Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Gandhi criticism: ‘हे नेतृत्व नाही, तर नौटंकी…’; नरेंद्र मोदी- जॉर्जिया मेलोनींच्या भेटीवरून राहुल गांधींनी वाभाडे काढले

Rahul Gandhi criticized Narendra Modi: मोदी आणि मेलोनी यांच्या नावांवरून तयार झालेला ‘#Melodi’ हा हॅशटॅग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हा हॅशटॅग प्रथम 2023 मध्ये दुबई येथे झालेल्या COP-28 परिषदेदरम्यान जॉर्जिया मेलोनी यांनी वापरला होता.

  • By anuradha sagar
Updated On: May 20, 2026 | 03:31 PM
'जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा'; राहुल गांधींचा सरकारला इशारा, प्रशांत किशोरांच्या विजयाचीही चर्चा

'जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा'; राहुल गांधींचा सरकारला इशारा, प्रशांत किशोरांच्या विजयाचीही चर्चा

Follow Us
Follow Us:
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटली दौऱ्यात जॉर्जिया मेलोनी यांना ‘मेलडी’ टॉफी भेट दिली
  • देश आर्थिक संकटात असताना पंतप्रधान टॉफी वाटत आहेत- राहुल गांधींची टिका
  • मोदी आणि मेलोनी यांच्या नावांवरून तयार झालेला ‘#Melodi’ हॅशटॅग पुन्हा चर्चेत
Rahul Gandhi criticized Narendra Modi:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच इटलीच्या राष्ट्राध्यक्षा जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली. या भेटीत पंतप्रधान मोदींनी जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) यांना चक्क भारताची प्रसिद्ध ‘मेलडी’ (Melody) टॉफी भेट दिली. या भेटीवरून लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी मात्र ‘मेलोडी’ टॉफी भेटीवरून नरेंद्र मोदींवर सडकून टिका केली आहे.

सोशल मीडियावर पोस्ट करत राहुल गांधी यांनी देशातील आर्थिक परिस्थितीचा उल्लेख करत पंतप्रधानांच्या इटली दौऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “देश आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर उभा आहे आणि आपले पंतप्रधान इटलीमध्ये टॉफी वाटत आहेत.”असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे. याशिवाय, “शेतकरी, तरुण, महिला, मजूर आणि छोटे व्यावसायिक आक्रोश करत आहेत, पंतप्रधान हास्यास्पद व्हिडिओ बनवत आहेत, आणि भाजप टाळ्या वाजवत आहे. हे नेतृत्व नाही, तर नौटंकी आहे.” अशी सणसणीत टिकाही केली आहे.

Melodi : रोममध्ये रंगली स्वीट ‘मेलोडी’ डिप्लोमसी! पंतप्रधान मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांना दिली अत्यंत खास भेट; VIDEO VIRAL

‘मेलोडी’ टॉफीची सोशल मीडियावर चर्चा

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इटली दौऱ्यातील एका हलक्याफुलक्या प्रसंगामुळे ‘मेलोडी’ टॉफी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना मोदी यांनी ‘Melody’ टॉफीचे पॅकेट भेट दिले. त्यानंतर मेलोनी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत “गिफ्टसाठी धन्यवाद” असे म्हटले. या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. व्हिडीओमध्ये नरेंद्र मोदी निळ्या रंगाच्या बंदगळा सूटमध्ये दिसत होते, तर जॉर्जिया मेलोनी यांनी पांढऱ्या रंगाचा पोशाख परिधान केला होता.

‘#Melodi’ हॅशटॅग पुन्हा चर्चेत

मोदी आणि मेलोनी यांच्या नावांवरून तयार झालेला ‘#Melodi’ हा हॅशटॅग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हा हॅशटॅग प्रथम 2023 मध्ये दुबई येथे झालेल्या COP-28 परिषदेदरम्यान जॉर्जिया मेलोनी यांनी वापरला होता. त्यानंतर दोन्ही नेत्यांच्या मैत्रीपूर्ण भेटी आणि सोशल मीडिया पोस्टमुळे हा हॅशटॅग मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. मेलोनी यांनी त्यावेळी मोदींसोबतचा फोटो शेअर करत ‘Melodi’ हा हॅशटॅग वापरला होता. त्यानंतर सोशल मीडियावर या नावाभोवती अनेक मीम्स आणि पोस्ट्स व्हायरल होऊ लागल्या.

PM Modi Norway Controversy : प्रेस स्वातंत्र्याची किंमत? PM मोदींना प्रश्न विचारणाऱ्या नॉर्वेजियन पत्रकाराचे मेटा अकाऊंट सस्पेंड

डिनर बैठक आणि ‘कार डिप्लोमसी’

इटली दौऱ्यादरम्यान नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांची डिनर बैठकीत भेट झाली. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी एकाच वाहनातून रोममधील प्रसिद्ध कोलोसियमला भेट दिली. पंतप्रधान मोदी यांच्या या शैलीला ‘कार डिप्लोमसी’ असे म्हटले जाते. जागतिक नेत्यांसोबत एकाच वाहनातून प्रवास करून परस्पर मैत्री आणि सहकार्याचा संदेश देण्याचा हा प्रयत्न मानला जातो.

पाच देशांच्या दौऱ्याचा अंतिम टप्पा

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 15 ते 20 मे दरम्यान संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या पाच देशांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात ते रोम येथे पोहोचले. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या निमंत्रणावरून झालेल्या या भेटीत व्यापार, संरक्षण, स्वच्छ ऊर्जा आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

 

 

Web Title: Rahul gandhi targets pm modi over melody candy gift to giorgia meloni

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • Giorgia Meloni
  • international news
  • narendra modi
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

‘याद रखना, हिसाब होगा!’ Rahul Gandhi यांच्या अटकेनंतर Harshvardhan Sapkal यांचा सरकारला इशारा
1

‘याद रखना, हिसाब होगा!’ Rahul Gandhi यांच्या अटकेनंतर Harshvardhan Sapkal यांचा सरकारला इशारा

Rahul Gandhi : दिल्लीत पुन्हा राडा! जंतरमंतरवर पोहोचण्याआधीच राहुल गांधींना पोलिसांनी उचललं, प्रियांका गांधींसह इतर खासदारही…
2

Rahul Gandhi : दिल्लीत पुन्हा राडा! जंतरमंतरवर पोहोचण्याआधीच राहुल गांधींना पोलिसांनी उचललं, प्रियांका गांधींसह इतर खासदारही…

राहुल गांधींना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेसचा रास्ता रोको, वांद्रे रिक्लेमेशन येथे मध्यरात्री आंदोलन
3

राहुल गांधींना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेसचा रास्ता रोको, वांद्रे रिक्लेमेशन येथे मध्यरात्री आंदोलन

INDIA Alliance Delhi Protest:दिल्लीत हालचालींना वेग; इंडिया’चे खासदार निवडणूक आयोगाच्या दिशेने रवाना
4

INDIA Alliance Delhi Protest:दिल्लीत हालचालींना वेग; इंडिया’चे खासदार निवडणूक आयोगाच्या दिशेने रवाना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.