ही कारवाई जोरदार चर्चेत आली आहे. दरम्यान, यावर खासदार राघव चड्ढांनी (Raghav Chadha) यांनी पहिली प्रतिक्रिया देत पक्षनेतृत्वावर निशाणा साधला आहे.

आम आदमी पार्टीने आता राघव चड्ढा यांच्या जागी नवीन उपनेत्याची नियुक्ती केली आहे. आम आदमी पार्टीचे खासदार अशोक मित्तल आता राज्यसभेत उपनेते असतील. असं आप’ने सचिवालयाला कळवले आहे. यावरुन आप पक्षावर सोशल मीडियावर जोरदार टीका केली जात आहे. दरम्यान, यावर खासदार राघव चड्ढांनी यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन प्रतिक्रिया दिली आहे. तसेच यामधून त्यांच्यामधील आणि पक्षातील मतभेद देखील समोर आले आहेत.

हे देखील वाचा : Raghav Chadha यांची जागा घेणारे कोण आहेत अशोक कुमार मित्तल? कोट्यवधींची संपत्ती अन् शैक्षणिक पार्श्वभूमी

खासदार राघव चड्ढांनी आपल्या व्हिडिओतून नाराजी व्यक्त केली आहे. ते पक्षाला जनतेचच्या हिताचे प्रश्न मांडण्याची इतकी चिंता का वाटत आहे की ते त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत, असा सवालही त्यांनी केला. काव्यात्मक शैलीत आम आदमी पक्षावर जोरदार हल्ला चढवत ते म्हणाले, “माझ्या मौनाला पराभव समजू नका. मी एक नदी आहे, जी वेळ आल्यावर पुराचे रूप धारण करते.” असा धमकीवजा इशारा देखील राघव चड्ढांनी आम आदमी पक्षाला दिला आहे.

 

Silenced, not defeated My message to the ‘aam aadmi’
—
खामोश करवाया गया हूँ, हारा नहीं हूँ
‘आम आदमी’ को मेरे संदेश pic.twitter.com/poUwxsu0S3 — Raghav Chadha (@raghav_chadha) April 3, 2026

हे देखील वाचा : आसामच्या निवडणुकीमध्ये AIMIM ची एन्ट्री; असदुद्दीन ओवैसीनी साधला काँग्रेस अन् भाजपवर निशाणा

पुढे ते म्हणाले की, “मी जेव्हा पण बोलतो तेव्हा तर मी देशातील नागरिकांसाठी बोलतो. एअरपोर्टवर मिळणाऱ्या महाग खाण्याच्या गोष्टींचा मुद्दा मांडला. डिलिव्हरी बॉयच्या प्रश्नांसाठी आवाज उठवला, खाण्यातील भेसळीचा मुद्दा उपस्थित केला. टोलवसुली ते बँकेच्या लुटीचा मुद्दा मांडला. सामान्य लोकांना बसणारा टॅक्सचा फटका ते कंटेट क्रिएअरवरील बंदी, टेलिकॉम कंपनी 12 महिन्यात 13 वेळा रिचार्ज करुन घेते असे अनेक मुद्दे मी उपस्थित केले. मी हे मुद्दे संसदेमध्ये उपस्थित केल्यामुळे देशातील सामान्य लोकांचा तर फायदा झाला. पण यामुळे आम आदमी पक्षाचे काय नुकसान झाले? मला बोलण्यापासून रोखण्यासाठी काय कारण असेल? माझा आवाज का बंद केला जातोय?” असे राघव चड्ढा स्पष्टपणे म्हणाले असून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

राघव चड्ढांनी जनतेला आवाहन करत म्हणाले की, “तुम्ही मला नेहमीच प्रेम आणि पाठिंबा देत आले आहात. मी जेव्हा जेव्हा तुमच्यासाठी आवाज संसदेमध्ये उठवतो तेव्हा तेव्हा तुम्ही माझे कौतुक करता आणि मला शाबासकी देता. माझे मनोबल वाढवता. मी तुम्हा सर्वांचे धन्यवाद मानू इच्छितो. माझी अशीच नेहमी साथ द्या आणि माझा हात कधी सोडू नका. मी तुमच्यातील एक आहे आणि तुमच्यासाठी आहे. आणि ज्या लोकांनी माझा संसदेतील आवाज दाबला आणि मला शांत केले त्यांना सुद्धा एक सांगतो की माझ्या शांततेला माझा पराभव समजू नका…मी तो प्रवाह जो योग्य वेळी एक स्तुनामी बनतो..,” अशा शब्दांत खासदार राघव चड्ढांनी आम आदमी पक्षाच्या नेतृत्वावर निशाणा साधला.

Web Title: Raghav chadha video social media post on aap removes as rajya sabha deputy leader

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 11:39 AM

Topics:  

  • AAP
  • AAP Arvind Kejriwal
  • political news
  • Raghav Chadha

संबंधित बातम्या

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान
1

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट
2

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
3

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
4

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.