काँग्रेस खासदार राहुल गांधी(Rahul Gandhi) भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान आसाममध्ये पोहोचले आणि त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. आसाम सरकार आणि राज्याचे मुख्यमंत्री हे भारतातील सर्वात भ्रष्ट असल्याचे राहुल गांधी म्हणाले. शिवसागर जिल्ह्यातील हॅलोटिंग येथे जाहीर सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ द्वेषाची विचारसरणी पसरवत आहेत आणि जनतेच्या पैशाची लूट केली जात आहे.
[read_also content=”22 जानेवारीला केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार ‘हाफ डे’; दुपारी अडीचपर्यंत सुट्टी, सरकारचा निर्णय! https://www.navarashtra.com/india/central-government-announced-half-day-holiday-to-central-government-on-22-january-nrps-499412.html”]
येथे काय चालले आहे हे तुम्हाला माहीत नाही, असे राहुल गांधी प्रचारसभेत म्हणाले. हे भारतातील सर्वात भ्रष्ट राज्य सरकार असून आम्ही आमच्या दौऱ्यात आसामचा मुद्दा उपस्थित करणार आहोत. तत्पूर्वी, काँग्रेस खासदाराने जोरहाट जिल्ह्यातील नाकचारी देबरपार येथे पथसंचलन करून येथील आदिवासींवर अन्याय होत असल्याचे सांगितले. भाजप सरकार येथील चहा कामगारांवर अन्याय करत आहे. आसाममध्ये भ्रष्टाचार शिगेला पोहोचला असून येथील मुख्यमंत्री सर्वाधिक भ्रष्ट आहेत.