
eknath shinde and devendra fadnavis
राज्यात आधीच विविध कारणांनी राजकीय वर्तुळात वातावरण तापलेले असताना आता पुन्हा एकदा हालचालींना वेग आला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या ऑडिओ क्लिपमुळे शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधील वादाचा मुद्दा गरम असतानाच आता पुन्हा महायुतीत बिनसल्याचं समजत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सुरु असलेल्या कॅबिनेट बैठकीत शिंदे गटाच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. (Cabinet Meeting)
कॅबीनेट बैठकीत निधी वाटपाच्या मुद्द्यावरून शिंदे गटाच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे. आधीच महायुतीमधील वातावरण काहीसं बरं नसतानाच आता पुन्हा कॅबिनेट बैठकीत वातावरण तापल्याच सांगितलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली असून वित्त विभागातील काही अधिकाऱ्यांच्या व्यवहारावरून शिंदे गटाने प्रश उपस्थित केले आहेत. वित्त विभागातील काही अधिकारी सरकारने मंजूर केलेल्या निधीत कपात करत असल्याची तक्रार शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. सरकारने निधी मंजूर केला असेल, तर त्यात काटछाट करण्याचा अधिकार अधिकाऱ्यांना कुणी दिला, असा सवालही उपस्थित करण्यात आल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.
जंगलतोडीवर खासदार संजय राऊत आक्रमक; म्हणाले, ‘…असे कृत्य राक्षसच करू शकतो’
या प्रकरणात शिंदे गटाच्या मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केल्याची माहिती आहे. आता यावर मुख्यमंत्री फडणवीस काय निर्णय घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
दुसरीकडे, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी ऐकवलेल्या कथित ऑडिओ क्लिपमुळेही राजकीय वातावरण तापलं आहे. जरांगेंना मॅनेज करण्यासाठी भाजपने एकनाथ शिंदे यांना 500 कोटी रुपये दिले असल्याचा दावा या ऑडिओ क्लिपमध्ये केला आहे. या प्रकरणावर एकनाथ शिंदे यांनी आपला संबंध नसल्याचं आणि आपण 500 कोटी रुपये घेतले नसल्याचं स्पष्ट केलं असलं तरीही शिवसेना शिंदे गटाच्या आणि भाजपच्या नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली असल्याचं दिसत आहे.
आता निधी वाटपावरून व्यक्त झालेली नाराजी आणि कथित ऑडिओ क्लिपचा मुद्दा या दोन्ही विषयांवर कॅबिनेटमध्ये काय घडतं, याची उत्सुकता आहे. या मुद्द्यांवरून भाजप आणि शिंदे गटातील मतभेद अधिक उघड होतात का, हेही पाहावं लागेल.
मात्र, बैठकीतील अंतिम निर्णय किंवा चर्चेचा अधिकृत तपशील समोर येईपर्यंत राजकीय वर्तुळातील चर्चांना निश्चित निष्कर्ष समजणं योग्य ठरणार नाही.
Ans: उपलब्ध माहितीनुसार, वित्त विभागातील काही अधिकारी मंजूर निधीत कपात करत असल्याची तक्रार शिंदे गटाच्या मंत्र्यांनी केली आहे.
Ans: कथित क्लिपमध्ये जरांगेंना मॅनेज करण्यासाठी भाजपने एकनाथ शिंदे यांना 500 कोटी रुपये दिल्याचा दावा केल्याचं सांगितलं जात आहे.
Ans: निधी वाटपावरून व्यक्त झालेली नाराजी आणि कथित ऑडिओ क्लिपवरून सुरू असलेला वाद यामुळे दोन्ही पक्षांतील मतभेद चर्चेत येऊ शकतात.