Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rajghat Protest Day 3 Delhi News: मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात विरोधकांचे रान पेटले! राहुल गांधीसह विरोधी पक्षनेते आज राजघाटवर

Rajghat Protest Day 3 Delhi News: राजघाटावर अनेक काँग्रेस कार्यकर्ते आधीच घोषणाबाजी करत आहेत. मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी येथे भारतीय नागरी सुरक्षा संहितेचे (बीएनएसएस) कलम १६३ लागू केले आहे

  • By anuradha sagar
Updated On: Oct 08, 2026 | 04:31 PM
Rahul Gandhi, INDIA Alliance, Rajghat, Mallikarjun Kharge, Delhi Police,

Rahul Gandhi, INDIA Alliance, Rajghat, Mallikarjun Kharge, Delhi Police,

Follow Us
Follow Us:
  • ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांचे दिल्लीत सलग तिसऱ्या दिवशी आंदोलन
  • राहुल गांधी, प्रियांका गांधी व मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वात विरोधकांचा राजघाटाकडे मोर्चा
  • राजघाट परिसरात दिल्ली पोलिसांकडून भारतीय नागरी सुरक्षा संहितेचे (BNSS) कलम १६३ लागू
Rajghat Protest Day 3 Delhi News: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि एसआयआर प्रक्रियेतील गैरव्यवहारांच्या विरोधात काँग्रेससही देशभरातील विरोधी पक्षाच्या नेत्यांचे आंदोलन सुरू आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात आज सलग तिसऱ्या दिवशी हे आंदोलन सुरु आहे. राहुल गांधी यांनी जंतरमंतरवर आंदोलन करण्याची घोषणा केल्यानंतर त्यांना तिथे जाण्यापासून अडवण्यात आले. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये जोरदार झटापट झाल्याचेही पाहायला मिळाले. त्यानंतर आज (8 ऑक्टोबर) तिसऱ्या दिवशी राहुल गांधी यांनी थेट राजघाटवर जाण्याची घोषणा केली.

दिल्लीतील कनॉट प्लेस येथील मोआट्स रेस्टॉरंटमध्ये दुपारच्या जेवणानंतर राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियांका गांधी अनेक विरोधी खासदारांसह राजघाटाकडे रवाना झाले. याप्रसंगी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, आम्ही राजघाटावर जात आहोत, जिथे आम्ही सरकारला सुबुद्धी मिळावी म्हणून बापूंची प्रार्थना करू. राहुल म्हणाले की, आम्हाला आंदोलन करण्यापासून रोखले जात आहे.

Share Market: शेअर बाजारात चहूबाजूने हाहाःकार! तेलापासून RBI पर्यंत 5 मोठे आघात

राजघाट परिसरात जमावबंदीचा कायदा लागू

राजघाटावर अनेक काँग्रेस कार्यकर्ते आधीच घोषणाबाजी करत आहेत. मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी येथे भारतीय नागरी सुरक्षा संहितेचे (बीएनएसएस) कलम १६३ लागू केले आहे, जे ५ पेक्षा जास्त लोकांच्या एकत्र येण्यावर बंदी घालते. मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, इंडिया आघाडीचे नेते महात्मा गांधीच्या स्मारकावर जाऊन शांततापूर्ण आंदोलन करतील. भाजप सरकार, विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना त्यांचे निर्णय राष्ट्रीय हिताचे नाहीत हे समजावे, यासाठी तेथे प्रार्थना केली जाईल.

राहुल गांधींकडून ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरेंना दिल्लीत पोहचण्याचे आमंत्रण

दरम्यान, राहुल गांधी यांनी पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव यांना दिल्लीत बोलावले आहे. ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला बळ देण्यासाठी अखिल भारतीय आघाडीच्या सर्व प्रमुख सदस्यांना सामील करून एक रणनीती तयार केली जाणार असल्याची माहिती आहे.

दुसरीकडे आंदोलनाच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या कार्यालयाजवळ हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. संपूर्ण परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर दंगल नियंत्रण वाहने आणि रॅपिड ॲक्शन फोर्स (RAF) चे जवान तैनात करण्यात आले आहेत.

Asian Games 2026: इंडियन आर्मीचा नाद करायचा नाही! पुण्यातील खेळाडूंनी जिंकली तब्बल

विरोधी पक्षांचा ताफा राजघाटकडे रवाना

राहुल गांधी एका बसमध्ये दिसत आहेत, त्यांच्यामागे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आहेत. हा ताफा दीनदयाळ उपाध्याय मार्ग आणि भाजप कार्यालयामार्गे राजघाटच्या दिशेने रवाना झाला आहे. के.सी. वेणुगोपाल, पवन खेरा, प्रणव झा, प्रणती शिंदे आणि श्रीनिवास यांच्यासह अनेक नेते आणि खासदार बसमध्ये उपस्थित आहेत. इंडिया आघाडीचे अनेक खासदारही या ताफ्यात असल्याची माहिती आहे.

काँग्रेसचा ताफा आता राजघाटाच्या दिशेने निघाला आहे. या ठिकाणी युवक काँग्रेसचे मोठ्या संख्येने कार्यकर्तेही उपस्थित आहेत. आज राजघाटाच्या दिशेने मोर्चा काढला जाणार असल्याने संपूर्ण देशाचे या मोर्चाकडे लक्ष लागले आहे. आजही पोलिस राहु गांधींना अडवणार की राजघाटकडे जाऊ देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

 

Web Title: Rahul gandhi leads india bloc march to rajghat on day 3 of protest as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 04:31 PM

Topics:  

  • Chief Election Commissioner
  • INDIA Alliance
  • National Politics
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Ravindra Chavan : राहुल गांधींवर रविंद्र चव्हाण संतापले! 2014 पूर्वीचा आणि नंतरचा भारत दाखवत दिलं प्रत्युत्तर
1

Ravindra Chavan : राहुल गांधींवर रविंद्र चव्हाण संतापले! 2014 पूर्वीचा आणि नंतरचा भारत दाखवत दिलं प्रत्युत्तर

Rahul Gandhi Chicago Speech: “मोदी सरकारमधील काही मंत्री आमच्या संपर्कात…; राहुल गांधींच्या दाव्याने खळबळ
2

Rahul Gandhi Chicago Speech: “मोदी सरकारमधील काही मंत्री आमच्या संपर्कात…; राहुल गांधींच्या दाव्याने खळबळ

Rahul Gandhi Girlfriend News: केंब्रिजमध्ये भेटलेली प्रेयसी..! राहुल गांधीनी पहिल्यांदाच केला गर्लफ्रेंडचा उल्लेख
3

Rahul Gandhi Girlfriend News: केंब्रिजमध्ये भेटलेली प्रेयसी..! राहुल गांधीनी पहिल्यांदाच केला गर्लफ्रेंडचा उल्लेख

BJP Politics राष्ट्रवादीच्या विलीनीकरणामागे काय आहे भाजपचे संसदीय गणित !
4

BJP Politics राष्ट्रवादीच्या विलीनीकरणामागे काय आहे भाजपचे संसदीय गणित !

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.