Rahul Gandhi News: सध्या देशभरात बिहार निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. महाराष्ट्राप्रमाणेच बिहार निवडणुकांकडेही संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले असते. या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोपांच्या फैऱी झडू लागल्या आहेत. अशातच काँग्रेस नेते राहुल गांधी ओडिशातील भुवनेश्वर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी जनतेला संबोधित करताना पुन्हा एकदा उद्योगपती गौतम अदानींवर निशाणा साधला आहे.
राहुल गांधी म्हणाले, ओडिशातील सरकार अदानी चालवत आहेत. त्यांच्यासाठीच जगन्नाथाचे रथ थांबवण्यात आले. गरीब आणि दलितांना सरकारमध्ये स्थान मिळत नाही. पहिले काम म्हणजे जात जनगणना. यामुळे गरीब आणि दलितांना त्यांची खरी शक्ती समजेल.”याकडेही त्यानी लक्ष वेधले.
यासोबतच, बिहार निवडणुकीपूर्वी होणाऱ्या मतदार यादी पुर्नपरिक्षणावर विरोधी पक्षाकडून सातत्याने हल्ले होत आहेत. याबाबत बोलतान राहुल गांधी म्हणाले, बिहारच्या निवडणुका चोरण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण आम्ही बिहारच्या निवडणुका चोरू देणार नाही. भाजप सरकारने चालक संघटना आणि संघटनेवर आमच्या सभांना, बैठकांना सहभागी होऊ नये आणि पाठिंबा देऊ नये यासाठी पूर्ण दबाव टाकला आहे.
यावेळी राहुल गांधींनी सरकारवर निशाणा साधला आणि म्हणाले, ओडिशा सरकारकडे फक्त एकच काम आहे. राज्यातील गरीब लोकांच्या हातातून ओडिशाची संपत्ती हिसकावून घेणे. पूर्वी बीजेडी सरकार हे करायचे आणि आता भाजप सरकारही तेच करत आहे. एका बाजूला ओडिशातील गरीब लोक, दलित, आदिवासी, मागासवर्गीय, शेतकरी आणि मजूर आहेत आणि दुसऱ्या बाजूला ५-६ अब्जाधीश आणि भाजप सरकार आहे. ही लढाई सुरूच आहे. ओडिशाच्या जनतेसोबत फक्त काँग्रेस कार्यकर्तेच ही लढाई जिंकू शकतात, दुसरे कोणीही नाही.
“आम्ही बिहारमध्ये निवडणुका चोरू देणार नाही”
राहुल गांधी म्हणाले, काल मी बिहारमध्ये होतो, पण ज्याप्रमाणे महाराष्ट्रात निवडणुकांची चोरी झाल्याचा संशय वाटत होता. त्याचप्रमाणे बिहारमध्येही निवडणुका चोरण्याचे प्रयत्न सुरू आहेत. निवडणूक आयोगाने निवडणुका चोरण्यासाठी एक नवीन कट रचला आहे. निवडणूक आयोग भाजपचा एक भाग म्हणून काम करत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात १ कोटी नवीन मतदार आले. हे नवीन मतदार कुठून आले हे कोणालाही माहिती नाही. आम्ही निवडणूक आयोगाला अनेक वेळा मतदार यादी आणि व्हिडिओग्राफी देण्यास सांगितले, पण निवडणूक आयोग ते देत नाही. बिहारमध्ये जी काही चोरी झाली, तीच चोरी ते बिहारमध्येही करणार आहेत. काल मी इंडिया अलायन्सच्या नेत्यांसोबत बिहारला गेलो होतो. आम्ही एकत्र म्हटले की आम्ही निवडणूक आयोगाला बिहारमधील निवडणुका चोरू देणार नाही आणि भाजपलाही निवडणुका चोरू देणार नाही.
शेअर की पैसे छापण्याची मशीन? एका वर्षात 1 लाखाचे झाले 84 लाख रुपये! कसं ते जाणून घ्या
राहुल गांधी यांनी निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत म्हटले, “लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात एक कोटी नवीन मतदार नोंदले गेले. पण आजपर्यंत हे मतदार कोण आहेत आणि ते कुठून आले, याची कोणालाही माहिती नाही. आम्ही निवडणूक आयोगाकडे व्हिडिओग्राफी आणि मतदार यादी मागितली, परंतु ती माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. “महाराष्ट्रात जी निवडणूक प्रक्रियेतील गडबड झाली, तशीच चोरी आता बिहारमध्ये करण्याचा प्रयत्न केला जात आहे.”
“ओडिशा हे भाजपचं मॉडेल – जमीन, जंगल, पाणी उद्योगपतींच्या घशात”
राहुल गांधी पुढे म्हणाले, “ओडिशा हे भाजपचे मॉडेल आहे. येथे राज्य सरकार जनतेचा पैसा पाच-सहा मोठ्या कंपन्यांच्या ताब्यात देत आहे.” त्यांनी सांगितले की, “मी शेतकऱ्यांच्या आणि महिलांच्या प्रतिनिधींना भेटलो. त्यांच्या वेदना ऐकल्या. येथे आदिवासींना विचार न करता त्यांच्या जमिनीवरून हुसकावले जाते.”
त्यांनी सरकारवर आरोप केला की, “पेसा कायदा अस्तित्वात असूनही तो लागू केला जात नाही. आदिवासींना त्यांच्या जमिनीवर भाडेपट्टा दिला जात नाही. ही जमीन, पाणी आणि जंगल आदिवासींचे आहेत. काँग्रेसने पेसा कायदा आणला, पण आजचे सरकार त्याची अंमलबजावणी करत नाही.”