Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Gandhi : राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मोदींवरील वक्तव्याच्या मानहानी खटल्याची कार्यवाही सुरूच राहणार

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी दाखल मानहानीच्या खटल्यात राहुल गांधींना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. समन्स रद्द करण्याची त्यांची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे.

  • By विवेक
Updated On: Sep 08, 2026 | 09:00 PM
rahul gandhi

rahul gandhi

Follow Us
Follow Us:
  • मुंबई हायकोर्टाने राहुल गांधींची समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली.
  • 2018 मधील राफेल व्यवहारावरील वक्तव्यावरून मानहानीचा खटला दाखल.
  • राहुल गांधींना सहा आठवड्यांची अंतरिम मुदत; सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची संधी.
 

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या खटल्यात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने बजावलेले समन्स रद्द करण्याची राहुल गांधी यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

न्यायमूर्ती एन. आर. बोरकर यांच्या एकलपीठाने कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशात स्पष्ट बेकायदेशीरता किंवा गंभीर त्रुटी आढळत नसल्याचे नमूद केले. त्यामुळे गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयात सुरू असलेली मानहानीची कार्यवाही पुढे सुरू राहणार आहे.

2018 मधील वक्तव्यावरून वाद

या प्रकरणाचा संबंध 2018 मध्ये राजस्थानमध्ये झालेल्या एका सभेतील राहुल गांधी यांच्या वक्तव्याशी आहे. राफेल लढाऊ विमानांच्या व्यवहारावरून तत्कालीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना राहुल गांधी यांनी ‘कमांडर-इन-थीफ’ आणि ‘चोरों के सरदार’ अशा शब्दांचा वापर केल्याचा आरोप आहे.

PM Narendra Modi: उत्तर भारत थेट JNPA बंदराशी जोडणार; २०,७०० कोटींच्या WDFCच्या ३ टप्प्यांचे आज मोदींच्या हस्ते लोकार्पण

या वक्तव्याविरोधात भाजपचे कार्यकर्ते महेश श्रीश्रीमल यांनी गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयात मानहानीची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ऑगस्ट 2019 मध्ये न्यायालयाने राहुल गांधींना समन्स बजावले.

राहुल गांधी यांनी हे समन्स आणि त्याआधारे सुरू असलेली फौजदारी कार्यवाही रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तक्रार राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा युक्तिवाद त्यांच्या वकिलांकडून करण्यात आला.

हायकोर्टाने याचिका का फेटाळली?

उच्च न्यायालयाने राहुल गांधींचा युक्तिवाद स्वीकारला नाही. कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यासाठी आवश्यक अशी स्पष्ट बेकायदेशीरता किंवा गंभीर त्रुटी दिसत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

Chief Justic Of India: भारताला मिळणार पहिल्या महिला सरन्यायाधीश; नोटाबंदीच्या निर्णयाशी आहे संबंध?

तसेच कथित वक्तव्यांचा परिणाम केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुरता मर्यादित होता की भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही त्याच्या कक्षेत येतात, हा मुद्दा पुरावे आणि खटल्याच्या सुनावणीदरम्यान निश्चित केला जाऊ शकतो, असे न्यायालयाने नमूद केले.

दरम्यान, राहुल गांधींना सहा आठवड्यांची अंतरिम मुदत देण्यात आली आहे. या काळात त्यांना दंडाधिकारी न्यायालयात वैयक्तिकरित्या हजर राहण्यापासून संरक्षण मिळणार आहे. तसेच या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा मार्गही त्यांच्यासाठी खुला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या विरोधातील मानहानी प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया पुढे सुरू राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: Rahul gandhi defamation case mumbai high court pm modi statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 09:00 PM

Topics:  

  • PM Narendra Modi
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

PM Modi Security Breach : मोदींच्या कार्यक्रमात मोठी खळबळ; बनावट PMO ID, बंदुकधारी बॉडीगार्डसह दोघे ताब्यात
1

PM Modi Security Breach : मोदींच्या कार्यक्रमात मोठी खळबळ; बनावट PMO ID, बंदुकधारी बॉडीगार्डसह दोघे ताब्यात

जातनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा पॅटर्नचा वापर करा, जनगणनेत OBC प्रवर्गाचा…; काँग्रेसच्या नेत्याची मागणी
2

जातनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा पॅटर्नचा वापर करा, जनगणनेत OBC प्रवर्गाचा…; काँग्रेसच्या नेत्याची मागणी

Rahul Gandhi News: विद्यार्थी भाजपवर नाराज; महाराष्ट्रातील परीक्षा आंदोलनावर राहुल गांधींचा इशारा
3

Rahul Gandhi News: विद्यार्थी भाजपवर नाराज; महाराष्ट्रातील परीक्षा आंदोलनावर राहुल गांधींचा इशारा

PM Modi: पॅरिसमधील पहिल्या भव्य हिंदू मंदिराचे PM मोदींच्या हस्ते उद्घाटन; पतंप्रधान म्हटले, ‘हे वसुधैव कुटुंबकमचे प्रतीक’,VIDEO
4

PM Modi: पॅरिसमधील पहिल्या भव्य हिंदू मंदिराचे PM मोदींच्या हस्ते उद्घाटन; पतंप्रधान म्हटले, ‘हे वसुधैव कुटुंबकमचे प्रतीक’,VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.