Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 25 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गरिबांच्या विरोधातील आर्थिक धोरणे, तडजोड केलेले परराष्ट्र धोरण; बारा वर्षांतील मोदी सरकारच्या कारभारावरून राहुल गांधींचा निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांना मागे टाकत सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवले आहे. यावरूनच आता विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या गेल्या बारा वर्षातील कार्यकालावरून जोरदार टीका केली आहे.

  • By विवेक
Updated On: Jun 09, 2026 | 08:38 PM
Rahul Gandhi slams Narendra Modi

Rahul Gandhi slams Narendra Modi

Follow Us
Follow Us:

२०१४ च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) चांगले यश मिळाले. तेव्हापासून ते आजपर्यंत या 12 वर्षांत भारताने अनेक बदल पाहिले आहेत. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाचे दुसरे वर्ष पूर्ण झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांना मागे टाकत सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवले आहे. यावरूनच आता विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या गेल्या बारा वर्षातील कार्यकालावरून जोरदार टीका केली आहे.

राहुल गांधींची सडकून टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत राहुल गांधी यांनी X पोस्ट शेअर केली. त्यात त्यांनी सरकारच्या नीतीचा, धोरणांचा आणि परराष्ट्र घोरणांवरून चांगलीच टीका केली. ते म्हणाले, “गेल्या बारा वर्षांतील गरिबांच्या हिताच्या विरोधातील आर्थिक धोरणे आणि तडजोड केलेले परराष्ट्र धोरण यामुळे देशाला अशा स्थितीत आणले आहे की, लाखो गरीब कुटुंबे आणि महिलांना स्वयंपाकासाठी लाकडाच्या धुरावर (जो आरोग्यासाठी घातक असतो) अवलंबून राहावे लागत आहे. ‘उज्ज्वला योजने’अंतर्गत, अनुदानित सिलिंडर्सची संख्या नऊवरून चारवर आणण्यात आली. त्यातच भर म्हणून, गेल्या तीन महिन्यांत घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ८९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे—याचा अर्थ असा की: आधी किमती वाढवायच्या, मग अनुदान कमी करायचे आणि परिणामी गरिबांच्या घरातील चुली विझवायच्या.”

12 वर्षों की गरीब-विरोधी आर्थिक नीतियों और compromised विदेश नीति ने आज देश को ऐसे हालात में ला खड़ा कर दिया है जहाँ लाखों गरीब परिवारों और महिलाओं को लकड़ी के ज़हरीले धुएं की तरफ धकेल दिया गया है। उज्ज्वला योजना में सब्सिडी वाले सिलेंडरों की संख्या 9 से घटाकर 4 कर दिया गया।… — Rahul Gandhi (@RahulGandhi) June 9, 2026

“स्थलांतरित कामगारांसाठी आधारभूत ठरणाऱ्या ५-किलोच्या सिलिंडरची किंमतही ३२३ रुपयांनी वाढवण्यात आली आहे; अशा परिस्थितीत त्यांनी पैसे कमवायचे कसे, खायचे काय आणि बचत कशी करायची? आपल्या अब्जाधीश मित्रांची लाखो कोटींची कर्जे माफ करायची आणि स्वतःच्या अपयशाचा बोजा मात्र गरिबांवर लादायचा—हाच तर लूटमार करणारा ‘मोदी मॉडेल’ आहे. मोदी-जी, तुमच्या अपयशाचा भार काय फक्त गरीबच सोसणार आहेत? तुम्ही निर्माण केलेल्या कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेची किंमत कामगार, शेतकरी, महिला आणि मध्यमवर्गीयांनाच मोजावी लागणार का?” असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

Union Cabinet reshuffle: मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलांची शक्यता! १२ मंत्र्यांना डच्चू मिळण्याचा अंदाज

मोदींच्या कार्यकाळाचे बारा वर्ष पूर्ण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकाळाचे दुसरे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने महत्त्वपूर्ण भाष्य केले. “गेल्या १२ वर्षांत त्यांच्या सरकारने हाती घेतलेल्या विविध कल्याणकारी उपक्रमांवर प्रकाश टाकला. भारताने अनेक बदल पाहिले असून, या बदलांच्या केंद्रस्थानी गरिबांचे कल्याण आहे’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाचे दुसरे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, मोदींनी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, स्वच्छ भारत, पीएम आवास योजना आणि आयुष्मान भारत यांसारख्या उपक्रमांचा उल्लेख केला. ते म्हणाले, “हे सर्व उपक्रम लोकांना सन्मान आणि संधी देण्याच्या साध्या उद्देशाने प्रेरित आहेत. गेल्या १२ वर्षांत भारताने अनेक बदल पाहिले असून, या बदलांच्या केंद्रस्थानी गरीब आणि वंचितांचे कल्याण आहे,” असे त्यांनी एका पोस्टमध्ये म्हटले.

‘गेल्या 12 वर्षांत भारताने अनेक बदल पाहिले’; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान

Web Title: Rahul gandhi slams pm narendra modis twelve year tenure

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 08:38 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • narendra modi
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

NEET/CBSE पेपरफुटीवरुन काँग्रेस आक्रमक; ‘या’ तारखेला राज्यभर कँडलमार्च व सत्याग्रह
1

NEET/CBSE पेपरफुटीवरुन काँग्रेस आक्रमक; ‘या’ तारखेला राज्यभर कँडलमार्च व सत्याग्रह

‘शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवली’, पीडित तरुणाला समोर आणत राहुल गांधींचा संसदेतून गंभीर आरोप
2

‘शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवली’, पीडित तरुणाला समोर आणत राहुल गांधींचा संसदेतून गंभीर आरोप

मुलींवर अत्याचार व लाठीचार्ज करण्यापर्यंत पोलीसांची मजल, देवाभाऊ म्हणवून घेणाऱ्याची कृती मात्र…; सपकाळांचा हल्लाबोल
3

मुलींवर अत्याचार व लाठीचार्ज करण्यापर्यंत पोलीसांची मजल, देवाभाऊ म्हणवून घेणाऱ्याची कृती मात्र…; सपकाळांचा हल्लाबोल

Rahul Gandhi On PM Modi Post: ‘मध्यरात्रीचा Video… अन् 70 मिनिटांत राहुल गांधींचा पलटवार; नेमकं काय घडलं?’
4

Rahul Gandhi On PM Modi Post: ‘मध्यरात्रीचा Video… अन् 70 मिनिटांत राहुल गांधींचा पलटवार; नेमकं काय घडलं?’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.