
Rahul Gandhi, Maharashtra Student Protest, MPSC Protest,
राहुल गांधी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे महाराष्ट्रातील विद्यार्थी आंदोलनावर भाष्य करत, केंद्र असो किंवा राज्य, भाजप सरकारच्या कारभारामुळे विद्यार्थी त्रस्त असल्याचा आरोप त्यांनी केला.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगासारख्या घटनात्मक संस्थेवर कब्जा करून तिची विश्वासार्हता उद्धवस्त करण्यात आल्याचा गंभीर आरोपही राहुल गांधी यांनी केला. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रत्येक मागणी योग्य असून सरकारने त्यांचा आवाज ऐकून तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. विद्यार्थ्यांना त्यांच्या यशस्वी भविष्यासाठी न्याय मिळणे आवश्यक आहे. सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष दिले नाही, तर न्याय मिळेपर्यंत वाढत त्यांच्या आंदोलनाची गूंज अधिकाधिक राहील, असा इशाराही राहुल गांधी यांनी दिला.
पेपरफुटी आणि परीक्षामधील गैरप्रकार
रखडलेल्या भरती प्रक्रिया
शिक्षणाचा वाढता खर्च
वसतिगृहांमधील अमानवीय परिस्थिती
निकृष्ट अन्नाबाबतच्या तकारी
एमपीएससीच्या विश्वासार्हतेचर प्रश्नचिन्ह
Manoj Jarange Patil: ‘…तर १० मिनिटांत महाराष्ट्र बंद पडला पाहिजे’; जरांगे पाटलांचा इशारा
राहुल गांधींनी ‘X’ या सोशल मीडिया राज्य सरकारवर सडकून टिका केली आहे. ” महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरून शांततापूर्ण आंदोलन करत आहेत. याचे कारण केवळ एक परीक्षा किंवा भरती मोहीम नसून, संपूर्ण व्यवस्थेवरील तुटलेला विश्वास आहे.
केंद्र सरकार असो वा राज्य सरकार, प्रत्येक विद्यार्थी भाजप सरकारला वैतागला आहे. पेपरफुटी, रखडलेली भरती, शिक्षणाचा असह्य खर्च, वसतिगृहातील अमानवीय परिस्थिती, विषारी अन्न, फसवी डीबीटी (DBT) योजना… आणि आता, एमपीएससी (MPSC) सारख्या घटनात्मक संस्थेचा ताबा घेऊन त्यांनी तिची विश्वासार्हता नष्ट केली आहे.
विद्यार्थ्यांची त्यांच्या भविष्यासाठीची प्रत्येक मागणी रास्त आहे. सरकारने त्यांचा आवाज ऐकून तातडीने कारवाई केली पाहिजे – अन्यथा, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत या विद्यार्थ्यांचा आवाज वाढतच जाईल.” असा इशाराही राहुल गांधी यांनी दिला आहे.
आपल्या हक्कांसाठी ४ सप्टेंबर रोजी मोठ्या संख्येने तरुण रस्त्यावर उतरले. पाऊस असूनही विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन सुरूच ठेवले. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ‘आक्रोश मोर्चा’ काढण्यत आल. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला एक निवेदन सादर करण्यात आले. विद्यार्थी आणि तरुणांच्या जोरदार घोषणांनी संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दुमदुमला होता.
दरम्यान, महाराष्ट्रातील सरकारी अनुदानित आश्रम शाळांची दयनीय अवस्था, सुरक्षा व्यवस्था आणि विद्यार्थ्यांच्या मृत्यूविरोधात नाशिकमधील आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच आहे. नाशिकमधील ईदगाह मैदानावर १०० हून अधिक आदिवासी विद्यार्थी आंदोलन करत आहेत. आश्रम शाळांची अवस्था, विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि मृत्यूंसंदर्भात सरकारकडून उत्तरे आणि कारवाईची मागणी आंदोलक करत आहेत.