Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवली’, पीडित तरुणाला समोर आणत राहुल गांधींचा संसदेतून गंभीर आरोप

Rahul Gandhi Pellet Gun Claim: राहुल गांधी यांनी दावा केला की, जंतरमंतर येथे तिरंगा हातात घेऊन शांततापूर्ण निदर्शने करणाऱ्या या विद्यार्थ्यावर 'पॅलेट गन'चा वापर करण्यात आला, ज्यामुळे त्याची एका डोळ्याची दृष्टी पूर्णपणे गेली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 24, 2026 | 04:22 PM
पीडित तरुणाला समोर आणत राहुल गांधींचा संसदेतून गंभीर आरोप (Photo Credit- X)

पीडित तरुणाला समोर आणत राहुल गांधींचा संसदेतून गंभीर आरोप (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • ‘शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवली’
  • पीडित तरुणाला समोर आणत राहुल गांधींचा संसदेतून गंभीर आरोप
  • वाचा काय म्हणाले राहुल गांधी?
नवी दिल्ली: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी संसद परिसरातील एका पत्रकार परिषदेत एका पीडित तरुणाला प्रसारमाध्यमांसमोर सादर केले. राहुल गांधी यांनी दावा केला की, जंतरमंतर येथे तिरंगा हातात घेऊन शांततापूर्ण निदर्शने करणाऱ्या या विद्यार्थ्यावर ‘पॅलेट गन’चा वापर करण्यात आला, ज्यामुळे त्याची एका डोळ्याची दृष्टी पूर्णपणे गेली. आंदोलकांवर पेलेट गनचा वापर केल्याचा इन्कार करणाऱ्या सरकारच्या दाव्यांना फेटाळून लावताना राहुल गांधी म्हणाले की, यूपी पोलीस भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्यानंतर न्यायासाठी रस्त्यावर उतरलेल्या हजारो तरुणांवर लाठीचार्ज आणि पेलेट गनचा वापर करण्यात आला होता.

केंद्र सरकारवर जोरदार टीका

नीट (NEET) परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर सुरक्षा दलांनी पॅलेट गनचा वापर केल्याच्या वृत्तानंतर राजकीय तणाव वाढला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अति-बळाचा वापर केल्याचा आरोप त्यांनी केला. राहुल गांधी यांनी १९ वर्षीय विद्यार्थ्याला झालेल्या गंभीर दुखापती प्रसारमाध्यमांना दाखवल्या आणि दावा केला की, पेलेट गनच्या वापरामुळे काही विद्यार्थ्यांची दृष्टीही गेली आहे.

#WATCH | LoP, Lok Sabha, Rahul Gandhi brings before the media a man he claims suffered pellet gun injuries during students’ protest He says, “I want to explain that my brother standing here was injured by a pellet gun while he was peacefully protesting, holding the Tricolour.… pic.twitter.com/TCQJ4OZJcu — ANI (@ANI) July 24, 2026

मोठी बातमी! सीजेपीच्या 3 पैकी 2 मागण्या मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर सरकारने मागितला वेळ? CJPचा मोठा दावा

विद्यार्थ्यांच्या वतीने राहुल गांधींच्या तीन प्रमुख मागण्या

आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या मांडताना राहुल गांधी यांनी सरकारसमोर तीन प्रमुख मागण्या ठेवल्या. त्यांनी विद्यार्थ्यांवरील बळाच्या वापराची चौकशी, जखमींना त्वरित व योग्य वैद्यकीय उपचार आणि नुकसानभरपाई, तसेच नीट परीक्षेतील कथित अनियमिततेबाबत ठोस कारवाई करण्याची मागणी केली. प्राप्त माहितीनुसार, सफदरजंग रुग्णालयाच्या अहवालातूनही नीट आंदोलनादरम्यान पेलेट गनमुळे दुखापत झाल्याच्या गोष्टीला दुजोरा मिळाला आहे. या घटनेनंतर, नीट प्रश्नपत्रिका फुटणे आणि विद्यार्थ्यांवर केलेली कारवाई यांबाबतचा गदारोळ अधिकच तीव्र झाला असून, त्याचे पडसाद संसदेपासून ते रस्त्यांपर्यंत उमटताना दिसत आहेत.

धर्मेद्र प्रधान राजीनामा देणार?

दरम्यान, जंतरमंतरवरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि आंदोलनकर्त्यांच्या प्रतिनिधींमध्ये आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री आणि भूविज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांच्यासोबत ही बैठक पार पडली. या बैठकीला सीजेपीच्या वतीने प्रवक्ते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनी प्रतिनिधीत्त्व केले. सरकारी कार्यालयाऐवजी तटस्थ ठिकाणी चर्चा व्हावी, ही आंदोलनकर्त्यांची मागणी सरकारने मान्य केल्याचे सांगितले जात असून, कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया हे ठिकाणी निश्चित करण्यात आले होते. पण बैठकीच्या ऐन अर्धा तास आधी बैठकीचे ठिकाण बदलण्यात आले. कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया या ठिकाणाऐवजी विठ्ठलभाई पटेल हाऊल या ठिकाणी ही बैठक घेण्यात आली.

‘ही तर सूड उगवल्यासारखी मारहाण’, विद्यार्थ्यांवरील लाठीमारावरून राज ठाकरेंचा संताप; पोलिसांना आदेश देणाऱ्यांवर उठवले प्रश्न

Web Title: Rahul gandhi levels serious allegations in parliament bringing the victimized youth to the forefront

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 04:22 PM

Topics:  

  • CJP Protest
  • New Delhi
  • Rahul Gandhi
  • Student Protest

संबंधित बातम्या

IIT Bombay Student Suicide : साहिल वाकोडे प्रकरण पेटलं! IIT बॉम्बेच्या बाहेर युवक काँग्रेसचं जोरदार आंदोलन, कार्यकर्ते ताब्यात
1

IIT Bombay Student Suicide : साहिल वाकोडे प्रकरण पेटलं! IIT बॉम्बेच्या बाहेर युवक काँग्रेसचं जोरदार आंदोलन, कार्यकर्ते ताब्यात

Modi Mimicry : मोदींच्या मिमिक्रीमुळे रंगला राजकीय वाद! ‘इंदूरचा कार्यक्रम बालिशपणाचा’ म्हणत प्रफुल्ल पटेलांची राहुल गांधींवर टीका
2

Modi Mimicry : मोदींच्या मिमिक्रीमुळे रंगला राजकीय वाद! ‘इंदूरचा कार्यक्रम बालिशपणाचा’ म्हणत प्रफुल्ल पटेलांची राहुल गांधींवर टीका

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज
3

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज

Devendra Fadnavis on Rahul Gandhi : ‘राहुल गांधींनी पक्ष सोडून स्टँडअप कॉमेडियन व्हावं’; मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा घणाघात
4

Devendra Fadnavis on Rahul Gandhi : ‘राहुल गांधींनी पक्ष सोडून स्टँडअप कॉमेडियन व्हावं’; मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.