Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जातनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा पॅटर्नचा वापर करा, जनगणनेत OBC प्रवर्गाचा…; काँग्रेसच्या नेत्याची मागणी

उशिरा का असेना पण मोदी सरकारने जातनिहाय जनगणनेची घोषणा केली आहे, पण यात काही त्रुटी आहेत.  या जनगणनेत OBC प्रवर्गाचा कॉलम असावा आणि जातनिहाय जनगणना ही तेलंगणा पॅटर्ननुसार करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 08, 2026 | 04:49 PM
जातनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा पॅटर्नचा वापर करा, जनगणनेत OBC प्रवर्गाचा...; काँग्रेसच्या नेत्याची मागणी

जातनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा पॅटर्नचा वापर करा, जनगणनेत OBC प्रवर्गाचा...; काँग्रेसच्या नेत्याची मागणी

Follow Us
Follow Us:
  • जातनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा पॅटर्नचा वापर करा
  • जनगणनेत OBC प्रवर्गाचा कॉलम असावा
  • काँग्रेसच्या नेत्याची मागणी
मुंबई : जातनिहाय जनगणना ही सर्व जातींच्या हितासाठी आहे. जातींचा डेटा स्पष्ट झाला तरच प्रत्येक वर्गाला न्याय देता येईल, त्यासाठीच काँग्रेस पक्षाने जातनिहाय जनगणनेची आग्रही मागणी केली होती. उशिरा का असेना पण मोदी सरकारने जातनिहाय जनगणनेची घोषणा केली आहे, पण यात काही त्रुटी आहेत. जनगणनेच्या अर्जात SC/ST साठी स्वतंत्र उल्लेख आहे परंतु  OBC प्रवर्गासाठी वेगळ्या रकान्याची तरतूद केलेली नाही. या जनगणनेत OBC प्रवर्गाचा कॉलम असावा आणि जातनिहाय जनगणना ही तेलंगणा पॅटर्ननुसार करावी, अशी मागणी काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य व मध्य प्रदेशचे प्रभारी आमदार हरिष चौधरी यांनी केली आहे.

 

टिळक भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व मध्य प्रदेश प्रभारी हरिष चौधरी यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत बोलताना आमदार हरिष चौधरी म्हणाले की, २०२१ सालीच जनगणना व्हायला हवी होती पण कोविडचे कारण देऊन ती टाळली पण लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी मागणी लावून धरल्यामुळे  शेवटी २०२६ साली जनगणना केली जात आहे. “जिसकी जितनी आबादी, उसकी उतनी हिस्सेदारी” ही काँग्रेस पक्षाची भूमिका असून देशातील योजनांचा लाभ प्रत्येक समाज घटकाला लोकसंख्येच्या प्रमाणात मिळाला पाहिजे, यासाठीच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हा नारा दिला होता. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा अर्बन नक्षलचा विचार आहे, असे म्हणत त्याकडे दुर्लक्ष केले होते. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना जातनिहाय जनगणना करण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला पण त्यालाही त्यांनी उत्तर दिले नाही. पण काँग्रेसने सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे मोदी सरकारला २०२५ मध्ये जातनिहाय जनगणनेसाठी अधिसूचना जारी करावी लागली.

जातनिहाय जनगणनेची घोषणा केली तरीही, मोदी सरकार जातनिहाय जनगणनेच्या मूळ उद्देशापासून दूर आहे. मोदी सरकारला मुळात जातनिहाय जनगणनेतून मिळणारी अचूक आकडेवारी देशासमोर आणायचीच नाही. देशाच्या हितासाठी, समाजातील विविध घटकांचे प्रतिनिधित्व किती आहे हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. अशा आकडेवारीच्या आधारेच सरकार विविध योजना आखू शकेल. जातीविषयक अचूक माहिती उपलब्ध झाल्यावरच त्यांना त्यांचा हक्काचा वाटा मिळेल आणि सामाजिक न्यायाचे उद्दिष्ट साध्य होईल. योग्य जातनिहाय जनगणनेद्वारे यात सुधारणा न केल्यास, वंचित घटकांनाच सर्वाधिक फटका बसेल.

हे सुद्धा वाचा : जुन्नर तालुक्यातील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; ६३३ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

बिहारमधील तत्कालीन नितीशकुमार सरकारने तसेच तेलंगणातील काँग्रेस सरकारने याआधीच जातनिहाय जनगणना करून देशसमोर एक आदर्श घालून दिलेला आहे. जात निहाय जनगणना झाली तरच सर्व समाज घटाकाला न्याय देता येईल. डोंगराळ प्रदेशात सध्या जनगणना सुरु असून उर्वरित देशात फेब्रुवारीपासून ती सुरु असल्याने सरकारकडे अजून वेळ आहे, त्यांनी ओबीसी प्रवर्गाचा कॉलम करूनच जनगणना करावी असेही हरिष चौधरी म्हणाले.

हे सुद्धा वाचा : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच, नियमांचे उल्लंघन करणारे डीजे जप्त करणार; बारामती तालुका पोलिसांचा इशारा

Web Title: The congress has demanded the adoption of the telangana pattern for a caste based census

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 04:49 PM

Topics:  

  • Congress
  • MP Rahul Gandhi
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

PM Modi Security Breach : मोदींच्या कार्यक्रमात मोठी खळबळ; बनावट PMO ID, बंदुकधारी बॉडीगार्डसह दोघे ताब्यात
1

PM Modi Security Breach : मोदींच्या कार्यक्रमात मोठी खळबळ; बनावट PMO ID, बंदुकधारी बॉडीगार्डसह दोघे ताब्यात

MPSC अध्यक्ष-सचिवांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात हजारो विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा; विश्वजीत कदमांसह काँग्रेस नेते सहभागी
2

MPSC अध्यक्ष-सचिवांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात हजारो विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा; विश्वजीत कदमांसह काँग्रेस नेते सहभागी

Pune MPSC Student Protest : MPSC पेपरफुटीवर काँग्रेस आक्रमक; मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
3

Pune MPSC Student Protest : MPSC पेपरफुटीवर काँग्रेस आक्रमक; मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

‘फॅसिस्ट विचार देशासाठी घातक, संविधान वाचवण्यासाठी पुढे या,’ हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन; भाजपा-आरएसएसच्या विचारसरणीवर सडकून टीका
4

‘फॅसिस्ट विचार देशासाठी घातक, संविधान वाचवण्यासाठी पुढे या,’ हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन; भाजपा-आरएसएसच्या विचारसरणीवर सडकून टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.