Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Gandhi: संसदेत राहुल गांधींच्या ‘इडियट’ आणि ‘अंधभक्त’ वक्तव्यावरून गदारोळ; वादग्रस्त शब्द लागले हटवावे

Rahul Gandhi: संसदेत भाषणादरम्यान राहुल गांधी यांनी 'इडियट' आणि 'अंधभक्त' या शब्दांचा वापर केल्याने सत्ताधारी सदस्यांनी जोरदार आक्षेप घेत गदारोळ केला. वाद वाढल्यानंतर संबंधित वादग्रस्त शब्द भाषणाच्या अधिकृत नोंदीतून हटविण्यात आल्याची माहिती समोर आली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 29, 2026 | 02:34 PM
संसदेत राहुल गांधींच्या 'इडियट' आणि 'अंधभक्त' वक्तव्यावरून गदारोळ; वादग्रस्त शब्द लागले हटवावे

संसदेत राहुल गांधींच्या 'इडियट' आणि 'अंधभक्त' वक्तव्यावरून गदारोळ; वादग्रस्त शब्द लागले हटवावे

Follow Us
Follow Us:
  • राहुल गांधींच्या भाषणावर संसदेत वाद
  • ‘इडियट’ आणि ‘अंधभक्त’ शब्दांवरून सत्ताधाऱ्यांचा आक्षेप
  • गदारोळानंतर वादग्रस्त शब्द वगळले
 

Rahul Gandhi News Marathi: लोकसभेत अँटी पेपर लीक विधेयकावरील चर्चेदरम्यान आज (29 जुलै 2026) विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भाषणावरून मोठा गदारोळ झाला. भाषणात एका विद्यार्थिनीशी झालेल्या संवादाचा संदर्भ देताना राहुल गांधी यांनी ‘स्टुडंट’, ‘इडियट’ आणि ‘अंधभक्त’ या शब्दांचा उल्लेख केला. या शब्दांवर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतल्याने सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर संबंधित टिप्पणी लोकसभेच्या अधिकृत कामकाजाच्या नोंदीतून वगळण्यात आली.

राहुल गांधी यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला काही तरुण विद्यार्थिनींशी झालेल्या संवादाचा उल्लेख केला. यावेळी त्यांनी सांगितले की, एका विद्यार्थिनीने ‘स्टुडंट’ म्हणजे खुल्या मनाने शिकणारी, इतरांचे विचार ऐकणारी आणि सत्य स्वीकारण्याची तयारी असलेली व्यक्ती अशी व्याख्या केली. तसेच त्या विद्यार्थिनीने त्यांना आणखी एका प्रकारच्या लोकांबद्दल सांगितले. हे लोक स्वतःला सर्वज्ञ समजतात, इतरांचे मत ऐकत नाहीत आणि स्वतःलाच सर्वकाही माहिती असल्याचा गर्व बाळगतात. राहुल गांधी यांनी विद्यार्थिनीला विचारले की, अशा लोकांना ती काय म्हणते. त्यावर विद्यार्थिनीने “मी त्यांना इडियट म्हणते,” असे उत्तर दिल्याचा उल्लेख त्यांनी केला.

Parliament Monsoon Session: परीक्षा सुधारणा विधेयकावर जोरदार चर्चा; राहुल गांधी मांडणार विरोधी पक्षाची बाजू

या वक्तव्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी जोरदार विरोध केला. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी असंसदीय शब्दांचा वापर केल्याचा आक्षेप घेत राहुल गांधींनी तो शब्द मागे घ्यावा, अशी मागणी केली.

यावर राहुल गांधी यांनी स्पष्ट केले की, “मी सभागृहातील कोणत्याही सदस्याला ‘इडियट’ म्हणत नाही. मी एका विद्यार्थिनीशी झालेल्या संवादाचा संदर्भ देत आहे,” असे त्यांनी सांगितले. यानंतर त्यांनी पुन्हा विद्यार्थिनीशी झालेल्या संवादाचा उल्लेख करत तिने ‘अंधभक्त’ या संज्ञेचाही वापर केल्याचे सांगितले. त्यांच्या मते, त्या विद्यार्थिनीने तीन प्रकार सांगितले होते – ‘स्टुडंट’, ‘इडियट’ आणि ‘अंधभक्त’. या उल्लेखानंतरही सत्ताधारी सदस्यांनी पुन्हा आक्षेप घेत गदारोळ केला.

दरम्यान, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधींना विधेयकावरील चर्चेवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. त्याचवेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हस्तक्षेप करत राहुल गांधींना बोलू देण्याची विनंती केली, मात्र ‘इडियट’ हा शब्द सभागृहाच्या अधिकृत नोंदीतून वगळण्याची मागणी केली. अध्यक्षांनी ही मागणी मान्य करत संबंधित शब्द लोकसभेच्या कामकाजातून हटविण्याचे निर्देश दिले. या घटनेनंतर संसदेत काही काळ गदारोळ सुरू राहिला. राहुल गांधी यांनी मात्र आपण कोणत्याही खासदाराला उद्देशून हे शब्द वापरले नसून विद्यार्थिनीशी झालेल्या संवादाचा संदर्भ मांडत असल्याचा पुनरुच्चार केला.

Priyanka Gandhi Loksabha: बलात्काऱ्यांचे समर्थन करणाऱ्याला शिक्षण मंत्री पद…; प्रियांका गांधींची जहरी टिका

Web Title: Rahul gandhi uses idiot and andhbhakt remarks in parliament remarks deleted after uproar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 02:34 PM

Topics:  

  • BJP
  • lok sabha
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

NDAमध्ये सर्व काही आलबेल? JDUच्या ‘सत्ता रहे या ना रहे’ वक्तव्यानंतर CM सम्राट चौधरींनी बोलावली भाजप मंत्र्यांची बैठक
1

NDAमध्ये सर्व काही आलबेल? JDUच्या ‘सत्ता रहे या ना रहे’ वक्तव्यानंतर CM सम्राट चौधरींनी बोलावली भाजप मंत्र्यांची बैठक

Bihar Politics: NDA ची सत्ता जाणार? बिहारच्या राजकारणात नवा ट्विस्ट; नितीश कुमारांच्या निकटवर्तीयाचा मोठा दावा
2

Bihar Politics: NDA ची सत्ता जाणार? बिहारच्या राजकारणात नवा ट्विस्ट; नितीश कुमारांच्या निकटवर्तीयाचा मोठा दावा

भाजपमध्ये ‘इनकमिंग’चा धडाका; रविंद्र चव्हाणांच्या दौऱ्यात संघटन मजबूत, विरोधकांना धक्का?
3

भाजपमध्ये ‘इनकमिंग’चा धडाका; रविंद्र चव्हाणांच्या दौऱ्यात संघटन मजबूत, विरोधकांना धक्का?

Solapur News : करमाळ्यात फुटली राजकीय हंडी! काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप समर्थकांसह भाजपमध्ये
4

Solapur News : करमाळ्यात फुटली राजकीय हंडी! काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप समर्थकांसह भाजपमध्ये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.